शहरं
Join us  
Trending Stories
1
आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, निवडणुकांची चाचपणी
2
PM मोदींचा स्वदेशी नारा; जनतेला पत्र; ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बुलंद करण्यासाठी प्रयत्न करा
3
बाधित क्षेत्र ३ हेक्टर मानून मदत; राज्य सरकारचा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ
4
अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले १६४ कोटी रुपये, १२ हजारांवर पुरूष तर अपात्र महिला ७७ हजार
5
मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात ऐन दिवाळीत पावसाचा बार; पुढील तीन दिवस असेच वातावरण राहणार
6
उमेदवार जाहीर होताच महाआघाडीतील दरी स्पष्ट; राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी केले दुहेरी अर्ज
7
बिहार निवडणूक २०२५: १२१ मतदारसंघांत एकूण १,३१४ उमेदवार; महिला मतदारांच्या आधारे ‘जदयु’ बळकट
8
“महाआघाडीला नव्हे, भाजप जनसुराजला घाबरतेय; आमचे उमेदवार फोडतेय”; प्रशांत किशोर यांचा आरोप
9
...तर H1B व्हिसाधारकांना वाढीव शुल्क लागणार नाही; पण वाढ कायम; ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्टता
10
७ दिवसांत ३३ हजारांनी घसरला दर; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ८ हजारांनी गडगडली चांदी!
11
सर्व न्यायालयांमधील ‘सू’ व्यवस्था दयनीय; देशातील सर्व हायकोर्टांचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर
12
विभक्त पती, आईला फ्लॅटमध्ये राहण्यास हायकोर्टाची परवानगी; नेमके प्रकरण काय?
13
नवी मुंबई-पनवेलमध्ये आगीत ६ जणांचा मृत्यू; ठाण्यात एकाच दिवशी आगीच्या सहा घटना
14
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
15
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
16
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
17
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
18
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
19
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
20
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा

कधी सुटका, कधी संधी

By admin | Updated: February 8, 2017 15:43 IST

जुन्या शक्यता ज्यावेळी बंद होतात त्यावेळी नवीन शक्यतांचा शोध सुरू होतो, ते म्हणजे स्थलांतर. प्रत्येकवेळी हा शोध प्रत्येकासाठी आनंददायी असतोच असं नाही. स्थलांतराला वेदनेची किनार असते. तुटलेपणाची भावना मनाशी घर करून असते. कधी ‘सुटका’ असते, कधी संधी असते, तर कधी सर्वस्व गमावल्याचे ‘शल्य’ असते. म्हणून मी वाट पाहतो आहे माझ्या पुढच्या स्थलांतराची.

