शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

फेब

By admin | Updated: February 5, 2015 19:42 IST

व्हॅलेण्टाइन्स डेचं एका दिवसापुरतं सेलिब्रेशनच नाकारून थेट पंधरवडाच सेलिब्रेट करणारा एक नवीन ‘तरुण’ ट्रेण्ड.

 चिन्मय लेले -

 
व्हॅलेण्टाइन्स डेचं एका दिवसापुरतं सेलिब्रेशनच नाकारून थेट पंधरवडाच सेलिब्रेट करणारा एक नवीन ‘तरुण’ ट्रेण्ड.
 
जगभरातल्या तरुण मुला-मुलींमध्ये सध्या एक नवीनच ट्रेण्ड आहे म्हणे; त्यांच्या सध्याच्या वर्तणुकीलाच छेद देणारा हा ट्रेण्ड. त्याच्यावर ‘वडीलधारं’ जग काही विश्‍वास ठेवायला तयार नाही, पण तो ट्रेण्ड आहे असं बाजारपेठेचा अभ्यास करणार्‍या मार्केटिंग ट्रेण्ड्स शोधण्याचं काम करणार्‍या तज्ज्ञांचं मत आहे..
आता ज्याला आपलं प्रॉडक्ट बाजारात विकायचं, त्यांचा अभ्यास आपल्या भावनेपेक्षा जास्त खरे असणार हे तर उघडच आहे.
तर ट्रेण्ड काय आहे?
सध्या म्हणे जगभरातल्याच 
(त्यात आपण म्हणजे भारतीयही आलेच.) तरुण-तरुणींना ‘व्ही’ डे सेलिब्रेशनविषयी फारसं बोलायला आवडत नाही असा दावा यंगवर्ल्ड नावाच्या एका अमेरिकन फर्मने केला.
त्यावर तिकडेही लोकांनी तोंडात मनगटंच घातली. त्याचं कारण उघड आहे; आपल्याकडे तुलनेनं कमी म्हणावं इतकं तिकडे ‘पीडीए’ अफाट आहे. पीडीए म्हणजे पब्लिक डीस्प्ले ऑफ अफेक्शन. आणि व्हीडे हा तर आपलं एकमेकांवर कित्ती प्रेम आहे, हे दाखवण्याचा सोहळाच, खरं तर स्पर्धाच.
या पीडीएची लागण आपल्याकडेही झालेली आहेच! गळ्यात गळे घातलेले, तिच्या/त्याच्याशिवाय जगूच शकत नाही अशा कॅप्शन्स लिहिलेले फोटो फेसबुकवर टाकलेच जातात. डीपी म्हणून लावले जातात.
आणि इतरांपेक्षा आपलंच कपल कसं जास्तीत जास्त रोमॅण्टिक आहे, हे ‘दाखवण्याची’ होड लागते आणि असं असताना जर कुणी म्हणत असेल की, व्हीडे अर्थात महादिन व्हॅलेण्टाइन्स डेविषयी फारसं बोलायला तरुण मुला-मुलींना आवडत नाही, तर त्याच्यावर जगात कुणी विश्‍वास ठेवेल का?
ठेवावा लागेल, कारण एकट्या व्हॅलेण्टाइन्स डे विषयीच बोलून, एका दिवसात संपवून टाकावं सेलिब्रेशन असं  वाटण्याचा काळच आता मागे पडला आहे.
जगभरातल्या बाजारपेठा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच सज्ज झालेल्या आहेत. या नव्या ट्रेण्ड्च्या सेलिब्रेशनसाठी त्याचं नाव आहे.
- फॅब फेब!
म्हणजे काय, तर गेली काही वर्षे ७ ते १४ फेब्रुवारी हा आठवडाच रोज एकेक डे साजरा करत ‘रोमॅण्टिक वीक’ म्हणून साजरा करण्याचा एक ट्रेण्ड सुरू झाला.
सुरू झाला म्हणा किंवा बाजारपेठीय समीकरणांनी हॅमर करत तो सुरू केला म्हणा.
