शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

FAKE NEWS फॉरवर्ड क-रो-ना! देशासाठी काही करायचं तर एवढं करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 19:14 IST

आला व्हिडीओ की पाठव पुढे? तो खराच आहे असं समजून करा बडबड. तेच काम दिवसभर. ढकलगाडीला दे धक्का. मात्र असं करून आपण कोरोनासारखेच समाजाला घातक ठरतोय फेक न्यूज, फे क व्हिडीओ, फोटो पाठवून समाज पोखरतोय हे लक्षातही येत नाही.

ठळक मुद्देनो फॉरवर्ड, हाच आपला मंत्र!

मयूर देवकर

कोरोना ! कोरोना !! कोरोना !!!सगळीकडं एकच विषय आणि एकच भीती.बाहेर तेच, घरात तेच, टीव्हीवर तेच, फेसबुकवर तेच, व्हॉट्सअॅपवर तेच, फोनवरील गप्पांमध्येसुद्धा तेच. कोरोनाविषयी सजगता कमी आणि भीतीच जास्त पसरत आहे. त्यामुळे प्रश्न पडतो की, कोरोना अधिक धोकादायक की, कोरोनाची भीती? देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं पडलं की, कोरोनाच्या संसर्गापेक्षा कोरोनाच्या भीतीनेच लोक अधिक मरतील.बरं ही भीती कशी निर्माण होते?फेक न्यूज हे त्याचं उत्तर. आपल्या सगळ्यांच्याच मनात कोरोनाबद्दल जास्तीत जास्त माहिती जाणून घेण्याची उत्सुकता आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपसह विविध सोशल मीडियावरून माहितीचं आदानप्रदान जोरात सुरू आहे. माहितीचा ‘अतिसार’ म्हणजे जुलाबच म्हणू हा शब्द यासाठी चपखल आहे. इन्फॉर्मेशन डायरिया.याची बाधा आपल्यापैकी अनेकांना झाली आहे.विषाणू आणि फेक न्यूजमध्ये खूप साधम्र्य आहे.विषाणू रोगप्रतिकारशक्तीवर हल्ला करतो तर, फेक न्यूज आपल्या विचारशक्तीवर. दोन्हींचा प्रसार करण्यासाठी आपणच वाहक म्हणून काम करतो.आणि लागण सुरूच राहते.म्हणजे पाहा, तुम्हाला मेसेज येतो की, चहा प्याल्याने किंवा गरम पाण्याच्या गुळण्या केल्याने कोरोना मरतो.मेसेज खरा वाटावा म्हणून त्यात जुजबी शास्त्रीय माहितीचा आभास निर्माण केला जातो. आता समोर मृत्यूचे संकट उभे असल्यामुळे अशा मेसेजवर कोण विश्वास ठेवणार नाही? वरून सगळ्या ग्रुपमध्ये तो मेसेज दिसू लागतो. भीतीसमोर विचार करणारा मेंदूही हात टेकवतो. आणि जे जे खोटं आहे ते ते खरं वाटू लागतं. हे चक्र  असंच सुरू राहतं.

हे चक्र  तोडायचं कसं? 

तसं पाहायला गेलं तरं उत्तर फार सोपं आहे. पण ते कळण्यातून वळण्यार्पयत आपल्याला जावं लागेल.संयम ठेवणं. शांत राहणं.हा त्यावरचा एकमेव उपाय आहे.आणि अजून एक पथ्य म्हणजे आपण ‘आलं की धाड पुढं  संघटने’चे आजीवन मेंबरच आहोत. ती मेंबरशिप काढून घेऊ.व्हॉट्सअॅपवर आलेला मेसेज कधी पुढं सोडतो आणि कधी नाही असं होऊन जातं. हा फॉरवर्ड करण्याचा मोह फेक न्यूजच्या पथ्यावर पडतो. बघता-बघता ती सगळीकडे पसरते. ज्याची खातरी नाही, ते आपण फॉरवर्ड करायचं नाही. किंवा फॉरवर्ड करायचंच नाही, हे पथ्य पाळलेलं उत्तम.फेक न्यूजची साखळी आपण तोडू शकतो.त्यासाठी संयम आणि सावध राहणं, हेच आपलं काम आहे.जबाबदार नागरिक म्हणून आपण घरबसल्या तेवढं तरी केलं पाहिजे!

 

फॅक्ट चेकिंग कसं करायचं?

