शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जुनाट कुंड्यांचा फ्रेश मेकओव्हर

By admin | Updated: April 2, 2017 06:59 IST

नुसते झाडंच नाही तर झाडाच्या कुंड्याही पाहणाऱ्याला आनंद देवू शकतात. फक्त त्यासाठी जुनाट आणि मातकट कुंड्याचं रूपडं तेव्हढं बदलता यायला हवं.

 नुसते झाडंच नाही तर झाडाच्या कुंड्याही पाहणाऱ्याला आनंद देवू शकतात. फक्त त्यासाठी जुनाट आणि मातकट कुंड्याचं रूपडं तेव्हढं बदलता यायला हवं. घराच्या बाल्कनीत, टेरेसमध्ये, दिवाणखान्यात सुंदर फुलझाडं, इनडोअर प्लाण्ट्स लावून आपलं घर आपण ‘हराभरा’ करत असतो. त्यामुळे घर प्रफुल्लित होतं हे खरं. मात्र ज्या कुंड्यांमध्ये ही झाडं आपण लावतो, त्या कुंड्या मात्र त्याच त्या रंगातील, मातकटलेल्या अवतारात असतात. आता या कुंड्याचाही ‘वॉव’ म्हणण्या इतपत मेकओव्हर करता येतो. 1) कुंड्यांना प्लेन सोनेरी रंगात रंगवा. सोनेरी रंगाचा एक आपला रूबाब अन मिजास असतो. तो आपोआपच कुंडीला रॉयल लूक देतो. 2) डेपॉज पद्धतीनं कुंडी सजवा. यासाठी मॉड पॉज नावाचा ग्लू मिळतो. तो वापरु न ब्लॅक अ‍ॅॅण्ड व्हाईट स्ट्रिप्स असलेले फेब्रिक कुंडीवर चिकटवून टाका. कुंडीचा मॉडर्न मेकओव्हर मिनिटात होऊन जाईल.3) एखाद्या फ्लोरल प्रिंटच्या कापडावरील फक्त फुलं, पानं कापून घ्या. मॉड पॉज ग्लू वापरूनच ती कुंडीवर चिकटवा. मात्र चिकटवण्यापूर्वी कुंडीला क्र ीम, आॅफ व्हाईट अ‍ॅक्र ेलिक रंगाचा कोट बॅकग्राऊंड म्हणून द्या. फुलांचा बहर कुंडीत आणि कुंडीबाहेरही दिसेल.4) बांधकाम करताना वापरले जाणारे प्लॅस्टरही कुंडी डेकोरेट करु शकतो. त्यासाठी प्लॅस्टर आॅफ पॅरिस सूचनेनुसार पाण्यात मिक्स करा. त्यात काळा, ब्राऊन आणि हिरवा रंग घाला (प्रमाण अनुक्र मे 1:2:2), थोडी बारीक वाळू घाला. हातानं कालवा. या मिश्रणाचा थर कुंडीवर सर्व बाजूनं लावा. हा थर चांगला वाळू द्या. जास्तीचा थर सॅण्ड पेपरनं घासून काढून टाका. कुंडीला एकदम अ‍ॅण्टिक लूक मिळेल.5) कुंडीवर पांढऱ्या रंगाचा प्लेन कोट देऊन घ्या. चांगला वाळला की, सोनेरी रंगाच्या मार्करनं त्यावर रेषांच्या सहाय्यानं जाळीचे डिझाईन (हेरिंगबोन) साकारा. 6) सध्या तपमानाच्या पाऱ्याने सगळीकडेच चाळीशी ओलांडली आहे. अशा रणरणत्या उन्हात घरात सॉफ्ट लूक हवा असेल तर कुंड्यांना पेस्टल कलर्समध्ये (अगदी फिकट आकाशी, गुलाबी, क्र ीम) रंगवूून घ्या. रणरणत्या उन्हात नुसतं कुंड्याकडे बघूनही मग हायसं वाटतं. 7) एका कुंडीला प्लेन रंगात (शक्यतो ब्राईट कलर्स वापरा) रंगवून घ्या. नंतर टेराकोटाचीच प्लेट (डिनर प्लेट नाही), जी चिमण्यांकरिता पाणी ठेवण्यासाठी वापरतो तिलाही रंगवून घ्या. वाळल्यानंतर कुंडी पालथी घाला आणि त्यावर प्लेट पालथी घालून चिकटवून घ्या. कुंडीसाठी छान स्टॅण्ड तयार होईल!- सारिका पूरकर - गुजराथी