शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जे गेमर्सची दुनियाच बदलून टाकेल का गुगली स्टॅडिआ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 07:15 IST

गेमर्सच्या भन्नाट जगात गुगलनं नवं तंत्रज्ञान आणलं आहे.

ठळक मुद्दे हार्डकोअर गेमर्सना खास डोळ्यासमोर ठेवून गुगलनं आणलं आहे

- प्रसाद ताम्हनकर

‘गेमर्स वर्ल्ड’ अर्थात व्हिडीओ गेम्स खेळणार्‍यांचं विश्व. हा एक अद्भुतच प्रकार आहे. व्हिडीओ गेम्ससाठी दिवस दिवस ठाण मांडून बसणारे आणि वेळेला खिशातले पैसे खर्च करून त्या गेम्ससाठी लागणार्‍या अ‍ॅक्ससरीज ऑनलाइन खरेदी करणारे अनेक महाभाग आता आपल्या आजूबाजूलादेखील सर्रास दिसू लागले आहेत. पबजी खेळासाठी लोकं  कुठल्या थराला जात आहेत, हे तर आपण रोजच बघत आणि वाचत आहोत. अर्थात, हा सगळा भाग एका बाजूला आणि गेम इंडस्ट्रीचे उत्पन्न एका बाजूला. या उद्योगात अनेक दिग्गज कार्यरत आहेत आणि नव्या नव्या तंत्नज्ञानाची मदत घेत इथे रोज काही नवीन उत्पादनदेखील आणलं जात आहे. मात्न गुगलसारख्या मातब्बर कंपनीने आपल्या ‘स्टॅडिआ’द्वारे या क्षेत्नात भक्कम पाऊल टाकलं आणि या उद्योगात एकच खळबळ उडाली.गुगलचं आगमन हे या उद्योगासाठी संधी आहे की संकट आहे, यावरती तज्ज्ञांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे स्टॅडिआच्या मदतीने गेम उद्योगाचं चित्नच बदलण्याची ताकद गुगलमध्ये आहे. दुसरं म्हणजे स्टॅडिआ उत्पादन करतेवेळी अभ्यासासाठी ज्या प्लॅटफॉर्मचा आणि डेटाबेसचा वापर करण्यात आला ते यू-टय़ूब हादेखील गुगलच्या मालकीचाच भाग आहे. 2018 या एका वर्षात यू-टय़ूबवरती तब्बल 50 बिलियन एवढे तास जगभरातून गेम आणि त्याच्याशी निगडित व्हिडीओ बघण्यात गेले. यावरून गेमर्सच्या या विश्वाची कल्पना यावी.गुगलच्या या उत्पादनाला गेमिंग विश्वाचं भविष्य म्हणून बघितलं जात आहे. स्टॅडिआच्या माध्यमातून सध्या प्रचलित असलेल्या सर्वच खेळसाधनांची परिभाषाच बदलून जाणार आहे. सध्या तुम्हाला एखादा गेम खेळायचा असेल तर थेट दुकानातून किंवा ऑनलाइन खरेदी करून तुम्हाला त्याचा आनंद घेता येतो. मात्न स्टॅडिआच्या माध्यमातून ग्राहक थेट कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती कोणत्याही खेळाचा आनंद सहजपणे घेऊ शकणार आहे. आता एखादा यू-टय़ूब यूजर ज्याप्रमाणे एखादा व्हिडीओ अपलोड करतो आणि इतर त्याचा आनंद घेतात, अगदी तशाच प्रकारे एखादा खेळाडू आपल्या गेमच्या ‘वॉक थ्रू’ला अपलोड करू शकणार आहे. हे अपलोड बघत असताना, ज्या कोणी स्टॅडिआच्या माध्यमातून हा गेम पूर्वी आपल्या स्टॅडिआमध्ये सेव्ह फाइलच्या रूपात ठेवलेला आहे, तो सरळ त्या अपलोड गेममध्ये प्रवेश करून या खेळाचा हिस्सा बनू शकणार आहे. या जबरदस्त तंत्नज्ञानाने गेम इंडस्ट्रीला एका वेगळ्याच टप्प्यावरती आणून उभं केलं आहे. यामुळेच गुगलचं हे तंत्नज्ञान थक्क करणारे असलं तरी क्रिएटिव्हिटीला मारक असल्याचं मत तज्ज्ञांचं मत आहे.1080स्र ॅ1ंस्रँ्रू2 ं3 60ास्र2 आणि र3ं्िरं 6्र’’ 24स्रस्र13 4 ं3 60ास्र2 6्र3ँ ऊफ ंल्ल ि24114ल्ल ि24ल्ल िही ठळक माहितीच स्टॅडिआच्या जबरदस्त तंत्नज्ञानाची कल्पना देणारी आहे. आता भविष्यात लॅपटॉप, डेस्कटॉप, एक्सबॉक्स आणि प्ले स्टेशन्स यांना हद्दपार करून स्टॅडिआ त्यांची जागा घेऊ शकेल का, हे बघणं मनोरंजक ठरणार आहे. स्टॅडिआच्या आगमनाने गेम इंडस्ट्रीमध्ये आताच दोन तट पडल्याचं चित्न असून, स्टॅडिआच्या आव्हानाला परतवताना इतर कंपन्यादेखील नवे तंत्नज्ञान अवलंबतील, या क्षेत्नात नवीन संधी उपलब्ध होतील असं मत आहे. अर्थात, स्टॅडिआच्या समोर कोणी उत्पादक तग धरू शकेल काय? या शंकेनं अनेक लोक धास्तावलेलेदेखील दिसतात. हार्डकोअर गेमर्सना खास डोळ्यासमोर ठेवून आपलं उत्पादन बाजारात गुगलनं आणलं आहे. हे गेमर्स त्याला किती भुलतात यावर स्टॅडिआचं भविष्य अवलंबून आहे.