शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

गूगल अलर्टचा निर्माता करतोय शेती

By admin | Updated: June 16, 2016 12:32 IST

त्याचं नाव नागा कटारू. तो ‘गूगल अलर्ट’चा निर्माता आहे. पण डोक्यातला ‘किडा’ त्याला शांत बसू देईना... शेवटी त्याने निवडली ‘वेगळी’ वाट!

गूगलमध्ये नोकरी करायला कोणाला आवडणार नाही? नागा कटारूदेखील आयआयटीचं शिक्षण पूर्ण केल्यावर २००० साली ‘गूगल एम्प्लॉयी’ झाला. मात्र काही तरी नवीन आणि वेगळे करण्याची ओढ होती म्हणून त्यानं गूगलची नोकरी सोडून आयुष्याला नवीन वळण दिलं. सध्या तो कॅलिफोर्नियामध्ये बदामाची शेती करतो. आंध्र प्रदेशमधील गम्पालगुडेम हे नागा कटारूचे गाव. नव्वदच्या दशकात (किंबहुना आजही!) जशी गावांची स्थिती होती तशीच गम्पालगुडेमचीही होती. शिक्षणाच्या बाबत मागासलेलं ते गाव. हजेरीपटावरील केवळ अर्धेच मुलं रोज शाळेत हजर राहत असत.नागा सांगतो, शिक्षण घेणं हे गावासाठी ‘पर्यायी’ किंवा ‘ऐच्छिक’ होते. परंतु माझे वडीलच शाळेचे हेडमास्तर असल्यामुळे मी शिकावं असा त्यांचा आग्रह होता. लहानपणापासून अभ्यासात हुशार नागाने पदवीसाठी ‘कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग’ची निवड केली. पुढे त्यानं आयआयटीमध्ये प्रवेश घेतला. ‘आयआयटी’नंतर त्याची गूगलमध्ये निवड झाली. तंत्रज्ञान हेच भविष्य असणार याची जाणीव ठेवून तिथं तो विविध प्रयोग करू लागला. एका ‘आउट आॅफ द बॉक्स’ विचारातून त्याला गूगल अलर्टची कल्पना सुचली. लोक एखाद्या गोष्टीविषयी जाणून घेण्यासाठी गूगलवर सर्च करतात. पण जर गूगलने स्वत:हून ती माहिती इंटरनेटवर उपलब्ध झाल्यावर तत्काळ यूजर्सपर्यंत पोहचवली तर? याच तत्त्वावर त्यानं ‘गूगल अलर्ट’चा प्रोटोटाईप बनवला.सर्वात आधी त्याने जेव्हा ही संकल्पना त्याच्या बॉससमोर मांडली तेव्हा त्याने ती साफ फेटाळून लावली. त्याचं म्हणणं होतं की, ‘आपण जर यूजर्सना स्वत:हून माहिती पुरवली तर ते कशाला गूगलवर सर्च करतील? अशाने कंपनीचा व्यवसाय कसा होणार?’मात्र या नकारामुळे नागा खचून गेला नाही. स्वत:च्या संकल्पनेवर त्याचा पूर्ण विश्वास होता. तो थेट कंपनीचे संस्थापक सर्गेय ब्रिन आणि लॅरी पेजकडे गेला. त्यांना ‘गूगल अलर्ट’ची संकल्पना समजावून सांगितली. दोघांनाही ती खूप आवडली. त्याचं पेटंटही नागाला मिळालं. २००३ मध्ये ‘गूगल अलर्ट’ लाँच झाल्यापासून कोट्यवधी लोक त्याचा वापर करत आहेत.डोक्यात जेव्हा विचारांचं काहूर माजू लागलं तेव्हा त्यानं नोकरीचा राजीनामा दिला आणि माहितीपट निर्मिती आणि ‘प्रयोगशील’ नाट्यक्षेत्रात उडी घेतली. काही काळ तेथे काम केल्यानंतर त्याने पुन्हा ‘गिअर’ बदलण्याचा निर्णय घेतला. कॅलिफोर्नियातील मोडेस्टो येथे २००८ साली त्याने ३२० एकर शेती विकत घेतली. तो सांगतो, ‘सुरुवातीला शेती करण्याचा माझा विचार नव्हता. एक गुंतवणूक म्हणून मी जमीन खरेदी केली होती. मला वाटलं पाच वर्षांनंतर जास्त किमतीत ती विकून टाकू. पण डोक्याचं चक्र पुन्हा फिरलं. ही शेतजमीन बालपणाची आठवण करून देऊ लागली. म्हणून ‘फुलटाइम’ बदामाची शेती करण्याचं ठरवलं.’पण शेती कशी करतात याची त्याला काहीच कल्पना नव्हती. मग सुरू झालं शेतीचं शिक्षण. कोणतीही गोष्ट इच्छा असेल तर शिकता येते यावर त्याचा दृढ विश्वास. मेहनत आणि अभ्यास करून त्यानं शेतीचं तंत्र शिकून घेतलं. अक्षरश: घाम गाळून त्यानं बदामाच्या शेतीत नफा मिळवून दाखविला. आज तो शेतीतून दरवर्षी २.५ मिलियन डॉलर्सचे (१६.७ कोटी रुपये) उत्पन्न घेतो. एवढे करूनही नागा शांत बसण्याच्या मूडमध्ये नाही. आता त्यानं स्वत:समोर नवीन ‘चॅलेंज’ ठेवले आहे. ते चॅलेंज म्हणजे शेतीला अधिक टेक्नोसॅव्ही करणं ! केवळ कुतूहल आणि उत्सुकता कायम ठेवली म्हणून नागा आता एक वेगळा प्रवास करत मजेत जगतो आहे!- मयूर देवकर