शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

आता बोटावर पासवर्ड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 18:31 IST

पासवर्ड आठवत नाही, हॅक होतं, यावर भलतंच भारी उत्तर तंत्रज्ञान देतंय; पण धोका त्यातही आहेच.

- प्रसाद ताम्हनकर

बार्सिलोना शहरात सुरू असलेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये गुगलतर्फेनुकतीच अ‍ॅण्ड्रॉइड यूजर्ससाठी एक खास घोषणा करण्यात आली आहे. गुगल अ‍ॅण्ड्रॉइडची 7.0 (नोगट) आणि त्यावरची आवृत्ती वापरणार्‍या यूजर्सला आता प्रत्येक अ‍ॅप, गेम अथवा ई-मेलसाठी स्वतंत्रपणे लॉग इन करण्याची गरज असणार नाही. तसं बघायला गेलं तर जगभरातच अनेक सामान्य संगणक वापरकर्ते ’पासवर्ड’ या शब्दाशी आले की जाम अडखळतात. पासवर्ड विसरणं, पासवर्ड हॅक होणं हे सारं सर्रास घडतं. अनेकांना पासवर्ड आठवतच नाही ही अडचण आहे. कित्येक लोकांचे पासवर्ड तर इतके साधे असतात की त्यांना ओळखणारा कोणीही जवळचा मनुष्य पाच-दहा वेळा अंदाज लावून त्यांचा पासवर्ड सहज सांगू शकतो. लोक पासवर्ड म्हणून सहसा काय ठेवतात तर गाडीचा नंबर, मुला-मुलीचं नाव किंवा जन्मतारीख हे आकडे अनेक लोक सर्रास पासवर्ड म्हणून वापरतात. ते का वापरतात तर चटकन आठवतात म्हणून; पण त्यामुळेच ते हॅकर्सचे शिकार बनतात. अनेक लोक आपल्या विविध खात्यांना, ई-मेल्सना, बँकांना एकच पासवर्ड ठेवतात. उगीच विसराला नको असा भोळसट भाव त्यात असतो. मात्र असं करून आपण किती प्रचंड धोका पत्करत असतो याचा त्यांना अंदाजच नसतो. आज जगभरात विविध वेबसाइट्सवर डल्ला मारून प्रचंड मोठय़ा प्रमाणात पासवर्ड पळवले जात आहेत. अनेक खात्यांमधून परस्पर पैसे लांबवले जात आहेत. अशावेळी पासवर्डबाबत सावधगिरी बाळगणं अत्यंत आवश्यकच आहे. अलीकडेच झालेली गुललची नवी घोषणा स्वागतार्हच आहे. मात्र तज्ज्ञांकडून या तंत्रज्ञानाचे फायदे आणि असल्यास तोटेदेखील लवकरच समोर येतील.तर स्वतंत्र लॉग इन करण्याची गरज नाही असं गुगल म्हणतं, पण त्याला पर्याय काय आहे?तर ‘फिडो 2’ सोबत यासाठी गुगलने करार केला आहे. फिडो 2 च्या मदतीनं पासवर्डचा वापर न करता आता यूजर फिंगर प्रिंट स्कॅनर, स्क्रीन लॉक किंवा रेटीना स्कॅन सारख्या एखाद्या ऑथेण्टिकेशन तंत्राचा आपला पासवर्ड म्हणून वापर करू शकणार आहे. समजा यूजरने फिंगर प्रिंट स्कॅनच्या मदतीने आपला मोबाइल सुरू केला तर त्यानंतर त्याला फोनवरील कुठलीही सेवा उदा. गुगल मेल, फेसबुक अथवा विविध अ‍ॅप किंवा क्र ोम, गेम्स इ. वापरताना पुन्हा पुन्हा लॉग इन करण्याची गरज असणार नाही. म्हणजे बोट लावलं, फिंगर प्रिंट स्कॅन केलं की सगळी कुलूपं उघडतील. फिगर प्रिंट स्कॅनरला एखाद्यानं मोबाइल जोडलेला असेल आणि न कळत असा फिंगर प्रिंटच्या मदतीनं उघडलेला फोन आपण कोणाच्या हातात दिला तर त्याला आपल्या फोनमधले सगळेच दरवाजे उघडे मिळतील. सगळी सिक्रेट माहिती दुसर्‍याला मिळेल, हेही लक्षात ठेवलेलं बरं!