शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
2
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
3
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
4
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
5
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
6
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
7
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
8
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
9
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
10
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
11
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
12
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
13
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
14
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
15
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
16
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
17
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
18
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
19
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
20
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा

दीडशहाणो अॅडिक्ट

By admin | Updated: August 27, 2015 18:38 IST

ते सारे उच्च विद्याविभूषित असतात. कोणो एकेकाळी त्यांनी आपापल्या क्षेत्रत देदीप्यमान यशही मिळवलेले असते. कुणी इंजिनिअर असतात, कुणी सीए, तर कुणी उद्योजक. काही आयएएस, काही आयपीएस, तर काही एमबीएही असतात

 ते सारे उच्च विद्याविभूषित असतात. कोणो एकेकाळी त्यांनी आपापल्या क्षेत्रत देदीप्यमान यशही मिळवलेले असते. कुणी इंजिनिअर असतात, कुणी सीए, तर कुणी उद्योजक. काही आयएएस, काही आयपीएस, तर काही एमबीएही असतात. एकापेक्षा एक शिकलेले. कर्तृत्ववान. यशस्वी. प्रतिष्ठित घरातून आलेले. समाजाच्या मते उत्तम संस्कार मिळालेले. काही प्राध्यापक तर काही अध्यापक. उच्च मध्यमवर्गीय वगैरे. यात सगळ्या वर्गाचे, सगळ्या जातीचे लोक असतात. अनेकांना शिक्षणाच्या संधी मिळाल्याने किंवा उच्चपदी नोक:या मिळवल्याने ते त्यांच्या मते सर्वज्ञ असतात. 

