शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

गुरुपौर्णिमा : आपल्या घरात येत असलेल्या तंत्रज्ञानालाच गुरु करुन घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 16:17 IST

सॅन होजे विमानतळावरच्या प्ले एरियामध्ये काही लहान मुलं रोबोटशी खेळताहेत. मुलांनी खूश होऊन म्हटलं की ‘धिस इझ कूल’ तर त्यातला एक रोबोट म्हणाला, ‘आय नो आय अ‍ॅम कूल, थॅँक यू.’

ठळक मुद्देइंडस्ट्री 4.0  तंत्रज्ञान शिकण्यासाठी त्या तंत्रज्ञानालाच गुरुकरून आपण एकलव्याप्रमाणे शिकू.

- डॉ. भूषण केळकर

अदिती दीक्षित या गेमिंगमध्ये काम करणार्‍या इंजिनिअर विद्यार्थिनीने मला सॅन होजे या कॅलिफोर्नियातील विमानतळावरचा एक फोटो पाठवला. अदिती ही आपल्या इंडस्ट्री 4.0 सदराची नियमित वाचक आहे. तिनं सांगितलेला हा किस्सा. सॅन होजे विमानतळावरच्या प्ले एरियामध्ये काही लहान मुलं आहेत. त्याच्यासोबत रोबोट्स आहेत. मुलांनी खुश होऊन म्हटलं की ‘धिस इझ कूल’ तर त्यातला एक रोबोट म्हणाला, ‘आय नो आय अ‍ॅम कूल, थॅँक यू’.आहे की नाही भारी? असे अनेक रोबोट्स हे जपानमध्ये तर सिनिअर सिटिझनसाठी त्यांची कामं करायला, त्यांना औषधांची आठवण करायला आणि एवढंच नव्हे तर त्यांचे मनोरंजन करायलासुद्धा वापरले जात आहेत!मला आठवण झाली आपल्याकडील 2007 च्या मेंटेनन्स अ‍ॅण्ड वेल्फेअर ऑफ पेरंट्स अ‍ॅण्ड सिनिअर सिटिझन अ‍ॅक्ट’ची. कोण जाणे ‘फॅमिली व्हॅल्यूज’ जपणारे अन् श्रावणबाळाची परंपरा सांगणारे भारतीयसुद्धा आई-वडिलांची काळजी घ्यायला भविष्यात रोबोट्स वापरू लागतील? इंडस्ट्री 4.0 मुळे जसा परिणाम उद्योग आणि नोकर्‍यांवर होणार आहे तसाच तो समाज स्वास्थ्यावरही होणार आहे, यात शंकाच नाही! असो!तर आपण मागील लेखात बघितलं की, आपण कुठल्याही क्षेत्रात कार्यरत असतो तरीही आपण इंडस्ट्री 4.0 मध्ये टिकून राहण्यासाठी काही नवीन शिकणं आवश्यक आहे. त्यासाठी काही महत्त्वाचे कोर्स मी तुम्हाला सांगून ठेवतो. त्यातील तुम्हाला जमतील ते कोर्सेस तुम्ही करावेत. मुख्य म्हणजे मी देतोय ते कोर्सेस संपूर्णतर्‍ विनामूल्य आहेत.सांख्यिकीशास्त्र  ही गणिताची शाखा तुम्हाला त्यात खूपच मदत करेल. ज्याला आपण  ओपन सोर्स म्हणतो. असं एक साधं सॉफ्टवेअर तुम्हाला सांगतो त्याचं नाव आहे  "R". हे सॉफ्टवेअर नुसतंच विनामूल्य शिकता येईल. त्यासाठीच्या या दोन साइट्स. 1) www.udemy.com/r-basics/2) alison.com/course/r-for-data-analysisसांख्यिकीसोबतच तुम्ही अजून काही संज्ञा ऐकल्या असतील. त्यांची तोंडओळख आपण करून घेतली तर त्याचा आपल्याला आपापल्या क्षेत्रात फायदाच होईल. त्या संज्ञा म्हणजे डाटा सायन्स, डाटा अ‍ॅनालिसिस, डिसिजन सायन्स. औषधनिर्माणपासून वैद्यकीय, इंजिनिैरिंगपासून मानशास्त्रार्पयत आणि विधिविषयक ज्ञानापासून ते मनुष्यबळ विकास आणि कला शाखांर्पयत यापुढे जे डाटा सायन्स वापरायला लागले त्यात अगदी साध्या गोष्टी आपण वापरू. त्यात येईल मायक्रोसॉफ्टचे एक्सेल व मायक्रोजचं ज्ञान. हे तुम्हाला सहज मिळवता येईल व  'R मुळे अधिक परिपक्व करता येईल.याविषयातील अजून काही कोर्सेस मी सांगतो.  COURESRA.ORG या वेबसाइटवर अ‍ॅण्ड्रय़ू एनजी  या अत्यंत प्रसिद्ध प्राध्यापकाचा इंट्रोडक्शन टू मशीन लर्निग हा कोर्स सुंदर आहे. त्याला हिंदीमध्ये सबटायल्स पण आहेत.मायक्रोसॉफ्टचे दोन कोर्सेस तुम्ही edx.org या साइटवर करू शकाल. 1 महिन्यात संपणारे हे उत्तम कोर्सेस  तुम्हाला डाटा सायन्स सहजसुंदर शिकवतील.edx.org वरच हार्वर्ड विद्यापीठाचा डाटा सायन्स या विषयावर केवळ 4 आठवडय़ाचा कोर्स आहे. बर्कले विद्यापीठाचा कोर्स फंडामेण्टल ऑफ डाटा सायन्स असा आहे.   एकूण काय इंडस्ट्री 4.0  तंत्रज्ञान शिकण्यासाठी त्या तंत्रज्ञानालाच गुरुकरून आपण एकलव्याप्रमाणे  शिकू. गुरुपौर्णिमा अत्यंत पद्धतीने साजरी करू! गुरवे नम :..