शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर
2
CAA, आरक्षण अन् राम मंदिराचा निर्णय..; PM नरेंद्र मोदींनी दिल्या 5 गॅरंटी
3
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
4
"रायबरेलीत कमळ फुलवा, ४०० चा आकडा आपोआप पार होईल", काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अमित शाहांचा हल्लाबोल
5
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
6
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
7
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
8
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
9
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
10
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
11
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
12
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
13
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
14
MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा
15
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
16
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
17
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
18
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
19
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
20
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला

फॅशन 4 ever, स्वत:चं स्टाईल स्टेटमेण्ट घडवण्याचा फॅशनेबल प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 2:23 PM

- अदिती मोघेअनेकदा सिनेमामध्ये अशी गोष्ट असते..एक साधी भोळी बावळट मुलगी असते. चष्मा लावणारी, वेण्या घालणारी, चारचौघांमध्ये बोलायला घाबरणारी आणि अर्थातच अजिबात लक्ष न वेधून घेणारी.पण मग तिच्या आयुष्याला कलाटणी मिळते आणि सुरवंटाचं फुलपाखरू होतं..तिची हेअर स्टाईल बदलते, कपडे बदलतात, ती फाडफाड इंग्रजी बोलायला लागते, तिच्यात एक वेगळाच आत्मविश्वास येतो.थोडक्यात ...

- अदिती मोघे

अनेकदा सिनेमामध्ये अशी गोष्ट असते..एक साधी भोळी बावळट मुलगी असते. चष्मा लावणारी, वेण्या घालणारी, चारचौघांमध्ये बोलायला घाबरणारी आणि अर्थातच अजिबात लक्ष न वेधून घेणारी.पण मग तिच्या आयुष्याला कलाटणी मिळते आणि सुरवंटाचं फुलपाखरू होतं..तिची हेअर स्टाईल बदलते, कपडे बदलतात, ती फाडफाड इंग्रजी बोलायला लागते, तिच्यात एक वेगळाच आत्मविश्वास येतो.थोडक्यात काय तर मुलगी फॅशनेबल होते आणि जग जिंकते..फॅशन हा शब्द, ही कल्पनाच निर्माण झाली वेस्टर्न कल्चरमध्ये. लॅटिनमधून फ्रेंचमधून इन्व्हॉल्व्ह होत इंग्रजीमध्ये फॅशन हा शब्द आला, ज्याचा भर आहे पेहेरावातले बदल सांगण्याकडे.इतिहासातले जे वेस्टर्न ट्रॅव्हलर्स होऊन गेले, जे युरोपमधून इतर देशांची संस्कृती, पद्धती, इतिहास, साहित्य यांचं निरीक्षण करत फिरायचे, त्यांना ईस्टर्न देशांमध्ये फॅशन किंव्हा ट्रेंड्समधले बदल सापडायचेच नाहीत. पुरवून वापरणं यावर विश्वास असलेल्या चीन, जपान, भारत अशा देशांमध्ये अनेक वर्षं कापड किंवा कपडे याकडे एकाच प्रकारे बघितलं जातं हे त्यांना जाणवलं.पूर्वेकडच्या संस्कृतीचं नियमांशी वाकडं आहे. साडी किंवा धोतर हे याचं सगळ्यात साधं उदाहरण असेल. हलके, सुटसुटीत आणि सगळ्यांना शोभेल असे कपड्यांचे पर्याय आहेत ते. पण आपल्या मॉडर्न इतिहासात इंग्रजांनी पाय टाकला आणि त्यांच्या मागोमाग मग फॅशनची त्यांना योग्य वाटेल ती व्याख्या आली आणि तेव्हापासून गोष्टी बदलत गेल्या.खरं तर फॅशनपेक्षा महत्त्वाचा असतो तो स्वत:कडे बघायचा दृष्टिकोन. आपल्याला आसपास असे अनेक लोक दिसतात, ज्यांना स्वत:बद्दल आदर आहे, प्रेम आहे आणि ते स्वत:ला कमाल कॅरी करतात, मग कपडे कुठलेही असोत. मध्यंतरी रणवीर सिंग टेक्निकली ज्याला स्कर्ट म्हणता येईल अशा पेहरावात ऐटीत वावरला की !सध्या क्रॉस ड्रेसिंगबद्दल खूप बोललं जातं. क्रॉस ड्रेसिंग म्हणजे काय तर प्रत्येक समाजामध्ये स्त्रियांनी असे कपडे करायचे आणि पुरुषांनी अमुक अमुक पद्धतीने याचे काही अलिखित नियम बनत गेलेले असतात. ते नियम फाट्यावर मारून पुरुषांनीसुद्धा स्त्रियांसारखं आणि स्त्रियांनी पुरुषांसारखं अपीअर व्हायचं. नियम मोडायला, बंड करायला, निषेध व्यक्त करायला माध्यम म्हणून क्रॉस ड्रेसिंगकडे बघितलं जातं.फॅशन हा विषय बाह्य बदलांबद्दलचा आहे. सोशल मीडियाने व्यापून टाकलेल्या या जगात आपण रात्री झोपतानाही फॅशनेबल असायचं आहे, एअर पोर्टला जातानाही कंफी दिसणारे कपडे घालायचे आहेत, सोलो ट्रॅव्हल करताना हिप्पी वाटू असे कपडे घालायचे आहेत, ब्लॅक लिटिल ड्रेस प्रत्येक मुलीला हवा आहे, आणि लग्नामध्ये अनुष्कासारखा, सब्यसाचीने डिझाइन केलेला लेहेंगा घालायचा आहे.पण आपण अशा ठिकाणी जन्माला आलेलो आहोत जिथे ‘काय भुललासी वरलिया रंगा’ असं संत म्हणून गेलेत.आतून जे कूल आहेत असे लोक, त्यांनी काहीही घातलं तरी ते ‘हॉट’ दिसणार असतातच.

कूल बनते कैसे है?त्या कूलनेसच्या फॅशनचे नियम सोपे आहेत आणि ते कधीच बदलत नाहीत.१) अपने अंदर की आवाज सुनो. जे घातल्यावर आपल्याला आरशात बघून छान वाटतं, आपण आपल्याला आवडतो ते घालावं.२. सबकी सुनो, अपनी करो. डोळे आणि कान उघडे ठेवून जगाकडे पाहिलं की त्यात कुठेतरी काहीतरी आपल्या झोनचं सापडत राहतं अधेमधे.३. नेव्हर से नेव्हर. कुठल्याच आयडिया माझ्यासाठी नाहीत असं ठरवून टाकू नये. जी गोष्ट पाच वर्षांपूर्वी आपल्याला आवडली नसेल, तीच गोष्ट पाच वर्षांनी आपल्याला कडकसुद्धा वाटू शकते.४. जगातले फेमस लोक हे ठळकपणे उठून दिसतात. त्याला कारणीभूत त्यांची पर्सनॅलिटी असते, कपडे नव्हेत.५. जेलमध्ये कैद्याचे कपडे घालूनसुद्धा जेव्हा अमिताभ म्हणतो ‘हम जहाँ खडे होते हे, लाइन वहीं से शुरू होती है’ तेव्हाही तो भारीच दिसतो.ते क्रेडिट अमिताभच्या निडर पर्सनॅलिटीचं असतं. हे कळणं ही ‘फॉरेव्हर फॅशनेबल’ असण्याच्या मार्गावरची पहिली पायरी आहे.

(एकटीनं भटकत जग पाहायची हौस असलेली अदिती सुप्रसिद्ध पटकथा लेखक असून, तिचा स्वत:चा साडी डिझायनिंगचा ब्रॅण्ड आहे.)