शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट कुणी आणि का करावी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 13:37 IST

आजचे रोजगार उद्या नसतील, तर उद्यासाठी आवश्यक क्षेत्रांसाठी आज तयारी करावी लागेल, तशा क्षमता आपल्या आहेत का? हे कसं शोधणार?

ठळक मुद्देकाय कच्चे, काय पक्के हा ताळा अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टने कसा करायचा?

- अनुराधा प्रभुदेसाई

पुढे काय? हा प्रश्न दहावी-बारावीच नाही तर अगदी ग्रॅज्युएशनच्या टप्प्यावरही पाठ सोडत नाही. अनेकदा मुलांना बरंच काही करायचं असतं, ते म्हणतात अजून माझं काही ठरलं नाही. मी एक्सप्लोअर करून पाहणार आहे. पालकांची त्याला ना नसते; पण हा शोध किती काळ चालणार, नेमकं आपल्याला काय आवडतं किंवा कशात अधिक उज्‍जवल संधी आहेत हेच मुलांना कळत नाही आणि पालकांना सांगता येत नाही. अनेकदा आपण अमुकच करिअर करायचं असं ठरवलेलं असलं तरी आपली तशी क्षमता आहे का? त्यात खरंच काही भवितव्य आहे का? पिअर प्रेशर किंवा काहीतरी आकर्षण यापायी निर्णय घेतला आहे का? हे काही कळत नाही. अशावेळी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे आपली अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट करून घेणं.मात्र ती टेस्ट करणं म्हणजे काय आणि तिच्याकडून नेमक्या किती अपेक्षा करायच्या, आपले निर्णय कशाच्या आधारे घ्यायचे, कल समजून घ्यायचा, करिअरचा निर्णय नव्हे हे सगळं मनाशी स्पष्ट असायला हवं.मात्र हल्ली अ‍ॅप्टिटय़ूड चाचण्या म्हणजे अभिक्षमता चाचण्याही सर्रास कुठंही केल्या जातात. अनेकजण सांगतात की, टेस्ट केली; पण गोंधळ वाढला काहीच निर्णय घेता आला नाही. असं होतं कारण या चाचण्यांबद्दलच मनात प्रचंड गोंधळ असतो. ‘या परीक्षेसाठी काय तयारी करावी लागेल’, असा प्रश्न नेहमी पालक विचारतात. अनेकवेळा काही अतिजागरूक पालक एकाहून अधिक ठिकाणी जाऊन अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट करून घेतात आणि निर्णय वेगळे वेगळे आले की आणखी गोंधळात पडतात.

अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट म्हणजेनक्की काय?अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट म्हणजे नक्की काय? ती कोणाकडून करून घ्यावी? त्यांचे निष्कर्ष कसे समजून घ्यावेत? हे आधी समजून घेतलं पाहिजे. मानसशास्ननुसार अ‍ॅप्टिटय़ूडची व्याख्या काय तर ‘प्रशिक्षणामुळे फायदा होण्याची क्षमता’! म्हणजे आपला कल असा काय आहे की ज्याचं प्रशिक्षण मिळालं तर अधिक चांगलं काम, करिअर करता येऊ शकेल?ती क्षमता फक्त समजून घ्यायची असते, त्यामुळे ही टेस्ट कशात करिअर करू, असा काही निर्णय देत नाही. तर दिशादर्शक ठरते.त्यामुळेच या चाचणीसाठी तयारीची आवश्यकता नसते.मुळात ही एकच एक चाचणी नसते तर अनेक उपचाचण्यांमध्ये विभागलेली असते. उदा. भाषिक क्षमता, यांत्रिक क्षमता, गणित संकल्पाची क्षमता, तर्कसंगत विचार करण्याची क्षमता इ. सर्वसाधारण चाचण्या या वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या असतात. या चाचण्यांची उत्तरे देताना विद्याथ्र्यानी स्वतर्‍शी प्रामाणिक राहून उत्तरं देणं आवश्यक आहे. ते व्यक्तीच्या विकसित होऊ शकणार्‍या क्षमतांचं एकसंध चित्र असतं. सर्वच क्षमतांमध्ये  विद्यार्थी उत्तम असतोच असंही नाही.या चाचणीच्या निष्कर्षानुसार मानसशास्रज्ञ व्यवसाय मार्गदर्शन करतात तेव्हा अभिक्षमता चाचण्यांचेच निष्कर्ष तांत्रिकपणे लक्षात घेत नाहीत तर विद्याथ्र्याचं व्यक्तिमत्त्व, कौटुंबिक पाश्र्वभूमी, एखाद्या व्यवसायातील ताणतणाव, बुद्धिमत्ता, शारीरिक आरोग्य इ. गोष्टीसुद्धा विचारात घेतल्या जातात.  मानसशास्नच्या योग्य अभ्यासाअभावी या टेस्टनुसार काढलेले निष्कर्ष अपुरे किंवा चुकीचे ठरू शकतात. म्हणून आकर्षक जाहिरात, गोड बोलणं, मोठमोठी आश्वासन देणारे लोक यांना भुलून तिथं अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट करू नये. योग्य व्यक्तीकडून योग्य वेळी जर अभिक्षमता चाचणी करून व्यवसाय मार्गदर्शन करून घेतलं तर ते व्यवसाय निवडीसाठी नक्कीच फायद्याचं ठरतं!

*** 

अ‍ॅप्टिटय़ूड चाचणीची  गरज काय?

1. या चाचणीद्वारे विद्याथ्र्यामधील आत्मज्ञान व व्यवसाय निवडण्याबद्दल जागरूकता वाढीस लागते.2. विद्याथ्र्याना स्वतर्‍ची अभिरूची, अभिक्षमता, मूल्य कौशल्य याचा शोध घेऊन मग महाविद्यालयीन विषयांची निवड करणं सोपं जातं.3. योग्य व्यवसाय शोधून त्या संबंधी माहिती गोळा करणं,  माहितीची साधनं शोधून काढणं सोपं जातं.4. आपली व्यक्तिगत ताकद व कच्चे दुवे समजातात.

(लेखिका करिअर काउन्सिलर आणि मानसशास्त्रज्ञ आहेत.)