शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

न संपणारं दु:ख

By admin | Updated: October 16, 2014 18:59 IST

दु:ख सगळ्यांनाच होतं. कोण असं या जगात, ज्याला कधीच दु:ख होत नाही? पण दु:खाला कुरवाळत न बसता किंवा त्याला खतपाणी घालून जोपासत न बसता, ते दु:ख हाताळायला शिकायला हवं. ते शिकलं तर हेच दु:ख आपल्याला जगण्याची एक वेगळी दृष्टी देतं.

- डॉ. संज्योत देशपांडेदु:ख सगळ्यांनाच होतं. कोण असं या जगात, ज्याला कधीच दु:ख होत नाही?पण  दु:खाला कुरवाळत न बसता किंवा त्याला खतपाणी घालून जोपासत न बसता, ते दु:ख हाताळायला शिकायला हवं. ते शिकलं तर हेच दु:ख आपल्याला जगण्याची एक वेगळी दृष्टी देतं. मात्र हे खरंय की, सोपं नसतंच हे दु:ख हाताळणं. कधीकधी जगण्यात इतके अनिश्‍चित बदल घडतात, इतकी भयंकर परिस्थिती ओढावते की त्या दु:खातून स्वत:ला आणि इतरांनाही बाहेर काढणं अवघड होतं.त्याला म्हणतात अनिश्‍चित दु:ख. या प्रकारातलं दु:ख कधी कमीच होत नाही. मात्र त्या दु:खासोबत जगणं, आपलं आयुष्य पुढे नेणं हे आपल्याला शिकावंच लागतं. डॉ. पॉलीन बॉस या मानसशास्त्र संशोधकाने मांडलेली ही अनिश्‍चित दु:खाची संकल्पना. ते म्हणतात, जगण्यात अशी एक अवस्था जेव्हा आपल्याला जे दु:ख झालंय, जी वाईट घटना घडली आहे त्याचं दु:ख वाटून घ्यायचं की नाही हेच कळत नाही. जे घडतं त्यामुळे त्रास होतो, दु:ख होतंच, पण त्यातून आपण काय गमावून बसलो आहोत हेच कळत नाही. जे गमावलं त्याचं दु:ख व्यक्त करावं की नाही याविषयीसुद्धा मनात दुविधा, संदिग्धता असते. मात्र म्हणूनच हे असं या प्रकारचं दु:ख पेलणं खूप अवघड असतं. मन जास्त सैरभैर झालेलं असतं. या अनिश्‍चित दु:खाचे दोन प्रकार असतात.बेपत्ता माणसं,  तुटलेली नातीअनेकदा असं काहीतरी घडतं की काही माणसं शरीराने आपल्यातून निघून जातात. पण मनाने मात्र ती आपल्यातच असतात.  भूकंप, पूर, नैसर्गिक आपत्तीसारख्या काही घटनांमध्ये आपली माणसं बेपत्ता होतात, कधी विमान अपघात, रेल्वे अपघातात माणसं दगावतात. अशा माणसांचं शेवटचं दर्शनसुद्धा होत नाही. आपलं माणूस गेलं यावर विश्‍वाच बसत नाही. अनेकदा दूर देशी गेलेली काही माणसं, किंवा आपल्यातलेच काहीजण एकदम बेपत्ताच होतात. सापडत नाही. ती व्यक्ती निधन पावली किंवा जिवंत आहे हेसुद्धा कळत नाही, अशावेळी आपण काय गमावलंय, नक्की गमावलंय की नाही हेच मनाला कळत नाही. दु:ख असतंच गमावल्याचं; पण तरी मन मानत नाही. बर्‍याचता घटस्फोट झाला, ब्रेकप झाला की ते नातं तुटतं. पण त्या नात्यामुळे तयार झालेली इतर नातीही हादरतात. त्यातून दु:ख होतंच, पण आपण काहीच करू शकत नाही ही भावना जास्त छळते. आहे ते दु:ख स्वीकारणं फार अवघड होतं. या घटनांमधील अनिश्‍चितता मनाला खूप बेचैनी आणते. आपण काहीतरी कायमच गमावून बसलोय हे स्वीकारून पुढं सरकत येत नाही. त्यातून मनावरच नाही तर शारीरिक आरोग्यावरही खूप वाईट परिणाम होतात.  माणसं असून नसल्यासारखी.अनिश्‍चित दु:खाचा दुसरा प्रकार म्हणजे ती व्यक्ती शरीराने आपल्या कुटुंबात, आपल्या सोबत असते, पण मनानं मात्र आपल्यातून कधीच निघून गेलेली असते. उदा. अल्झायमर झालेले रुग्ण, स्किझोफ्रेनियासारखा मानसिक आजार झालेल्या व्यक्ती, व्यसनाधिनतेचा आजार झालेल्या व्यक्ती, विवाहबाह्य संबंध असणारी अथवा सतत आपल्या कामात, छंदात मग्न असणारी व्यक्ती.  ही सगळी माणसं आपल्याला दिसतात. अवतीभोवतीच असतात. पण आपल्यासाठी नसतात. आपल्याजवळ नसतात. त्यांच्याशी काही बोलता येत नाही, त्यांना काही सांगता येत नाही आणि कधीकधी तर ते काय सांगतात हे कळतही नाही. कारण त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वातच खूप बदल झालेले असतात. आपण ज्या माणसाला ओळखत असतो, ती ओळखच हरवून गेल्यासारखं वाटतं. अशा परिस्थितीत जे भोगावं, सहन करावं लागतं ते इतकं छळतं की, त्या दु:खाची कल्पना करवत नाही.डॉ. पॉलीन बॉस यांच्या मते, हे न संपणारे दु:ख आहे. त्या दु:खासोबतच जगणं स्वीकारावं लागतं. with ambiguous loss there is no closure. The Challenge is to learn to live with the ambiguity.जे आहे ते आहे म्हणायचं आणि पुढे सरकायचं.तोंड बांधून तोबरा.अदखलपात्र दु:ख?जगण्यातील काही दु:खांना या जगात काही स्थानच नसतं. त्या दु:खांची दखलच समाज घेत नाही. किंबहुना काही दु:खांना समाजमान्यताच नसते. त्यामुळे अशी दु:ख अदखलपात्र ठरतात. १) विवाहबाह्य नातेसंबंध, समलिंगी नातेसंबंध अशी नाती जेव्हा तुटतात, तेव्हा समाजात त्याविषयी मोकळेपणानं बोलता येत नाही. विवाहबाह्य संबंध संपणं अथवा एखाद्या जोडीदाराचा मृत्यू होणे. हे त्या त्या व्यक्तीसाठी दु:खदच असतं, पण कुणाजवळ दु:ख बोलून दाखवता येत नाही.२) आजही आत्महत्त्या, व्यसनाधिनतेमुळे होणारे मृत्यू, एड्समुळे होणारे मृत्यू यांच्याकडे समाज संवेदनशीलतेने पाहत नाही.  ३) गर्भपात करावा लागणं अथवा होणं, हे दु:खच ते बोलता येत नाही.४) मूल न होणारी जोडपी, वंध्यत्व, हे किती मोठं दु:ख, पण अनेकजण त्याविषयी बोलत नाही.५) पाळीव प्राण्याचा मृत्यू६) तुरुंगात राहणारे कैदी व त्यांचे कुटुंबीय यांचं दु:ख.७)  लहानपणापासून संस्थेत राहणारी, घर व आईवडिलांच्या प्रेमाला वंचित असणारी मुलं याचं दु:ख कुठं दिसतं कुणाला?