लातूर सोडलं. अहमदापूरला कॉलेज नावाजलेलं असलं तरी इथलं वातावरण वेगळं होतं. क्लास नव्हते. फक्त कॉलेज हेच एक जग होतं. शिक्षक चांगले होते. स्पून फिडिंगपेक्षा सेल्फ स्टडीवर भर होता. पण मी दिवसेंदिवस या जगापासून दूरच चाललो होतो. अकरावीनंतर कॉलेजपण कमी केलं. पण इथं माझ्या वैयक्तिक आयुष्यात डोकावणारी माणसं कमी होती. मला माझी स्पेस होती. याचा वापर मी वाचनासाठी करून घेतला. या काळात मी वैचारिक वाचनाकडे वळालो. डोक्यात आता वेगळ्या गोष्टी आकार घेत होत्या. काहीतरी वेगळं सापडत होतं. याच काळात बाबा आमटे आणि आनंदवन यांच्याशी मी जोडला गेलो. आनंदवनवाऱ्याही वाढल्या होत्या. अहमदपूरमध्ये मला इंग्रजी शिकवणाऱ्या प्रा. ललिता गदगे भेटल्या. त्यांनी एक वेगळा आत्मविश्वास दिला. त्यांच्या घरात ‘साधना’ भेटलं. साधना साप्ताहिकानं त्या वयात माझं सर्व भावविश्व बदलून टाकलं. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे बारावीला फक्त ७५ टक्के मार्क मिळाले. मेडिकलला सीट मिळाली नाही. रिपीट केलं. पण वाचनामुळे एक समज वाढत चालली होती. स्वत:विषयीच्या आणि जगण्याविषयीच्या संकल्पना हळूहळू क्लिअर होत चालल्या होत्या. काय करायचं हे नक्की ठरत नसलं तरी काय करायचं नाही, हे पक्क ठरलं होतं. नीलची शाळा सगर हील वाचलं. आणि दुसरा टर्निंग पॉइण्ट मिळाला. तिसऱ्या प्रयत्नात एमबीबीएसला मिळालेलं अ‍ॅडमिशन सोडलं. मी अ‍ॅडमिशन प्रोसेसमध्येच राहिलो नाही. हे घरच्यांना सर्व संपल्यानंतर कळालं. घरच्यांच्या मेडिकल होप्स मी निकाली काढल्या होत्या. मग इंजिनिअरकडे वळालो. बारावीला माझं मॅथ्स नसल्याने मला त्यांनी दहावीच्या बेसवर गव्हर्नमेण्ट पॉलिटेकनिकला अ‍ॅडमिशन घेतली. आणि मी अहमदनगर या शहरात दाखल झालो. दरम्यानची चार वर्षे मी कुणाच्याही कनेक्टमध्ये नव्हतो. मित्र, क्लासमेट यांच्या संपर्कात नव्हतो. याची कारणं होती. एकतर मार्कांच्या जगात मी सपशेल फेल ठरल्याने मनात अपयशाची प्रचंड भावना होती. अपमानाची भावना होती कारण एका जगात मी प्रचंड यश अनुभवलं होतं, तर दुसऱ्या टप्प्यात अपयश होतं. खूप अपराधी भावना होत्या. तर दुसरीकडे पुस्तक, चळवळी, वैचारिक जग, सोशल जग यांच्याशी कुणालाही घेणंदेणं नव्हते आणि अशा अवस्थेत अहमदनगर शहरात मी दाखल झालो होतो. स्वत:मधील नवीन टॅलेण्ट शोधत होतो. या शहरानं मला एक कॉन्फिडन्स दिला. नवीन जोश दिला आणि ‘अक्षरमित्र’ या संकल्पनेने या शहरात जन्म घेतला.लातूर शहरानं बंडखोरी दिली. नवीन विचारांची, नवीन जगाची ओळख करून दिली. धडपडायला शिकवले. नवीन स्वप्नांची बीजे रोवली, तर अहमदपूरने डोक्यात आणि मनात उसळलेल्या विचारांच्या आणि बंडखोरीच्या वादळावर शांतपणे विचार करायला शिकवले. सम्यक-सकारात्मकतेच्या दिशेला घेऊन जाणारे एक सुरेख वळण दिले. अहमदपूर शहरातून ज्यावेळी पुन्हा लातूर शहरात आलो त्यावेळी स्वत:विषयीच्या जाणिवा बऱ्याच विकसित झाल्या होत्या. भाबडेपणा कमी होत होता. आयुष्याला दुसरा टर्निंग पॉर्इंट देणारे ‘नीलची शाळा’ हे पुस्तक याच ठिकाणी मिळाले. दोन वर्षे खपून मिळालेली मेडिकलची सीट सोडण्याची हिंमत पुन्हा याच शहराने मला दिली. लातूर-अहमदपूर-लातूर असं करत मी पुन्हा अहमदनगर या शहरात दाखल झालो.डोक्यात असणारे असंख्य विचार आणि कन्सेप्टना कृतिशीलतेची जोड मला याच शहरात देता आली. एक वेगळा प्लॅटफार्म मला या शहराने दिला. खूप चुका करायची आणि चुकांतून शिकण्याची खुली छूट मला याच शहरानं दिली. मला चळवळीचा ‘विद्रोही टच’ याच शहरात मिळाला. रचनात्मक कामांऐवजी ‘चळवळ’ जवळची वाटू लागली. स्वत:ची ओळख निर्माण करून देणाऱ्या आणि मला सर्वस्वी उभ्या करणाऱ्या ‘अक्षरमित्र’ची सुरुवात मला अहमदनगर याच शहरात करता आली आणि दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली.हे सारं घेऊन मी पुण्यात दाखल झालो. एक नवीन स्थलांतर. नवीन शहर. प्रस्थापितांशी स्पर्धा करत स्वतंत्र उभं राहणं तसं अनेकांना दमछाक करणारे असते. पण पुण्यानं मला हवं ते करण्याची स्पेस दिली. अनेक नवीन शक्यतांचे आकाश माझ्यासमोर खुली केली. पुण्याने सखोल ‘आयाम’ दिले. संघर्ष कुठेही चुकला नाही पण संघर्षाची इतकी सवय झालेली होती की तक्रारीचा सूर आता निघत नसे. हवं ते करायचं पॅशन आता सापडलं होतं. पुण्यात कुठलेही रुट्स नसताना मला हे शहर माझं वाटायला लागले होते. गालिब म्हणतो त्याप्रमाणे ‘हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले’ असं मला पुण्यात आल्यावर वाटू लागलं. मला माझी वाट सापडली आहे. प्रत्येक क्षण आता आनंद देणारा आहे. या सर्व शक्यता माझ्या आयुष्यात स्थलांतरणामुळेच निर्माण झाल्या. विचारांमधेही स्थलांतर साधलं गेलं तर.असं म्हटलं जातं की, स्थलांतरणाने नवीन शक्यता खुल्या होत असतात. खरं आहे हे पण, जुन्या शक्यता ज्यावेळी बंद होतात त्यावेळीच नवीन शक्यतांचा शोध सुरू होतो. प्रत्येकवेळी हा शोध प्रत्येकासाठी आनंददायी असतोच असं नाही. अनेकवेळा स्थलांतरणाला वेदनेची किनार असते. एक तुटलेपणाची भावना मनाशी घर करून असते. कधी ‘सुटका’ असते, कधी संधी असते, तर कधी सर्वस्व गमावल्याचे ‘शल्य’ असते. म्हणून मी वाट पाहतो आहे माझ्या पुढच्या स्थलांतराची. माझ्या मुळांच्या दिशेने, पुढची स्थलांतरं रोखण्यासाठी...- आमीर शेख( अक्षरमित्र ही वाचक चळवळ चालवणारा आमीर फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकतो, प्रवास आणि वाचन या दोन गोष्टींचा त्याला ध्यास आहे.)