शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अर्थव्यवस्थेचा फुगा फुगतो कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 18:03 IST

जोसेफ स्टिग्लिट्झ हे अर्थशास्राच्या विश्वामधलं मोठं नाव. त्यांची पुस्तकं वाचा, भाषणं ऐका मग कळेल की, आपल्या अर्थव्यवस्थेचं नक्की काय चाललंय.

ठळक मुद्देयाकाळाचं भान येण्यासाठी हे ऐकणं-वाचणं गरजेचं आहे.

- प्रज्ञा शिदोरे 

जोसेफ स्टिग्लिट्झ हे अर्थशाशास्राच्या  विश्वामधलं मोठं नाव. 2002 साली त्यांनी ग्लोबलायझेशन अ‍ॅण्ड इट्स डिसकंटेण्ट्स हे पुस्तक लिहिलं आणि  त्यामुळे ते भारतीयांनाही परिचयाचे झाले. या पुस्तकामध्ये त्यांनी आंतराष्ट्रीय नाणेनिधीला धारेवर धरलं. ते म्हणतात, ‘आपण ज्या भारतासारख्या अर्थव्यवस्थांना ‘विकसनशील’ म्हणतो त्यांचा खर्‍या अर्थाने ‘विकास’ होत नाहीये. त्या केवळ फुगत आहेत. आणि असं होण्याचं कारण ग्राहकांना मिळणारी अपुरी माहिती !’ त्याचं अजून एक पुस्तक असंच गाजलं. त्याचं नाव द प्राइस ऑफ इनिक्वालिटी. खरं तर हे पुस्तक त्यांनी अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये ‘विकासाचा’ भाग न बनू शकलेल्या वर्गासंबंधी लिहिलं आहे. पण वाचल्यावर असं लक्षात येतं की हे फक्त अमेरिकन अर्थव्यवस्थेबद्दल नाहीये. तर ‘आम्ही लै मोठे झालो’ असं स्वतर्‍च म्हणवून घेणार्‍या प्रत्येक देशाबद्दल खरं आहे. म्हणजे हे पुस्तक वाचलं की खरंतर भारतच डोळ्यापुढे येतो. स्टिग्लिट्झ मते, अर्थव्यवस्थेचा भाग झालेल्या लोकांपेक्षा, जे याचा भाग बनू शकत नाहीयेत तेच या अर्थव्यवस्थांवर अधिक प्रभाव टाकतात. काही महिन्यांपूर्वी स्टिग्लिट्झ भारतात आले होते. त्यांनी ग्लोबलायझेशन या विषयावर एक भाषण केलं. पुस्तक थोडं टेक्निकल आहे, त्यामुळे यू टय़ूबवर त्यांची भाषणं तुम्हाला नक्कीच ऐकता येतील. ते थोडं सोपं. मात्र याकाळाचं भान येण्यासाठी हे ऐकणं-वाचणं गरजेचं आहे.