शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
2
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
3
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
4
Upcoming IPO: २१ वर्ष जुनी कंपनी IPO आणण्याच्या तयारीत, ८०० कोटी रुपये उभे करण्याची योजना
5
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
6
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
7
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
8
स्पाय कॅमेरा, ७४ तरुणींचे व्हिडिओ, खाजगी एअरलाइन्समधील पायलटचं धक्कादायक कृत्य, असं फुटलं बिंग   
9
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
10
तिला फोटोशूटसाठी भारतात पाठवण्यास राजी नाही पाकिस्तान; वर्ल्ड कप आधी घेतला मोठा निर्णय
11
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
13
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
14
Mumbai: विद्यार्थी एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत; वर्गांवर घेतला तास!
15
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
16
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
17
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
18
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
19
Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना
20
Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद

...गो डिजिटल

By admin | Updated: January 26, 2017 02:08 IST

शिक्षण संपल्यानंतर जेव्हा पुढील आयुष्य सुरू होईल तेव्हा दिवसातील २४ तासांपैकी १५ ते १७ तास काम करत असताना मला मजा येईल

  कामात मज्जा, हेच सेटल होणं...

शिक्षण संपल्यानंतर जेव्हा पुढील आयुष्य सुरू होईल तेव्हा दिवसातील २४ तासांपैकी १५ ते १७ तास काम करत असताना मला मजा येईल, मी जे काम करतोय त्यातून मला स्फूर्ती मिळेल. त्याचा अपेक्षित उपयोग होणार असेल तर त्याला मी आयुष्यात सेटल होणं, असं म्हणेल.त्याचबरोबर एकच एक प्रकारच काम न करता माझ्या कामाच्या शाखा दिवसेंदिवस वाढत असतील. मी भावनिकरीत्या, व्यावहारिकरीत्या तसेच आर्थिक बाजूने सक्षम असेल तर त्या परिस्थितीलासुद्धा आयुष्यात सेटल होणं म्हणेल.मी करत असलेल्या कामाचा फायदा शेवटच्या व्यक्तीला होत असेल. मी करत असलेल्या कामाच्या नोंदी घेतल्या जात असतील आणि माझं काम उत्तरोत्तर वाढत असेल तर तेच माझ्यासाठी सेटल होणं.- रवींद्र चुनारकर निर्माण ६, (रवींद्र पालघर येथे ‘वयम्’ या संस्थेत काम करतो.)***गरजा कमी, आनंद जास्तअसं एखादं काम शोधणं की जे करताना आपण पाट्या टाकत जगतोय असं मनाला एक क्षणही वाटणार नाही, तसं काम करणं म्हणजे आयुष्यात सेटल होणं होय.जीवन जगत असताना पैसा लागतोच, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. पण उगाच जास्त पैशाच्या हव्यासापोटी मनाविरुद्ध जगून, समाजविघातक गोष्टी करून, स्वत:ला व इतरांना फसवून मिळवलेल्या पैशांपेक्षा मनासारखे, आनंदाची उधळण करणारे, काम करता करता गरजेपुरताच पैसा मिळवणं हे नेहमीच चांगलं, असं मला वाटते.धीरज वाणी, निर्माण ६आवडीचं काम करत नाहीत ते कसले आपण सेटल?परवा दोन मैत्रिणी फार दिवसांनंतर भेटल्या आणि खूप गप्पा झाल्या. बऱ्याच वर्षांनी भेटल्यामुळे बोलण्यासाठी भरपूर विषय होते. लग्न कधी झालं, नवरा काय करतो, कोणत्या शहरामध्ये सेटल होणार, मुलांचा काही प्लॅन आहे की नाही वगैरे.. वगैरे..

त्यातील एक लगेच म्हणाली पदवीनंतर घरच्यांनी लगेच लग्न ठरवलं. स्थळ चांगलं होतं म्हणून मीपण होकार दिला. मुलगा पुण्यात हिंजवडीत आयटी कंपनीमध्ये कामाला आहे. स्वत:चा फ्लॅट आहे. तशी मला काम करायची काही गरज नाही. मग तिने मला विचारले की, तू काय करतेस, तुम्ही कुठे राहता? मी म्हणाले माझा नवरा पुण्यात राहतो आणि मी पालघरला. आठवड्यातून किंवा पंधरा दिवसांतून मी येऊन-जाऊन करते पुण्याला. मग ती म्हणाली तू एवढ्या लांब काम करण्यापेक्षा पुण्यातच का काम शोधत नाहीस, पुण्यातच का सेटल होत नाहीस. मी म्हणाले पालघरला जे मी काम करते त्यामध्ये मला खूप आनंद आणि समाधान आहे.

जर त्याच स्वरूपाच काम मला पुण्यात मिळालं तर मी नक्की करेल. मी म्हणाले सेटल होण्यासाठी अगोदर शहर किंवा गाव निवडण्यापेक्षा मी जे काम करत आहे आणि त्या कामात मला आनंद मिळत असेल तर मी त्याच जागी सेटल होईल. माझ्या मते आपल्याला जे काम करण्यामध्ये आनंद आणि समाधान आहे ते काम करायला मिळालं म्हणजे मग ती जागा शहर असो वा गाव तुम्ही मनाने कधीच तेथे सेटल झालेला असता. ‘आपल्या आवडीचं काम करायला मिळणं म्हणजे आयुष्यात सेटल होणं.’ मग त्या सेटल झालेल्या जागेनुसार तुमच्या आवडी- निवडी आणि गरजा ठरत असतात. आपल्या आयुष्यातील कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन जेव्हा आपण काम करायला लागतो तेव्हा आपण हळूहळू वेगवेगळ्या परिस्थितीवर मात करायला शिकतो.

