शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

स्पर्धेपलीकडे पळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:30 IST

उसेन बोल्ट. त्यानं आॅलिम्पिक पदकं जिंकली, स्वत:चेच रेकॉर्ड पुन्हा पुन्हा मोडले आणि पुन्हा जिंकूनही तो पळतच राहिला.

-चिन्मय लेलेउसेन बोल्ट.त्यानं आॅलिम्पिक पदकं जिंकली,स्वत:चेच रेकॉर्ड पुन्हा पुन्हा मोडलेआणि पुन्हा जिंकूनहीतो पळतच राहिला.त्या पळण्यातूनआपण शिकाव्यातअशा ४ गोष्टी

उसेन बोल्ट. त्याचं नाव हीच खरंतर त्याची ओळख आहे. त्याचं पळणं, त्याच्या चेहºयावरचं डेडिकेशन, त्याचं खेळावरचं प्रेम हे सारं जगभरातल्या माणसांना माहितीच आहे. तरुण मुलं दिवानी होतात त्याचा वेग पाहून! आणि आता तो निवृत्त झालाय. शेवटच्या रिले रेसमध्ये त्याला झालेली दुखापत, त्याचं कोसळणं हे सारं हळहळ लावणारं आहेच. त्यापूर्वीच्या रेसमध्येही त्याचं मेडल हुकलं पण जो जिंकला तो ही बोल्टच्या पायाशी झुकलाच! बोल्टवर प्रेम करताना त्याच्याकडून शिकावं असंही काही आहेच. जन्मभर लक्षात ठेवावेत असेच ते धडे आहेत. रिटायरमेंटची शेवटची मॅच हरल्यावही बोल्ट जे म्हणाला ते महत्त्वाचं आहे. तो म्हणतो, ‘एक मॅच मी कोसळलो म्हणून काही जग माझी आजवरची कामगिरी विसरणार नाही. जे मी आजवर स्वत:ला सांगितलं तेच आज परत सांगतोय, ‘यू नीड टू स्टार्ट थिंकिंग बियॉण्ड कॉम्पिटिशन. आव वॉण्ट दॅट लेव्हल आॅफ सक्सेस फॉर मायसेल्फ. म्हणजेच स्पर्धेपलीकडे, यशापलीकडे स्वत:ला घेऊन जाणं हेच माझं ध्येय होतं. आजही आहे. त्यासाठी स्वत:त जीव ओतणं मला कायम महत्त्वाचं वाटत आलं आहे..’हे स्वत:त जीव ओतणं कुठून शिकला असेल तो? जमैका नावाच्या गरीब प्रांतातला हा माणूस. त्याच्या आत्मविश्वासाची आणि जिद्दीची श्रीमंती अशी अपरंपार की तो पळत सुटला तो असा की, त्यानं सर्वार्थानं सगळ्यांना मागे टाकलं!त्याच्याकडून आपण शिकाव्यात अशा या ४ गोष्टी..१) तुम्हीच तुमचा ब्रॅण्डसध्या जिकडे-तिकडे ब्रॅण्डची चर्चा असते. अमुक ब्रॅण्ड. त्याची व्हॅल्यू, क्रेडिबिलिटी इत्यादींवर चर्चा चालते. मोठमोठे सेलिब्रिटी आपलं स्टारडम ब्रॅण्ड म्हणून कसं दिसेल याचा विचार करतात. काही माणसांचं तर नुस्तं नाव हाच त्यांचा ब्रॅण्ड होऊन जातो. तेच बोल्टने केलं. नुस्तं गूगल करून पाहा. उसेन बोल्ट असा उल्लेख केला तर फास्टेस्ट मॅन इन द वर्ल्ड असा तपशील दिसतो. शंभर, दोनशे, रिलेचे अनेक रेकॉर्ड तर त्याच्या नावावर आहेतच; पण त्यानं यश असं कमावलं की रनिंग म्हटलं की बोल्टचं नाव समोर येतं. स्वत:चा ब्रॅण्ड असा वाढवतात, सर्वोत्तम होऊन! आपल्या क्षेत्रात पहिलं नाव आपलंच येईल यासाठी प्रयत्न करणं ही बोल्टनीती.२) सतत मेहनतवयाच्या दहाव्या वर्षापासून बोल्ट ट्रॅकवर पळतोय. त्यापलीकडे आजवर त्याला वेगळं असं आयुष्य नाही. तेच त्याच्या रेसचंही. पहिली शंभर मीटर रेस तो हरला होता. तेव्हा त्याला कोचने सांगितलं, वाईट वाटून घेऊ नकोस मोहंमद अलीसुद्धा पहिली बॉक्सिंगची मॅच हरले होते. घाबरू नको, पुढच्या रेसचा विचार कर. बोल्ट म्हणतो मी तेच केलं. रेकॉर्ड तुटो, मेडल मिळो, काहीही हो, मी सतत जी रेस पळतोय तिचाच विचार केला, तीच जिंकलो. सतत स्वत:ला पणाला लावलं. तेच लाइफ असतं, कालची रेस संपलेली असते, आजची रेसच फक्त आपण पळू शकतो.३. काय देताय? वेळ!तुम्ही तुमच्या करिअर गोलला अर्थात जे तुमचं लक्ष्य त्याला काय देताय? त्याचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं असू शकतं, पण खरं उत्तर आहे, वेळ. तुमच्या डोक्यात, जगण्यात, प्रत्येक क्षणात तेच लक्ष्य असलं पाहिजे. तरच बाकी सगळं कमी महत्त्वाचं वाटतं. अगदी तुमचं यशही. अपयशातून बाहेर पडणं सोपं, यशातून बाहेर पडणं अवघड असतं. ते जमलं पाहिले. ते बोल्टनं जमवलं म्हणून तर तो अनेकदा आॅलिम्पिक जिंकला. सर्वोत्तमचा हा ध्यास वेळ मागतो, तो आपण देतो का?४. आपण आपल्यासारखेबोल्टचा साधेपणा पाहा. त्याचं जमैकन वागणं पाहा. तो यशानं बदलला नाही. त्याचं वागणं-बोलणं बदललं नाही. उलट सगळ्या स्टायलिश गर्दीत तो जास्त उठून दिसला. त्यामुळे आपण नेमके कोण आहोत, तसंच राहणं, सहज सरळ वागणं हे सारं आपल्याविषयी बरंच काही सांगतं. स्वत:ला बदलवून स्वत:चं यश नाही मिळत. त्यामुळे बदलायचं काय आणि जपायचं काय, हे आपलं आपण ठरवायचं.

उसेन बोल्ट. त्यानं ८ आॅलिम्पिक पदकं जिंकलीत. १४ जागतिक पदकं जिंकली आहेत.सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्याविषयी असं सांगतात की, २ मिनिटं जेमतेम जी रेस पळायची त्यासाठी त्यानं आयुष्य पणाला लावलं. त्याची गुणवत्ता सिद्ध करायला त्याच्याकडे खूप कमी वेळ होता, आपल्याकडे तर भरपूर वेळ, वर्षे असतात.