शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

पंचविशीत करायच्या 5 गोष्टी

By admin | Updated: October 15, 2015 17:36 IST

वयाच्या फार तर पंचविशीर्पयत आपण ‘फ्री’ असतो. नोकरी करून तातडीनं पैसे कमावण्याचं, लग्न करून ‘सेटल’ होण्याचं प्रेशर अनेकांवर नसतं.

 
वयाच्या फार तर पंचविशीर्पयत आपण ‘फ्री’ असतो. नोकरी करून तातडीनं पैसे कमावण्याचं, लग्न करून ‘सेटल’ होण्याचं प्रेशर अनेकांवर नसतं.
काहींवरचं ओझं ग्रॅज्युएशननंतर म्हणजे विशीनंतर वाढायला लागतं. पण तरी अनेकजण निदान वयाच्या पंचविशीर्पयत ब:यापैकी ‘फ्री’ असतात. मुक्त असतात. जबाबदा:यांचं ओझं नसतं आणि मनासारखं जगून घेण्याची संधी असते!
असं मनासारखं जगण्याची संधी सिनेमात मिळते. त्या ‘क्वीन’ सिनेमातल्या राणीला तर अपघातानंच मिळाली, तशी संधी आपल्याला काही मिळत नाही, ती आपल्याला मिळवावी लागते. तेव्हा जरा जगण्याचे काही स्पेशल अनुभव आपल्या गाठी लागतील. आता ज्यांना असं वाटतं की, कशाला जाऊ कॉलेजात, पाहू टीव्ही, जेवू-झोपू. कशाला उठाठेव. त्यांच्यासाठी हे सारं नाही.
पण ज्यांना वाटतं की, मस्त मुक्त जगावं, नवे अनुभव घेत नवीन जग पाहावं.
जगून घ्यावं त्यांच्यासाठी या पाच गोष्टी.
वयाची पंचविशी गाठण्यापूर्वी त्या कराच.
जेव्हा पन्नाशीत पोहचाल तेव्हा हेच दिवस फार सुंदर वाटतील.
 
1) एकटय़ानं राहा.
शक्य असेल तर एकदा तरी घरापासून, आईबाबांपासून, स्वत:च्या शहरापासून लांब राहून पाहा. एकटे राहा. जमल्यास स्वत:पुरते पैसे स्वत: कमवा. त्यासाठी पार्टटाइम नोकरी करावी लागली तरी चालेल! स्वत:ची जबाबदारी अशी स्वत: घेता आली की आपले सारे अॅटिटय़ूड गळून पडतात. नवा आत्मविश्वास मिळतो, धमक वाढते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरेवाईट अनुभव आपली नजर तयार करतात. हे ‘एकटं’ राहणंच आपल्याला सांगतं की, चांगलं वागलं नाही तर खड्डय़ात पडशील. त्यामुळे खड्डे टाळूनही नव्या वाटांवर चालण्याचं बळ यातूनच मिळतं.
 
2) प्रवास करा. भटका. वाट्टेल तसं.
बसू नका. चालायला लागा. हाच एक मंत्र. म्हणजे काय तर खूप भटका. पायी चाला, सायकलवर जा, बाईकवर जा, बसने जा. शक्यतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, शेअरिंग रिक्षा, बस, टमटम, टेम्पो जे मिळेल ते. त्यानं पैसे वाचतील, माणसं भेटतील. लांब जायचं नसेल तर  आपल्या गावात जा. गावातून तालुक्याला, तिथून जिल्हा. मग आपला देश पाहा. आणि जमलंच तर पैसे साठवून एक परदेश प्रवासही स्वत:च्या हिमतीवर करून या. बघा. काय काय भेटतं वाटेत ते!
3) जुने मित्र कशाला?
जुन्या मित्रंची दोस्ती घट्ट. आजही शाळेपासूनचेच मित्र माङयाशी बोलतात. हे ऐकायला चांगलं वाटलं, तरी ते अनुभव नवीन देत नाहीत. त्यामुळे आपल्या भाषेचे नसलेले, जातिधर्माचे नसलेले, प्रांताचे नसलेले मित्र करा. त्यांची दोस्ती नव्या गोष्टी सांगेल. नवीन संस्कृती दाखवेल, नवे पदार्थ खाऊ घालेल. हे सारं नवीन असेल. त्यामुळे त्याच त्या दोस्तांचं वतरुळ सोडा, नवे मित्र करा.
4) कार्यकर्ते व्हा.
म्हणजे काय तर जवळच्याच एका सामाजिक संस्थेत, उपक्रमात भाग घ्या. तिथं काम करून पाहा. त्यानिमित्तानं कामाचा अनुभव तर मिळेलच, पण आपल्या नजरेचे परीघही बदलतील. नवी माणसं दिसतील. ओळखी होतील. त्यामुळे नाटक करा, पथनाटय़ करा, वेगळ्या उद्योगांना भेटी द्या. समजून घ्या, जेवढं जमेल तेवढं, जमेल तसं!
5)  विसरून जा.
म्हणजे काय तर आपण कसं भारी काहीतरी करतोय याचे पाढे फेसबुक-व्हॉट्सअॅपवर वाचू नका. तेच ते शेअरिंग करू नका. झालं ते विसरून जा. चांगले वाईट अनुभव अगदी व्यक्तिगतही असतील तरी ते विसरून जा. आणि मुक्त मनानं नवनवे अनुभव घेत रोज नवीन काहीतरी करून पाहा.
अगदी चित्र काढा, गाणं म्हणा, सायकलिंग करा, झाडं लावा.
पण जे काल केलं, त्यापेक्षा वेगळं काही आज करून पाहा..
निशांत महाजन