शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांचा तोडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 03:00 IST

आदिवासी भागात काम करताना लक्षात आलं, नुसते प्रश्न कळून उपयोग नाही, ते सोडवलेही पाहिजेत. त्यातून आम्ही रियूजेबल सॅनिटरी नॅपकिन बनवलं..

- डॉ. कुलभुषण मोरे/ नंदिनी मोरे

अर्थ ( एज्युकेशन अ‍ॅक्शन रिसर्च इन ट्रायबल हेल्थ) या ंसंस्थेद्वारे आम्ही चंद्रपूर जिल्ह्यातील जिवली या आदिवासीबहुल तालुक्यात काम करतो. आदिवासींच्या प्राथमिक आरोग्य सेवा, आरोग्य शिक्षण, आरोग्याच्या समस्या यासाठी काम करण्याचं ठरवलं. त्यावेळी आमच्या हातात सूत्र होतं, ‘आपलं आरोग्य आपल्या हातात’. या संकल्पनेवर काम करायचं म्हणून आम्ही गावातल्याच शिकलेल्या बेरोजगार मुला-मुलींना प्रशिक्षण दिलं. तेच गावासाठी आरोग्यदूत व आरोग्यसखी म्हणून काम करू लागले. या आदिवासी भागात आरोग्य स्वराज्य निर्माण व्हावं हा हेतू डोळ्यासमोर आहेच. याचाच एक भाग म्हणजे महिलांच्या मासिक धर्माच्या काळात कोणत्या समस्या येतात याचा अभ्यास आम्ही केला तर त्यातून काही धक्कादायक प्रकार लक्षात आले.काही शाळकरी मुली आणि कर्मचारी वर्ग मिळून फक्त ५% स्त्रिया या भागात सॅनीटरी नॅपकीन किंवा कापड वापरतात. बाकी ९५ टक्के आदिवासी महिला काहीच वापरत नाहीत. आरोग्यसखीच्या माध्यमातून आम्ही सर्वेक्षण केलं , मासीक पाळीमध्ये काय वापरता असं विचारलं तर अनेक मुली-महिलांनी आपण काहीही वापरत नाही असं सांगितलं. कापडही नाही. पाळीच्या दिवसात साडी खराब होते तेव्हा दिवसातून ३ ते ५ वेळा साडी बदलतो असं काहींनी सांगितलं. बाहेर जाता येत नाही मग काम बंद करुन घरीच थांबतो. घराबाहेर झोपतो असंही अनेकींनी सांगितलं.आरोग्य तपासणीत असंही दिसलं की स्त्रियांचं विविध आजारांचं प्रमाण खूप जास्त आहे. बहुसंख्य स्त्रियांना कोणते न कोणते लैंगिक आजार होते.रक्तप्रदर, श्वेतप्रदर, रक्तक्षय असे आजार तर अनेकींना झालेले होते. आरोग्य शिक्षणाचा अभाव हे त्याचं कारण. त्यात आरोग्याच्या सुविधांचा अभाव.आम्हाला नेमका प्रश्न कळला पण उपायही शोधायला हवा होता. प्रश्न होता महिलांना द्यायचं काय, सॅनिटरी नॅपकीन की कापडी नॅपकीन? मग आम्ही सखी स्वराज्य हा उपक्रम सुरु केला. आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची हे महिलांना सांगणं सुरु झालं. मासिक पाळीमध्ये घ्यावयाची काळजी आणि प्राथमिक आरोग्याबद्दल माहिती देणं सुरु केलं. गावागावांतल्या शिकलेल्या तरुणी/ स्त्रिया यांची ‘आरोग्य सखी’ म्हणून निवड केली. त्यांना प्रशिक्षण दिलं. आता त्या आरोग्यसखी आपापल्या गावात महिलांना माहिती देण्याचं काम करतात.मात्र तरीही एक प्रश्न होताच की या भागात सॅनीटरी नॅपकीन वापरा असं कसं सांगणार? कारण एकीकडे सॅनिटरी पॅडचं विघटन होत नाही, त्याचा कचरा ही समस्या. त्यात ते परवडण्याचा प्रश्न. मग कापडी सॅनिटरी का वापरु नये असं वाटलं.हे नॅपकिन हा धुतल्यानंतर उन्हात सुर्यप्रकाशात वाळवल्यावर पूर्णपणे स्वच्छ होतं. पुन्हा पुन्हा त्याचा वापर करता येतो.कापडी सॅनिटरी नॅपकीन ह्या कॉटनच्या असल्यानं ते वापरताना त्रास होत नाही. कापड नरम असल्यानं त्वचेवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. कापडी सॅनिटरी नॅपकीन हे रियुजेबल असल्यानं आम्ही ते बनवायचं आणि द्यायचं ठरवलं. ते पर्यावरणपूरकही बनवलं. एका समस्येवर आम्ही आमच्यापरीनं तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो आहोत..

kulbhushanmore@gmail.com