काश्मीरच्या ‘बॉर्डर’वर जगणा:या तरुण मुलांसाठी राबविल्या जाणा-या सैन्याच्या उपक्रमाचा एक लाइव्ह रिपोर्ट..
बॉर्डरवर जायचं. या दोन शब्दातच आपल्याला थ्रिल वाटतं. आपल्या देशाच्या समोर दुस:या देशाचा भूभाग, आणि आपल्या देशाच्या सीमारेषेवर आपण उभे; या भावनेनंच अनेकदा रोमांच उभे राहतात.
पण ते थ्रिल, त्या रोमांचापलीकडे आयुष्य किती खडतर आणि कर्तव्यतत्पर असू शकतं, याचं दर्शन काश्मीरच्या बॉर्डरवर गेलं की होतं ! महाराष्ट्रातील काही पत्रकारांनी हा जिवंत अनुभव नुकताच घेतला. जम्मूचा पूँछ जिल्हा आणि परिसरातील कायमच जागती, अस्वस्थ असलेली तिथली प्रत्यक्ष नियंत्रण रेषा. या नियंत्रण रेषेवर जाऊन तिथलं जगणं अनुभवताना अनेक वेगवेगळे विषय उलगडत गेले. आणि मुख्य म्हणजे हे जाणवलं की, अन्य कोणत्याही ठिकाणच्या लष्करापेक्षा जम्मू- काश्मीरमध्ये तैनात असलेल्या भारतीय लष्कराचं काम, त्याचं स्वरूप खूप भिन्न आहे. कारण इथे लष्कराला केवळ सीमेपलीकडच्या शत्रूचा सामना करायचा नाही, तर सीमेअलीकडच्या समस्याही सोडवायच्या आहेत.
त्यामुळे एका हातात बंदूक आणि दुस:या हातात सेवाप्रकल्पांची संदूक, अशी दुहेरी भूमिका इथे लष्कराला पार पाडावी लागत आहे. अन्य नागरी समस्यांबरोबरच स्थानिक तरुणांच्या बेरोजगारीची समस्या सोडवणं हे येथील एक मोठं आव्हान आहे.
येथील बेरोजगारीचा थेट संबंध दहशतवादाशी आहे. गरीब कुटुंबांतील बेरोजगार तरुणांना अतिरेकी कारवायांकडे वळवण्याचे प्रयत्न सीमेपलीकडून सातत्यानं होत असतात. स्थानिक तरुणांनी रोजगारासाठी अतिरेकी संघटनांकडे वळू नये, यासाठी त्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न लष्कराकडून करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून पूँछमध्ये तैनात असलेल्या मेंढर बटालियनने स्थानिक तरुणांना भारतीय सुरक्षा यंत्रणांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेतला आहे.
लष्कर आणि लोकांच्या भाकरीची सोय करणारं हे गणित जरा समजायला अवघड होतं, पण स्थानिक तरुणांशी बोलताना ते समजू लागलं.
नियंत्रणरेषेजवळच्या गावांमध्ये राहणा:या तरुणांना रोजगाराच्या संधी अत्यंत मर्यादित आहेत. त्यात शिकायचं तर समोर अनंत अडचणी. मात्र जिद्दीनं आपलं शिक्षण पूर्ण करणा:या तरुणांना लष्करात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. किमान दहावी-बारावी झालेल्या या भागातील कोणत्याही तरुणाला या उपक्रमात सहभागी होता येतं. त्यांच्यासाठी दोन आठवडय़ांचं संपूर्ण विनामूल्य विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येतं. लष्कर, सीमा सुरक्षा दल किंवा राज्य पोलीस दलासारख्या सुरक्षा यंत्रणांमध्ये सहभागी होण्यासाठी या तरुणांची तयारी करून घेण्यात येते. लेखी आणि शारीरिक परीक्षा उत्तीर्ण करता यावी, म्हणून दोन्ही प्रकारच्या प्रशिक्षणाची सोय करण्यात आली आहे. या प्रशिक्षणाची जबाबदारी येथील लष्कराच्या एका अधिका:याकडे सोपविण्यात आली आहे. सुरुवातीला लेखी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असणा:या इंग्रजी-गणित विषयांची तयारी करून घेतली जाते. मग शारीरिक चाचण्यांसाठी लांब उडी, उंच उडी, धावणो यासारख्या गोष्टींची तयारी करवली जाते.