या आठवड्यात म्हणजे खरं तर ‘सप्ताहात’ रोज एकेक डे साजरा करत, आपल्या प्रेमाच्या सेलिब्रेशनचा व्हॉल्यूम वाढवत न्यायचा आणि मग १४ ला व्हॅलेण्टाइन्स डेचं ‘मेड फॉर इच ऑदर’ सेलिब्रेशन जोरदार करायचं. आणि जोरदार म्हणजे दोघांनीच कुठं तरी जाऊन एकमेकांना ग्रीटिंग देत कॅण्डल लाइट डीनर, लॉन्ग ड्राइव्ह असं नव्हे, तर आता व्हॅलेण्टाइन्स डेच्या रीतसर पाटर्य़ाच प्लॅन होतात. खाणंपिणं-डीजे-सेलिब्रेशन असा सगळा थाटमाट. जगभरात या सेलिब्रेशनपोटी उलाढाल कोट्यवधी नाही, अब्जावधी रुपयांच्या घरात जात आहे.
हे सारं असं सुरू असताना आणि तरुण खर्च करायला तयार असताना बाजारपेठा एवढय़ावरच समाधान का मानतील?
म्हणून मग गेल्या तीन वर्षांपासून आणखी एक नवीन ट्रेण्ड सुरू झाला, त्याचंच नाव ‘फॅब फेब’.
तर या नव्या ट्रेण्डनुसार फेब्रुवारी महिना सुरू होताच, जगभरातल्या तरुणांसाठी थंड हवा एकदम ‘गुलाबी’ होऊन जाते. तरुण मनं फुलासारखी हलकी होत हळूच रोमॅण्टिक मूडमध्ये शिरतात. 
(म्हणजे ते स्वत:हून शिरतात असं नाही, तर जाहिराती, बाजारपेठा, पीअर प्रेशर, हे सारं मिळून असा माहौल तयार करतात की, आपण त्या सेलिब्रेशनचा भाग नाही, हेच तरुण मुला-मुलींना सहन  होऊ शकत नाही.)
आणि म्हणून मग फेब्रुवारी उजाडताच बाजारपेठा गुलाबी रंगात सजू लागतात. गिफ्ट्सपासून ते कपड्यांपर्यंत आणि पाटर्य़ांपासून ते थेट सेलिब्रेशन पॅकेजपर्यंत एक नवीन ऑफरिंग जग तरुणांना हाका घालायला लागतं.
आणि त्यालाच म्हणतात,  फॅब फेब.
फिल फॅब, यू आर नॉट अलोन
या ट्रेण्डचा आणखी एक भाग म्हणजे समजा, तुम्ही प्रेमात पडलेले नाही. तुम्ही कुणाला प्रपोजही मारणार नाही.
मग या सेलिब्रेशन सिझनमध्ये तुम्ही काय करणार?
एकेकटे घरीच बसणार का?
तर असं कशाला, बाजारपेठ म्हणते की, तुम्ही कशाला एकाकीपणाच्या भावनेनं काळवंडता, कुढता, तुम्हाला पण फॅब वाटू शकता. मस्त शॉपिंग करा, सिनेमे पहा, एकेकट्यांच्या पाटर्य़ा करा, व्हॅलेण्टाइन्स पार्टीला तुम्हीही जा.
(मुख्य म्हणजे पैसे खर्च करा!)
असा हा ट्रेण्ड. चारपावलं पुढं जाऊन एक अमेरिकन अभ्यासक असंही म्हणतो की, काही जोडप्यांनासुद्धा या काळात एकेकटं वाटतं. या जल्लोष वातावरणात काय करायचं हेच कळत नाही, त्यामुळे त्यांना ना सेलिब्रेट करता येतं, ना फॅब म्हणजेच फॅब्युलस-एक्सलण्ट वाटतं!
म्हणून मग त्यांच्यासाठीही सेलिब्रेशनचं पॅकेज बाजारपेठाच देऊ करत आहे. माणसांच्या एकटेपणावर ही बाजारपेठीय उत्तरं शोधली जात आहेत..
आणि कुणी काही का म्हणेना.
तरुण जग या ना त्या कारणानं आनंद सेलिब्रेट करत आहे.
हे नवं निमित्त.फॅब फेबचं!