शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

शिकायचं काय? या प्रश्नाचं उत्तर देणारा भन्नाट जॉब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 13:16 IST

कुठला कोर्स करू? कुठं शिकायला जाऊ, या प्रश्नाचं उत्तर देणारे ‘एक्सपर्ट’ यापुढे महत्त्वाचे असतील. करिअर काउन्सिलर वेगळे हे फक्त शिकायचं काय नि कुठं याची वाट दाखवतील!

ठळक मुद्देएज्युकेशन काउन्सिलर सल्ला देणं हेच काम!

अतुल कहाते  

‘आमच्या काळी शिक्षणाच्या एवढय़ा शाखा नव्हत्या’, ‘इतके सगळे पर्याय उपलब्ध असल्यामुळे नेमकं काय शिक्षण घ्यावं हेच समजत नाही’, ‘भारतात शिकावं का परदेशी जावं?, ‘एमबीए करावं का, का पदवीनंतर नोकरीच शोधावी?’, ‘आयटीमध्ये आता स्कोप आहे का?’, ‘हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही; आता मी काय करू?’ यांच्यासारखे असंख्य प्रश्न आता घरोघरी पडलेले दिसतात. तुमच्या अवतीभोवती तर अनेक तरुण मुलांना हे प्रश्न पडतात. तुम्हालाही पडत असतीलच. अशावेळी वाटतं की, कुणीतरी नेमका सल्ला आपल्याला दिला असता तर आपला निर्णय सोपा झाला असता. गोंधळलेले मुलं-मुली, त्याहून जास्त गोंधळलेले पालक, या सगळ्याला काही प्रमाणात कारणीभूत असलेली आपली शिक्षणव्यवस्था (का शिक्षणाचा बाजार?) हे चित्न दिवसेंदिवस आणखी गंभीर होत जाणार आहे. या सगळ्याच्या जोडीला चांगल्या अभ्यासक्र मांमध्ये किंवा महाविद्यालयांमध्ये असलेल्या कमी जागा, आरक्षणाचे प्रश्न, नेमकं  काय करावं याचा काही केल्या उलगडा न होणं हे सारंच क्लिष्ट आहे. पर्याय वाढतात तसे निवडीचे गोंधळही वाढू शकतात.दुसरीकडे रोजगाराच्या संधी कमी होत चाललेल्या दिसत आहेत. उत्तम जीवनशैली लाभावी असं तर सगळ्यांनाच स्वाभाविकपणे वाटतं. त्यातच वेगवेगळ्या शिक्षणाच्या पर्यायांच्या दिसत असलेल्या चकाचक जाहिराती, अंगावर काटा आणणारे फीचे आकडे, सतत अमेरिकेकडे धाव घेण्याचं आकर्षण यामुळे परिस्थिती अजूनच अवघड होऊन बसते. आणि प्रश्न उरतोच की, नक्की करायचं काय? आपला कल नेमका काय आहे?

संधी कुणाला?म्हणूनच शिक्षण क्षेत्नाची सखोल माहिती घेऊन त्यानंतर रोजगार किंवा व्यवसाय याविषयीच्या उपलब्ध असलेल्या संधी या सगळ्या गोष्टींविषयी खात्नीशीर माहिती पुरवू शकणार्‍या लोकांची गरज अगदी प्रकर्षानं भासणार आहे. अर्थातच नुसत्या ऐकीव स्वरूपाच्या माहितीवर विसंबून कुणाचं शिक्षणाविषयीचं समुपदेशन करणं अवघड असतं. स्वतर्‍ जो पाण्यात किमान एकदा तरी उतरलेला आहे अशा माणसालाच त्या पाण्याची खोली माहीत असते. स्वाभाविकपणे कुणाला थेटपणे शैक्षणिक समुपदेशक बनता येणं कठीण आहे. वरवर वाटतं तेवढं हे काम अजिबात सोपं नाही. असंख्य पर्याय, सातत्यानं बदलत जाणारं चित्न, आपल्याला एखाद्या विषयाचं आकलन होण्याच्या आधीच त्यासंबंधीच्या रोजगार संधी कालबाह्य होत जाणं हे सगळं अत्यंत वेगवान आहे. शिवाय शिक्षण क्षेत्नसुद्धा सतत आमूलाग्र बदलत चाललं आहे. सातत्यानं नवनवे अभ्यासक्र म येत राहतात. पारंपरिक अभ्यासक्र म कित्येकदा बंद पडतात. परदेशी आणि अत्याधुनिक शिक्षण पद्धती आपल्याकडे वापरल्या जातात. त्यामुळे मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, कम्युनिकेशन या क्षेत्रात रस आणि प्रशिक्षण घेतलेल्यांसाठी या क्षेत्रात भविष्यात अनेक संधी असतील.

स्कोप का आणि किती?अर्थातच या क्षेत्नात येऊ पाहणार्‍या या सगळ्या गोष्टींचं नीटपणे आकलन तर व्हायलाच हवं; पण शिवाय समोरच्या माणसाचं म्हणणं नीटपणे समजून घेणं आणि त्याच्या परिस्थितीनुसार त्याला योग्य सल्ला देता येणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजेच उत्कृष्ट संभाषणकौशल्य अवगत असणं ही या कामाची मूलभूत गरज आहे. अक्षरशर्‍ दररोज स्वतर्‍ला अद्ययावत करत जाणंसुद्धा शिक्षण समुपदेशकाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. अनेक क्षेत्नांमधल्या लोकांशी बोलणं, त्यांच्याविषयी वाचणं, जगात नवं काय सुरू आहे हे समजून घेणं, कुठल्या गोष्टी का कालबाह्य होतात याचं आकलन करून घेणं अशाही गोष्टींचा त्यात समावेश होतो. आपल्याला स्वतर्‍ची विश्वासार्हता तशी कुठल्याही क्षेत्नात निर्माण करावी लागतेच; पण इथे तर हे अगदी आवर्जून करणं गरजेचं आहे याचंही भान ठेवणं आवश्यक आहे. अलीकडच्या काळात शिक्षण समुपदेशकाचे अल्पकालीन अभ्यासक्र म चालवले जातात. त्यांचा विचार जरूर करता येईल.