- सचिन लुंगसे, प्रगती जाधव-पाटील, संतोष मिठारी
मुंबईतल्या कार्यकत्र्याचे मदतीचे हातगणोशोत्सव म्हणजे मुंबईचा जीव की प्राण, उत्साह आणि आनंदाची पर्वणी असते. दरवर्षी या उत्सवावर लाखो - कोटय़वधी खर्च केले जातात.यंदा मात्र या उत्सवावर कोरोनाची छाया आहे, फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून यंदा साधेपणाने हा सोहळा साजरा होईल, त्यासाठी मुंबईतल्या गणोश मंडळातले तरुण कार्यकर्तेही यंदा काही नवे, कल्पक आणि समाजोपयोगी उपक्रम करायचं असं ठरवत, यंदा हा उत्सव सादगीनं साजरा करायला सज्ज झालेत.आरोग्य आणि पर्यावरण या दोन गोष्टींचा हात धरत तरुण कार्यकर्ते अनेक गोष्टी करायचं ठरवत आहेत. उत्सव नेहमीसारखा नाही म्हणून विरस तर आहेच; पण त्यातही आपण काय चांगलं करू शकतो. लोकांना मदत करता येईल का, असाही विचार काहींनी केला आहे.अनेक गणोश मंडळांनी उत्सव साजरा न करता आरोग्य, रक्तदान शिबिराचं आम्ही आयोजन करणार आहोत असं सांगितलं. अर्थात त्यांना कोरोना सुरक्षितता नियमावली आणि निकष पाळावयाचे आहेत.ज्या गृहनिर्माण संस्थेकडे मुबलक जागा उपलब्ध असेल तर त्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावं, असं आवाहन मुंबई जिल्हा उपनगर को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र मोरे करतात. एकीकडे तरुण उत्साह अपार आहे, मात्र त्यांना आपली जबाबदारी कळते, आपल्या उत्साहाला आवर घालत बहुतांश तरुण नी ठरवलं आहे की, होता होईतो इतरांना मदत करणं, हाच यंदाचा उत्सव.ही एक सहज यादी करत गेलो की, कोण काय करतंय, तरी तरुण मनांनी टिकवून ठेवलेली उभारी सहज दिसते.
****
सन्मानानं आर्थिक मदत
पाच दशकं करंडीढोल वाजवणारे हात उत्सव काळातही कमावते व्हावेत, वेठबिगार म्हणून काम करणा:यांना उत्सव काळात आर्थिक आधार द्यावा, अत्यवस्थ कोरोना रुग्णांसाठी जीवनदायी ठरणा:या रेमडीसिव्हर इंजेक्शन जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून द्यावीत.- या अशा काही कल्पना सातारकर तरुणांच्या मनात यंदा गणोशोत्सवात आहेत.साता:यातील सम्राट गणोशोत्सव मंडळाने काही वर्षापूर्वी फायबर मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. दरवर्षी मूर्तीची मंडपात प्रतिष्ठापना केली जाते. यावर्षी मात्र मंडळाच्या कार्यकत्र्याच्या घरात छोटी मूर्ती बसवायचं असं मंडळाच्या कार्यकत्र्यानी ठरवलं आहे.मात्र गणोशोत्सवात एरव्ही करंडीढोल वाजवणारे, मंडप व्यावसायिक, फुलं विक्रेते यासगळ्यांना आर्थिक मदत करण्याचंही मंडळानं ठरवलं. अर्थात त्यासाठी वर्गणी मात्र गोळा करायची नाही, असंही त्यांनी ठरवलं.तरुण कार्यकत्र्यानी हे ठरवलं आणि मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब तांबोळी, कार्याध्यक्ष अतुल टांकसाळे, उपाध्यक्ष पद्माकर खुटाळे यांनीही ही कल्पना उचलून धरली.सातारा तालुक्यात कळंबे हे छोटंसं गाव आहे. कोरोनाकाळात इथं अनेकांवर बेरोजगाराची कु:हाड कोसळली आहे. येथील शिवतेज सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळाच्या कार्यकत्र्यानी काही गरजू व्यक्तींना म्हणून काम करणा:या दोघांना सन्मानानं मदत करण्याचं ठरवलं.उत्सव काळात मंडळात आरतीची तयारी करणं, स्वच्छता राखणं, दिवाबत्ती आदी कामं दहा दिवस करण्याच्या मोबदल्यात त्यांना मंडळाकडून मानधन देण्यात येणार आहे. कोरोनाकाळात सातारा जिल्ह्यातही रक्तदान शिबिरांची संख्या घटली आहे. उत्सव काळात रक्तदान शिबिर घेण्यासाठी अनेक मंडळांनी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. कोविड-19च्या नियमावलीनुसार या शिबिराचं आयोजन करण्यास प्रशासनाने परवानगी दिली तर अनेक कार्यकर्ते रक्तदान शिबिरं घेण्याच्याही तयारीत आहेत.
***
खाण्याचा सोडा आणि घरच्या घरी विसर्जन
घरच्या घरीच गणपती विसर्जन करा अशी जनजागृती करत कोल्हापुरातील टीम गणोशचे (कोल्हापूर गणोशोत्सव 2020) समन्वयक प्रशांत मंडलिक हे एक वेगळी कल्पना मांडत आहेत.खाण्याचा सोडा (अमोनियम बायकार्बेनेट) वापरून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणोशमूर्तीचेही घरीच विसर्जन करा, असं ते म्हणतात.घरी गणोश विसर्जन करायचं तर पीओपीच्या मूर्तीच्या विसर्जनाचं काय, असा प्रश्न घेऊन त्यांनी लॉकडाऊनच्या काळात बरीच शोधाशोध केली. नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे डॉ. मोहन डोंगरे आणि डॉ. शुभांगी उंबरकर यांनी खायचा सोडा वापरून मूर्ती विरघळविण्याचा प्रयोग 2क्15 मध्ये यशस्वी केल्याची माहिती त्यांना मिळाली.प्रशांत आणि त्यांचे मित्र प्रमोद पुंगावकर यांनी पीओपीपासून बनविलेल्या मूर्तीचे खायचा सोडा वापरून विसर्जन करण्याचा प्रयोग करून पाहिला. मूर्ती विरघळते हे लक्षात आल्यावर त्यांनी यासंदर्भात जनजागृती करायचं ठरवलं.पर्यावरणपूरक प्रात्यक्षिकाचा व्हिडिओ करून त्यांनी तो सोशल मीडियात टाकला.प्रशांत सांगतात, प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती खाण्याचा सोडा घातलेल्या पाण्यात ठेवून त्यावर या द्रावणाचा अभिषेक केला तर मूर्ती 72 ते 12क् तासांत विरघळते. त्यापासून प्लॅस्टर ऑफ पॅरिस, गवत, रंग व अन्य घटक सुटे होतात. मूर्ती विरघळल्यानंतर भांडय़ातील पाण्याचे अमोनियम सल्फेटमध्ये, तर पीओपीचे कॅल्शियम कार्बानेटमध्ये रूपांतर होते. हे पाणी झाडांना खत म्हणून घालता येतं तर प्लॅस्टर हे रस्ते बांधणीसाठी वापरता येतं. पीओपीची मूर्ती नदी, विहिरीत विसर्जित केल्यास पाणी प्रदूषित होतं. ते टाळलं पाहिजे. पीओपीची मूर्ती बसवलीच तर त्याचं घरीच विसर्जन करणं गरजेचं आहे.