- धनश्री संखे
(ब्यूटी एक्सपर्ट)
हिवाळा आला की, टीव्हीवर कसकसल्या जाहिराती सुरू होतात आणि त्यापैकी आपण नेमकं काय वापरायचं? हेच कळत नाही. त्यात हिवाळ्यात लगA, पाटर्य़ा, सेलिब्रेशन्स जास्त. म्हणजे मग पुन्हा मेकप करणं आलंच.
मात्र गोंधळ जास्त कारण ऑप्शन्स जास्त असल् ो तरी कशावर काय लावायचं हे चटकन कळत नाही. त्यामुळे हिवाळ्यात जर विविध फंक्शन्ससाठी तुम्ही मेकप करत असाल तर या काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॉयश्चरायझर न विसरता वापरा. मेकप करण्यापूर्वीही स्किनला मॉयश्चरायझर लावायलाच हवा.
मेकपचा बेस लावण्यापूर्वी चेह:याला हायड्रेटिंग सिरम, आयक्रिम लावायलाच हवं.
थंडीत ‘ल्युमिनियस लूक’ बेस्ट दिसतो. म्हणजेच चमकदार, तजेलदार त्वचा, तसाच चेह:याला ग्लो. थंडीत कोरडी होणारी, रखरखीत त्वचा लपवायची तर हा लूक एकदम खास.
त्यासाठी फाउंडेशन लावण्यापूर्वी चेह:याला थोडासा फेस प्रायमर लावायला हवा. त्यानं मेकपला एकदम फ्लॉलेस लूक येतो.
फाउंडेशन वापरण्याऐवजी तुम्ही टिण्टेड मॉयश्चरायझरही वापरू शकता. या सिझनसाठी ते एकदम बेस्ट आहे.
आयश्ॉडो वापरतानाही ब्राऊन आणि कॉपर आयश्ॉडो वापरणं उत्तम.
चेह:याला लाईट पिंक किंवा लाईट चेरी ब्लश लावा, त्यानं चेहरा अधिक तजेलदार, सुंदर दिसेल.
लिपस्टिक टोमॅटो रेड कलरची लावली तर एकदम ग्लॅमरस लूक येईल. थोडा यंग लूक हवा असेल तर चेरी लिपग्लॉसही लावायला हरकत नाही.