यातूनच आपली अवलंबून राहण्याची वृइी कमी होत जाते. आपण स्वावलंबी बनत जातो. आयुष्यात घर, गाडी, बँकेतील शिल्लक इ. फक्त समाजाने सेटल होणं असं मानलं आहे. मग आपणसुद्धा याच चौकटीत विचार करतो. या बाह्यसुख देणाऱ्या या गोष्टींच्या मागे धावत आपलं आयुष्य घालवतो. या बाह्यसुख देणाऱ्या गरजा इतक्या वाढत जातात की, आपलं आयुष्य मशीन कधी बनून जातं हे आपल्यालाही कळत नाही. यावर नायना (डॉ. अभय बंग) एकदा खूप सुंदर वाक्य बोलले होते की, ‘गरजा कमी असणं हीच काळाची गरज आहे. म्हणूनच गरजा कमी असल्या की, त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला न आवडीचं काम करण्याची गरज नाही.- साधन गुलदगड (निर्माण ६)जो थांबतो, तो संपतोच!मनुष्य प्रजातीची निर्मिती आफ्रिकेत झाली. तिथून माणूस पृथ्वीभर पसरला. फिरता फिरता त्याच्या सोयीनुसार, व्यवसायानुसार, राहणीमानानुसार त्याला पूरक आणि पोषक अशी जागा वाटली तिथे तो विसावला. शेती हाच मुख्य व्यवसाय असल्यामुळे या वसाहती मुख्यत: नदीकाठी तयार झाल्या, विस्तार पावल्या. आज ‘आयटी कंपनीमध्ये काम करतो’ किंवा ‘तिकडे प्रॅक्टिस चांगली चालते’च्या नावाखाली शहरांकडे धाव घेणारे लोंढे आणि कालचा आदिम माणूस यांची गरज आणि उद्देश यामध्ये काहीही फरक नाही.

फरक इतकाच की आज स्थिरावलेल्या खांद्यांवर विस्थापितांचे ओझे पडते आहे. आफ्रिकेतून लक्षावधी वर्षांआधी सुरू झालेला हा प्रवास आजपण त्याच गतीने सुरू आहे. राहील. ‘सेटल होणे’ ही मुळातच एक भ्रामक आणि सांत्वनपर कल्पना आहे. थांबला तो संपला. उन्नतीकडे नेणारा प्रवास जगण्याचे बळ देतो. ती उन्नती आर्थिक, सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक, कौटुंबिक किंवा वैयक्तिक स्वरूपाची असू शकते. मला महिनाकाठी अमुक पगार मिळावा किंवा मला माझ्या कामातून तमुक भावनिक समाधान मिळावे वगैरे मर्यादित ध्येय या प्रवासातील मैलाचे दगड ठरतात. पण ते पार केल्यावर उन्नती साध्य होईल याची शाश्वती भटकंतीची बीजे ल्यालेल्या आणि स्पर्धेत पुढे जाण्यासाठी हपापलेल्या आजच्या माणसाला देता येणार नाही. एक मैलाचा दगड पार करायच्या आधीच मेंदूने पुढचा दगड कोरूनदेखील ठेवला असतो.

या प्रवासात अनेक टप्पे येतात. जन्म, शाळा, पदवीचे शिक्षण, नोकरी, लग्न, मूलबाळ, पालकांचा मृत्यू आणि शेवटी आपला. ‘बस झालंच की! अजून थोडं, अजून थोडं’ असे सांत्वन करत हे टप्पे गाठायचा आपण प्रयत्न करतो. प्रवास सुरू ठेवतो. बारावी होण्यासाठी आधी दहावी पास करावी लागते. तसेच लग्न करताना आधी ‘सेटल’ व्हावे लागते असा उथळ प्रघात सामान्यपणे आचारला जातो. वधुपित्याने मुलाकडून असलेल्या अपेक्षांची एक चेकलिस्ट तयार केलेली असते.

मुलाच्या गुणवत्तेनुसार मुलीचा बाप ती चेकलिस्ट भरतो. योग्य वरास मुलगी देतो. इंग्रजी जुल्माखाली दबलेल्या आणि अत्यंत हलाखीचे दिवस भोगलेल्या एखाद्या बापाने आपल्या मुलीवर ही वेळ येऊ नये म्हणून इंग्रज राहतात त्याप्रमाणे ‘सेटल’ झालेल्यांची ही चेकलिस्ट तयार केली असावी. आणि तिचा मग मुलगी देण्याआधी स्वत:च्या मनाला समजवण्यासाठी वापर केला असावा. पुढे तो पायंडाच पडला. सेटल होणे ही कल्पना जेवढी भाविनक आहे तेवढीच निराधार!

माणूस भटकत होता तोवर जगला. तो हडप्पा आणि मोहेंजोदडो येथे स्थिरावला आणि संपला. आपला प्रवास संपायच्या आधीच आपल्या लहानग्यांचा प्रवास सुरू झालेला असतो. दिलेली जबाबदारी पूर्ण करून या रिले रेसचा बॅटन पुढच्याकडे सुपूर्द करणे हेच आपले मूळ कर्तव्य आहे आणि या प्रवासाचे साध्यदेखील.- डॉ. हृषिकेश मुनशी, निर्माण ६.(हृषिकेश सर्च या संस्थेत आदिवासींच्या आरोग्यावर काम करत आहे.)