बाकीच्या ग्रामीण, अज्ञानी, व्यसनी मित्रंपेक्षा या अतिशिकल्या-सवरल्यांना व्यसनातून बरं व्हायला जास्त वेळ लागतो, असा अनुभव अनेक समुपदेशक वारंवार सांगतात.
या सगळ्यात एक समान सूत्र असते, ते म्हणजे वस्तुस्थिती नाकारण्याचे. आणि सगळ्यात महत्त्वाचा गुण (?) म्हणजे (फाजील) आत्मविश्वास. त्यांची अशी पक्की भावना असते की, आकाशाखालच्या प्रत्येक गोष्टी त्यांना कळतात. आपल्याला सारं समजतं या भावनेतून ते काहीच धड ऐकून घेत नाहीत, मान्यही करत नाहीत. त्यात त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात कमी शिकलेल्या, ग्रामीण भागातून आलेल्या, हातभट्टी पिणा:या, रुग्ण-मित्रंच्या बरोबर एकत्र राहणं अजिबात आवडत नाही. पूर्वी जशी समाजात शिवाशिव मानली जायची तसेच हे ‘शहाणो’ इतर गरीब, कमी शिक्षित मित्रंशी वागतात. त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात घरच्या माणसांनी दाखल केले ही त्यांच्या आयुष्यातली सर्वात अपमानकारक घटना असते. म्हणूनच, उपचारांवर भर देण्यापेक्षा असुविधा, व्यवस्थापनातील त्रुटी अशा गोष्टींबद्दल वारंवार तक्रारी असतात. आणि सर्वात महत्त्वाचा अवगुण म्हणजे फाजील अहंकार ! कसला तर शिक्षणाचा, स्वत:च्या पैशाने दारू पिण्याचा, कायम  इंग्लिश दारू पिण्याचा, कधीही रस्त्यावर न पडण्याचा. आणि या अहंकारामुळे आपण त्यातले नव्हे असं ते समजू लागतात. एक प्रकारच्या तो:यात त्यांचा वावर असतो. वाचनालयातून व्यसनविषयक जाडी जाडी इंग्लिश पुस्तके ते घेत असतात आणि वॉर्डमधील इतरांना शिकवत असतात. त्याच वेळी इतर मंडळी काय काय पितात, ती कुठे मिळते, त्याची किंमत काय असते, त्याची किक कशी असते या गोष्टीत मनापासून रस घेत असतात.
मुक्तांगणमधील एक समुपदेशक त्यांना ‘शहाणो मित्र’ या नावाने ओळखत असत. अशा मित्रंना नेहमी आपल्याला आपल्या दर्जाचा प्रोफेशनल समुपदेशक मिळावा असा आग्रह असायचा. पण त्यांना नेहमीच कमी शिकलेल्या आणि दीर्घ काळ व्यसनमुक्त असलेल्या समुपदेशकाकडे पाठवले जाई. अशा विशेष शहाण्या रुग्ण-मित्रंना हे अपमानकारक वाटते. त्यात त्यांना भाजी चिरणो आणि भांडी घासणो ही कामं दिली जात. अलीकडे काही वर्षापूर्वीपर्यंत संडास-बाथरूम धुणं ही कामंही दिली जात. आणि ही कामे करताना त्यांना एक बोर्ड वाचायला मिळे, ‘‘जब आप सब्जी काटते हो तब अहंकार काटते हो, और जाब बर्तन साफ करते हो तब अपना मन साफ करते हो.’’
- हा या शहाण्यांना शब्दांचा मार असतो. 
अशाच एकाची गोष्ट. त्याचा समुपदेशक त्याच्यापेक्षा कमी शिकलेला. हा काय मला समजून घेणार असा त्याचा पूर्वग्रह होता. तो मॅडमकडे गेला आणि तक्रारीच्या सुरात म्हणाला, ‘‘माझा समुपदेशक फारसा शिकलेला नाही. तो काय मला मदत करणार? तुम्ही कोणी तरी तज्ज्ञ समुपदेशकाकडे माझी फाइल वर्ग करा.’’
मॅडम म्हणाल्या, ‘‘अरे, तो तुङयापेक्षा कमी शिकलेला आहे हे मान्य; परंतु तो कमी शिकलेला असूनसुद्धा त्याला जे समजलं आहे ते तू इतका शिकूनसुद्धा अजून कळलेलं नाही.’’ 
त्याचा प्रश्नार्थक चेहरा पाहून त्या पुढे म्हणाल्या, ‘‘अरे इतके शिकल्यानंतरसुद्धा व्यसनामुळे शरीराचे, कुटुंबाचे नुकसान होत आहे ही साधी गोष्ट तुला अजून कळत नाही. पण पहिल्याच अॅडमिशनमध्ये त्याला हे समजलं आणि गेली दहा वर्षे तो हे काम करतोय. ही त्याच्याकडून शिकण्यासारखी महत्त्वाची गोष्ट नाही का?’’
त्याच्याकडे उत्तर नव्हते. 
अर्थात या मंडळींना ही युक्ती लागू पडेलच असे नाही.  नेमकं आणि भरपूर वाचन करायला लावणं, दारूचा मेंदूवर आणि शरीरावर नेमका काय आणि कसा परिणाम होतो याची माहिती देणं, जे वाचलं त्याचा सारांश लिहून काढायला सांगणं हा मार्ग असतो. त्यांना माहितीचा मोह असतो. म्हणून आधी वाचन आणि ते तुमच्या जीवनाशी कसे मिळतेजुळते आहे हे विस्तारपूर्वक समजावून द्यावं लागतं. या गोष्टीत वेळ जास्त जातो. पण केवळ माहिती असणं आणि त्या माहितीचा अनुभव असणं यात खूप फरक असतो. या फरकाची जाणीव होण्याचा क्षण त्यांना बदलवणारा ठरू शकतो.
पण हे सारं सोपं नसतं. महाकठीण. 
एरवीही शिकलीसवरलेली माणसं व्यसनाच्या आहारी जातात तेव्हा त्यांना समजावणं अवघड, कारण आपल्याला सगळं कळतं याच तो:यात ते वावरतात.
आपलं शिक्षण आपल्याला शहाणं करत नाही, त्यासाठी अनुभवातून आलेलं शहाणपण मान्य करायलाही शिकायला हवं हे कळत नाही.
म्हणून तर आज शिकलेसवरलेले व्यसनांच्या जास्त आहारी जाताना दिसतात.
स्