शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
6
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
7
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
8
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
9
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
10
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
11
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
12
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
13
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
14
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
15
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
16
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
17
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
18
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
19
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
20
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
Daily Top 2Weekly Top 5

गुरुकृपा व्हावी, अजून काय मोठं?

By admin | Updated: July 18, 2016 17:19 IST

प्रत्येकाच्या आयुष्यात पहिले गुरु असतात ते आई-वडील. कारण तेच आपल्याला चालायला, बोलायला शिकवतात. त्यांच्याच मदतीने आपण पहिले पाऊल टाकतो आणि नंतर धडपडत धावायलाही लागतो.

- रोहित नाईक

प्रत्येकाच्या आयुष्यात पहिले गुरु असतात ते आई-वडील. कारण तेच आपल्याला चालायला, बोलायला शिकवतात. त्यांच्याच मदतीने आपण पहिले पाऊल टाकतो आणि नंतर धडपडत धावायलाही लागतो. बोबडे बोल निघेपर्यंत आपल्याला आजूबाजूच्या परिसराच्या तोंडओळखही झालेली असते आणि नंतर आई - बाबांचेच बोट पकडून आपण शाळेतही प्रवेश करतो. येथे आपली ओळख होते ती जगाशी ओळख करुन देणाऱ्या गुरुंशी. आई - वडिलांमुळे आपले पहिले पाऊल या सुंदर विश्वात पडते, तर आपले हेच पाऊल भक्कम करण्याचे काम आपले शिक्षक करीत असतात....

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर:!
गुरु: साक्षात प्रब्रह्म तस्मै श्री गुरवे नम:!!

शाळेत प्रत्येक दिवसाची सुरुवात याच प्रार्थनेने व्हायची. आजही शाळेतली प्रार्थना ऐकल्यावर किंवा म्हटल्यावर शाळा आणि शाळेतले शिक्षक डोळ्यांसमोर नक्की येतात. पण कॉलेजमध्ये आल्यानंतर या प्रार्थनेचा आपल्याला विसर पडलेला असतो. कॉलेज कॅम्पसमध्ये एन्ट्री केल्यावर आपली सुरुवात ‘हाय ड्यूड व्हॉट्स अप?’ अशी सुरुवात होते. शाळेतल्य शिक्षकांसाठी आपल्या मनात भीतीयुक्त आदर असायचा. कॉलेजमध्येही आपण आपल्या ‘प्रोफेसरांचा’ आदर करतोच; मात्र ती भीती अजिबात दिसत नाही. उलट या प्रोफेसरांसोबत प्रत्येकाचे मैत्रीचे रिलेशन झालेले असते. शाळेत गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिक्षकांना पुष्पगुच्छ देतानासुध्दा मनात धाकधूक व्हायची आणि कॉलेजमध्ये आम्ही बिनधास्त टिचर्ससह फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करताना त्यांच्या हातावर ‘बॅण्ड’ बांधून मोकळे होतो. इतकंच नाही, तर टिचर्सना आपल्या ग्रुपमध्ये सामील करुन त्यांच्या खांद्यावर हात ठेवून एक हटके फोटोही काढतो. स्टुडंट्स आणि प्रोफेसर्स यांच्यात हसते - खेळते वातावरण असावे आणि ते असलेच पाहिजे, पण त्यालाही काही मर्यादा आहेत. प्रत्येक कॉलेजियनने आपली जागा ओळखली पाहिजे. आज जर एखाद्या प्रोफेसरने संपुर्ण वर्गासमोर एखाद्याला खडसावले, तरी तो विद्यार्थी आपला ‘अपमान’ झाल्याचे समजून वर्षभर त्या शिक्षकाच्या वाकड्यात शिरतो. आपल्याला हे कळलं पाहिजे की, शिक्षक आपल्याला हौस म्हणून आपल्यावर रागवत नसतात. त्यांनी दाखवलेल्या चुका आपण सुधरल्या, तरंच आपण यशस्वी होतो. त्यांच्यामागे खूप मोठा अनुभव असल्याने त्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकण्याची संधी असते. आई - वडिल हे आपले घरातले पालक असतात, तर शिक्षक हे आपल्या बाहेरच्या जगातले पालक असतात. त्यामुळेच तर टीचर्सच्या मार्गदर्शनाचे पालन केले तर आपल्याला यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही...गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.....