या प्रशिक्षणासाठी मेंढर बटालियनने वर्ग, खेळाचे मैदान आदि पायाभूत सुविधा नियंत्रण रेषेजवळच तयार केल्या आहेत. नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या उपक्रमाचा लाभ अनेक स्थानिक तरुणांनी घेतला आहे. विशेष म्हणजे, प्रशिक्षणाच्या काळात प्रशिक्षणार्थीच्या राहण्या- खाण्याची व्यवस्थाही लष्कराकडूनच करण्यात येते. त्यामुळे प्रशिक्षण केंद्रापासून दूरवरच्या गावांमध्ये राहणा:या तरुणांनाही या प्रशिक्षण वर्गाचा लाभ घेता येतो.
ज्यांच्या हाती देशविरोधक विरोधी कारवायांसाठी शस्त्र देतात; तसा प्रय} करतात, त्याच तरुण मुलांना आता या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि विकासासाठी सैन्यदल तयार करत आहे. त्यांना जबाबदारी देत आहे, की हा देश आपला आहे, तुम्ही आम्ही एकत्र येऊन नवी सुरुवात करू.
रोजगाराच्या संधी आणि मुख्य प्रवाहात सहभाग आणि विकासात वाटा या गोष्टी साधल्या तर नियंत्रणरेषेवरच्या या तरुणांचं आयुष्यही नक्की बदलेल अशी एक आस इथं फिरताना दिसते. हे नक्की !
आता जगायची संधी मिळेल असं वाटतंय.
सुविधाच नाही आमच्या भागात काही. ना शिक्षण, ना त्यात सातत्य. सतत दहशतीत जगणं. त्यामुळे आम्ही आतार्पयत चांगल्या नोक:या आणि चांगल्या जगण्यापासून कोसो लांब होतो. खूप कष्टानं, धीरानं पदवीर्पयत शिक्षण घेतल्यानंतरही दुर्गम आणि युद्धजन्य भागात राहत असल्यामुळे नोकरी- धंद्याच्या फारशा संधी उपलब्ध नाहीतच. लष्कर किंवा अन्य शासकीय सेवांमध्ये भरतीसाठी प्रयत्न केले तर योग्य मार्गदर्शन आणि माहिती नसल्यानं आमच्यातले फार कमी त्यात यशस्वी होत. तसं पाहता दुर्गम भागात राहत असल्यामुळे शारीरिक चाचण्यांमध्ये यशस्वी होण्यात आम्हाला विशेष अडचणी नव्हत्या; परंतु लेखी परीक्षेत आमच्यातले तरुण हमखास मार खायचे. मात्र लष्कराच्या या उपक्रमात आमची लेखी आणि शारीरिक अशा दोन्ही परीक्षांसाठी कसून तयारी करून घेण्यात येते. त्यामुळे आता आम्हाला नोक:या मिळण्याचं प्रमाण वाढू लागलं आहे. आमच्यातील 2क् जणांची नुकतीच विविध सुरक्षा यंत्रणांमध्ये निवड झाली. ही मोठी गोष्ट आहे. एकीकडे गरिबी, दुसरीकडे सीमेपलीकडची दहशत याला काय उत्तर आम्ही देणार होतो?
पण आता लष्करात जाऊन नोकरी तर मिळेलच, पण मानाची जबाबदारीही मिळेल अशी आशा वाटते आहे !
- औरंगजेब मीर, ( सैन्यदलातर्फे आयोजित शिबिरातील प्रशिक्षणार्थी)
- संकेत सातोपे
(लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहे.)
sanket.satope@gmail.com