शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

फायर थेरपी - सुंदर दिसण्यासाठी व्हिएतनामी तारुण्याचा आगीशी खेळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 13:34 IST

सुंदर दिसण्यासाठी काय वाट्टेल ते करताहेत तरुण मुलं.

ठळक मुद्देव्हायरल फॅड किती महागात पडू शकतं, याचं एक उदाहरण.

- निशांत महाजन

फायर थेरपी.हे दोन शब्द एकत्र वाचतानाही खटकतात. मात्र सध्या सोशल मीडियाला हादरवून टाकणारा आणि जगात ज्याची भयंकर चर्चा आहे, असा एक नवीन ट्रेण्ड आहे. सुंदर दिसण्यासाठी तरुण मुलंमुली काय वाट्टेल ते करू शकतात याचं हे एक ताजं आणि अत्यंत वेडगळ उदाहरण आहे.ही गोष्ट आहे व्हिएतनाममधली. मात्र ती व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे जगभर पोहोचली. आणि अनेकजणांना तिकडे अमेरिकेतही वाटलं की, हे प्रकरण तरुण होण्यासाठी काय आहे ते करून पाहावं. व्हायरलची साथ आताशा जगात पसरायला वेळ लागत नाही. त्यातलाच हा एक अचाट प्रकार.तरुण मुलं एकमेकांना डेअरिंग आव्हान देतही काही ठिकाणी हे फायर थेरपीचं चॅलेंज देत सुटली.आणि ही फायर थेरपी कशासाठी तर तरुण-तजेलदार-चमकदार चेहरा दिसण्यासाठी. आणि त्यापायी अनेकजण आगीवर चेहरा धरू लागले आहेत. काही हेल्थकेअर सेंटर्सनी तर त्यासाठीची जाहिरातबाजीही सुरू केली. हो चिन मिन्ह या शहरात तर काही स्पा, ब्यूटी सलोन यांना त्यासाठीची रितसर लायसन्स देण्यात आली.आणि त्यातून आपला चेहरा आगीवर धरायला अनेक तरुण-तरुणी सरसावले. नुस्त तरुण चेहरा दिसणंच नाही तर फटीग, आजारपण, डोकेदुखी यासाठीही काहीजण हा प्रयोग स्वतर्‍वर करून घेऊ लागले.त्यातला प्रयोग काय तर भगभगत्या आगीवर आपलं डोकं धरायचं, डोकं म्हणजे खरं तर चेहराच. डोळे घट्ट मिटायचे. आणि 30 सेकंद ते 1 मिनिट एवढा कालावधी चेहरा आगीवर धरायचा आणि बाजूला झालं की दारूत भिजवलेला टॉवेल चेहर्‍याभोवती घट्ट लपेटून घ्यायचा.वाचताना हा अवधी कमी वाटतो. पण तोंड पोळणं, भाजणं, चटके बसणं, डोळ्यांना इजा असे काही अपायही त्यातून झालेच.आता या ट्रेण्डची जेव्हा जगभर चर्चा झाली तेव्हा व्हिएतनाममध्ये आणखी एका चर्चेला तोंड फुटलं, ते म्हणजे सुंदर दिसण्यासाठी इतका आटापिटा का?त्यासाठी तरुण मुलामुलींचं काउन्सिलिंग सुरू झालं. आपण आहोत ते सुंदरच आहोत, आपली त्वचा सुंदर आहे हे पटवून देण्यासाठी चळवळी सुरू झाल्या.पण त्यांना फारसं यश लाभलेलं नाही. उलट त्यातून अजून मुलंमुली यासारख्या प्रयोगांकडे खेचले गेले, अशी चर्चा सुरू झाली.जगभर सौंदर्याच्या बाजारपेठा तरुण मुलामुलींच्या डोक्यात जे भरवत सुटल्या आहेत, त्याची ही भयंकर फळं आहेत.