शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

चिडके, भडके, स्मार्ट कडके

By admin | Updated: May 20, 2016 09:59 IST

स्मार्ट फोन हातात आला, आपण सोशली अॅक्टिव्ह झालो, त्यानंतर आपलं वागणं कसं कसं बदललं? आपण चिडतो कधी, उखडतो कधी, कधी उदास होतो, कधी हायपर? कधी धीर सुटतो नी कधी आणि कसा आपला दिनक्रमच बदलतो याकडे जरा लक्ष द्या, आपणच आपल्याला वेगळे दिसू!

स्मार्टफोन आपल्या हातात आल्यानंतर आपल्याच जगण्यात झालेले बदल टिपण्याचा प्रयत्न आपण गेले काही आठवडे या कॉलमच्या निमित्तानं करत होतो.
एकमेकांशी फोनवर बोलणं यापलीकडे जाऊन आपण अनेक गोष्टी या स्मार्टफोनच्या मदतीनं करायला लागलो. सोशल होण्याच्या नव्या पद्धती आपल्याशा करत आहोत. अॅप्सच्या अवतीभोवती आपले आयुष्य आपण गुंफण्याचा प्रयत्न करत आहोत. नव्या ओळखी होत आहेत, जुनी काळाच्या ओघात हरवलेली नाती शोधून शोधून पुन्हा ताजी करतो आहोत. जगाशी मैत्री करण्याच्या नादात अनेक गोष्टींचं अवलंबत्वही पत्करत आहोत. आजर्पयत कपडे, दागिने, गाडय़ा या गोष्टी स्टेटस दाखवण्याच्या होत्या. हल्ली सोशल नेटवर्किग साइट्सवर आपण काय, किती आणि कसं बोलतोय हा स्टेटसचा विषय बनला आहे. कुठलाही नवीन ग्रुप तयार झाला की लगेच त्या ग्रुपवर विविध मेसेजेसचा पाऊस पडतो. कोण सगळ्यात पहिल्यांदा सुप्रभात करतंय याची चढाओढ चालू होते. एखाद्या ग्रुपवर सुप्रभात, विनोद, सुविचार किंवा तत्सम मेसेजेस पाठवू नयेत अशा सूचना दिलेल्या असतील तरीही तसे मेसेज टाकण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही. अगदी ग्रुपमधून काढून टाकलं तरीही दुस:या एखाद्या ग्रुपवर जाऊन मेसेजेस पाठवण्याचा मोह पूर्ण केला जातो. शिवशिवणा:या बोटांना रोखता येत नाही. मनाला आवर घालता येत नाही. त्यावरून ग्रुपमध्ये भांडणं झाली तरीही चालतात, पण अनावश्यक मेसेजेस टाकायचे नाहीत हा नियम पाळणं अनेकांना कठीण होऊन बसतं.
सुविचार, सुप्रभात आणि जगभरातल्या फॉरवर्ड माहिती पुढे ढकलत आपण किती ‘इण्टेलेक्चुअल’ आहोत, हे आपल्या सगळ्या परिचितांना आणि जेवढय़ा ग्रुपमध्ये आपण आहोत त्या प्रत्येक ग्रुपमधल्यांना दाखवण्याचा सोस संपत नाही. 
एक नव्या व्यसनाच्या जाळ्यात आपण अलगद अडकत चाललोय आणि त्यामुळे आपल्या वर्तनात बरेच बदल होत आहेत हे अनेकांना चटकन जाणवतही नाहीत.
पण व्यसन म्हटलं की त्याचे दुष्परिणाम आलेच. म्हणून या व्यसनापासून स्वत:ला वेळीच दूर करणं गरजेचं आहे. आपल्या वर्तणुकीत होणारे हे बदल आज सूक्ष्म आहेत, पण ते रोजच्या रोज होत आहेत म्हणून त्यांच्याकडे बारकाईनं पाहायला हवं, आणि यापैकी कुठले बदल आपल्याही संदर्भात झाले आहेत हे जरा तपासून पाहायला हवं!
 