आताच्या घडीला दैनंदिन सुमारे 3 ते 4 हजार फेक बातम्यांची सत्य पडताळणी करण्याच्या रिक्वेस्ट आमच्याकडे येतात.यावरून लक्षात येईल की, फेक न्यूजचा किती सुळसुळाट आहे. त्यांची सत्य पडताळणी कशी करायची ते पाहू..1. मेसेज पडताळणी : व्हायरल मेसेजमधील माहितीचा इंटरनेटवर की वर्ड्सच्या माध्यमातून शोध घ्या. समजा मेसेज आला की, अमुक-अमुक शहरात कोरोनाचा पेशंट सापडला. तर सर्वप्रथम लोकल बातम्यांमध्ये अशी काही माहिती आहे का ते पाहा, स्थानिक आरोग्य विभागाकडे चौकशी करा. त्याशिवाय विश्वास ठेवू नका.2. फोटो पडताळणी : इटली किंवा चीनमधील म्हणून येणा:या फोटोंची पडताळणी गूगल रिव्हर्स इमेज सर्चद्वारे करा. त्यासाठी फोटो मोबाइलमध्ये सेव्ह करा. मग मोबाइल ब्राउझरमध्ये गूगल इमेज ही वेबसाइट उघडा. ब्राउझर सेटिंगमधून डेस्कटॉप मोड ऑन करा. आता सदरील फोटो अपलोड केल्यावर तो सर्वप्रथम कधी वापरला गेला, त्याचा संदर्भ काय होता आदी गोष्टी कळतील. 3. व्हिडीओ पडताळणी : व्हिडीओवर चटकन विश्वास बसतो, परंतु व्हिडीओ एडिट केलेला असू शकतो, सोयीने कापलेला असू शकतो. म्हणून व्हिडीओ एखादी गोष्ट विसंगत दिसतेय का (म्हणजे हल्ल्याचा व्हिडीओ आणि बघणा:यांची गर्दी वेगळी आहे का? कारण ती मॉकड्रिल असेल), गाडीचा नंबर, इमारत/रस्त्याचे नाव याकडे लक्ष द्या जेणोकरून व्हिडीओची जागा कळेल (म्हणजे इटलीचा व्हिडीओ  सांगितला जात असेल तर दुकानाच्या पाटय़ा स्पॅनिश भाषेतून का?). तसेच, इन-व्हिड टूलच्या माध्यमातून व्हिडीओची सत्यता तपासणी केली जाऊ शकते.  व्हिडीओतील की-फ्रेम्स निवडून याद्वारे सर्च केले जाते. परंतु, तांत्रिक गोष्टींच्या फंद्यात पडायचे नसेल तर सर्वोत्तम पर्याय म्हणजे अशा व्हिडीओंकडे दुर्लक्ष करणं.

फेक न्यूजचं चक्र कसं तोडता येतं?

1. स्रोत: सगळ्यात आधी पाहा की, व्हायरल मेसेजचा स्रोत (सोर्स) काय आहे. ‘माङया डॉक्टर काकांनी सांगितलं’ किंवा ‘माङया चीनमधील मित्रनं कळवलं’ अशा गोष्टी आपल्या फोनवर आल्या की सरळ डिलीटचं बटण दाबा. केवळ आरोग्य मंत्रलयाच्या किंवा जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाइटवरील माहितीलाच खरं माना.2. संदर्भ : ब:याच वेळा व्हायरल फोटो आणि व्हिडीओ जुने असतात. भलत्याच घटनांचे असतात.जात, धर्म, आजार, यासंदर्भात त्यात जे दाखवलं जातं, ते तसं नसतं. जे दिसतं तसं नसतं. त्यामुळेच फोटो/व्हिडीओंचे संदर्भ तपासा, त्याबद्दल खरी माहिती घ्या.  आंधळेपणाने पुढे पाठवू नका. नो फॉरवर्ड, नो त्यावरची चर्चा हे आपलं तत्त्व असलेलं बरं!

फेक न्यूजमुळे भारतासह जगभरात अनेकांना प्राण गमवावा लागला आहे. याचं भान बाळगून अनावधानानेसुद्धा फेक न्यूजच्या प्रसारामध्ये सहभागी होऊ नका. कोरोनासंबंधी कोणतीही चुकीची आणि खोटी माहिती तुमच्यापासून पुढे जाऊ देऊ नका.-राहुल नंबुरी, संचालक, फॅक्ट क्र ेसेंडो

भाभा अणुसंशोधन केंद्रामधील (निवृत्त) वैज्ञानिक पद्मश्री डॉ. शरद काळे सांगतात, ‘‘साथीच्या रोगात माणसाची सारासार विचार करण्याची प्रवृत्ती कमी होते. कारण तो घाबरलेला असतो. या घाबरलेल्या स्थितीत मनाला बरे वाटेल अशा कोणत्याही गोष्टीवर खरे-खोटे पडताळून न पाहतातो चटकन विश्वास ठेवतो.’’

(लेखक फॅक्ट केसेंडो या फोटो/व्हिडीओ फॅक्ट चेक करणाऱ्या  संस्थेत काम करतात.)