शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

एंगेजिंग, इंटरॅक्टिव्ह, एक्सायटिंग

By admin | Updated: January 4, 2017 16:21 IST

मुलामुलींच्या सिक्रेट जगात, स्वेच्छा,सक्ती आणि एक्साईटमेण्ट! वयात येणाऱ्या मुलांच्या जगाशी ‘आतून’ जोडले गेलेले समुपदेशक काय पाहतात हल्ली?

 - डॉ. दीपक शर्मामुलांच्या हाती मोबाइल आहे हा प्रश्न नाहीये.. प्रश्न आहे, त्यांच्या हाती दुसरे पर्याय उपलब्ध नाहीत, हा! इझी अ‍ॅक्सेस कुणाला नको असतो? पण मुलांच्या संदर्भात ‘एंगेजिंग’ अर्थात गुंतवून ठेवू शकेल अशी एखादी गोष्ट फार महत्त्वाची असते. एंगेजिंग, इंटरॅक्टिव्ह आणि एक्सायटिंग असं काहीतरी आयुष्यात घडावं असं हे वय असतं.त्यात हातात मोबाइल येतो. त्यावर गाणी ऐकता येतात, सिनेमे पाहता येतात, चॅटिंग करता येतं, माहिती वाचता येते, पोर्न पाहता येतात, आपले फोटो टाकून चारचौघात घरबसल्या मिरवता येतं.

हे सारं ज्या एका गोष्टीनं होतं ती मुलं का सोडतील? आणि प्रश्न इथं खरा निर्माण होतो..मुलांशी आईबाबा बोलतात ते चौकशा आणि सल्ले या दोनच रूपात. पूर्वी मुलांना धाक तरी होता आईबाबांचा. आता त्यांना वाटतं की, आईबाबाच हे सारं करतात तर ते आपल्याला का रोखतील?जे पालक मुलानं पाठवलेले चावट फॉरवर्डस एन्जॉय करतात ते मुलाला व्हॉट्सअ‍ॅप वापरू नको असं म्हणाले तरी मुलं ते गांभीर्यानं घेतील का?

- असे अनेक प्रश्न आहेत.

प्रश्न साधनांत आणि माध्यमांत नाहीत, तर मनोवृत्तीत आहेत.सेक्स ही गोष्ट वाईटच आहे असं नव्हे, तर ती योग्य वयात आयुष्यात येणं महत्त्वाचं आहे. त्या आधीच्या टप्प्यात अन्य थरारक, आनंददायक गोष्टी असू शकतात हे मुलांपर्यंत नेण्यात आपण अपयशी ठरलेलो आहोत.

त्यामुळे दोष समाजानं, पालकांनी आणि शाळांनी घेतला पाहिजे स्वत:कडे!अर्थात तो कुणालाही दिला तरी समस्या तीच आहे.. मुलांच्या एकाग्रतेची. ओव्हर एक्सायटमेण्टची. अकाली मोठे होत सेक्समधलं थ्रिल शोधण्याची. प्रेमात पडणं आणि त्यातल्या थ्रिललाच प्रेम समजण्याची..याचे वर्तन परिणाम मात्र गंभीर आहेत. सोशल मीडिया, अब्युझिंग, ट्रोलिंग ते प्रत्यक्षातल्या मारामाऱ्या आणि न्यूनगंड इथपर्यंत गोष्टी जात आहेत. त्या नेमक्या कशा जातात याचाच अभ्यास आम्ही करतो आहोत. तो अभ्यास आमच्या संस्थेला करावासा वाटणं हीच समस्या गंभीर असण्याचं लक्षण आहे. वर्तन समस्या आणि मोबाइल यासंदर्भात सध्या आम्ही निम्हान्समध्ये संशोधन करतो आहोत. उत्तरं सापडतीलही, पण प्रश्न आहेत, हे आधी आपण मान्य करायला हवं.(लेखक नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ मेण्टल हेल्थ सायन्सशी संलग्न अभ्यासातील संशोधक आहेत.)