आपल्या नेमक्या कुठल्या सवयी बदलल्या आहेत?
 
* अनेकांना रात्री झोप येत नाही. मग मोबाइलवर सोशल नेटवर्किग अपडेट्स बघत बसतात किंवा  मोबाइलवर गेम्स खेळत बसतात. ते सगळं बघता बघता झोप लागते. झोप येत नाही म्हणून मोबाइल आणि मोबाइल म्हणून झोप येत नाही या चक्र ात अनेक जण अडकले आहेत.
* उठल्याबरोबर पहिल्यांदा मोबाइल चेक करताना काल केलेल्या स्टेटस अपडेट्स ना किती आणि काय काय प्रतिक्रि या आल्या आहेत, लाइक्सची संख्या वाढली आहे का याकडे लक्ष लागून असते. सकाळी उठल्यावर आजूबाजूची सकारात्मकता मनात शिरण्याआधी सोशल नेटवर्किंग डोक्यात शिरते आहे.
*  सोशल नेटवर्किंगचा जगभर चाललेला अभ्यास सांगतो की, सोशल नेटवर्किंगमुळे माणसांमधल्या पेशन्स कमी होतायेत, नकारात्मक भावना वाढतायेत, ऐकीव माहितीवर विश्वास ठेवण्याचं प्रमाण वाढतं आहे, घटना किंवा व्यक्तीविषयी माणसांचं भलंबुरं मत आता सोशल नेटवर्किग साइटवरचे मेसेजेस ठरवतात. 
* माणसं खूप बोलतात पण विचार करतातच असं  नाही. विचार करून बोलतात किंवा सोशल साइट्सवर लिहितात असंही नाही.
* खोटी स्तुती करण्याचं आणि कारण नसताना संतापण्याचं प्रमाण वाढलं आहे. सतत सोशली ऑनलाइन अॅक्टिव्ह असणा:या माणसांमध्ये तीव्र भावनिक चढउतार बघायला मिळतात.
* असुरक्षिततेची भावना बळावते आहे. लहानसहान गोष्टींमध्ये असुरक्षितता निर्माण होते, ज्यामुळे मत्सर, अकारण स्पर्धेची भावना जोर धरते. ज्याचा थेट परिणाम म्हणजे मनातील वाढती नकारात्मकता.
* लैंगिक गरजा पूर्ण करण्यासाठीदेखील याच माध्यमावर अवलंबून राहण्याचं प्रमाण वाढलं आहे. ज्यामुळे जोडप्यांच्या नात्यांमध्ये ताण निर्माण होतो आहे. लैंगिक वर्तणुकीत बदल होतो आहे. 
* पालक सतत मोबाइलवर असतात त्यामुळे लहान मुलांनाही मोबाईलची चटक लागली आहे. म्हणजे वर्तणुकीचे बदल फक्त पालक, आजीआजोबा आणि तरुण पिढीत झाले आहेत असं नाही, तर ते पुढच्या पिढय़ांमध्येही होतायेत. हे अधिकच धोकादायक आहे.
* खोटं बोलण्याचं प्रमाण वाढलं आहे. आपण खूप वेगळे आहोत, हटके गोष्टी करतो आहोत, आपण जे नाही ते दाखवण्यासाठी जगाला सतत ओरडून ओरडून सांगण्याच्या नादात लोक सर्रास खोटे बोलत आहेत. 
* खासगी क्षण शेअर करण्याच्या नादात आपलं आणि खासगी असं काही शिल्लक ठेवायला हवं याचं भान सुटतं, संपतं आहे. 
* संवाद प्रत्यक्ष नसल्यानं अनेक प्रकारचे गैरसमज होताना दिसतात. समोरच्याला काय म्हणायचं आहे हे समजून घेण्याची तयारी कमी होतेय, इतकंच नाही तर, चटकन गैरसमज होणं त्यातून नात्यात ताण निर्माण होणं या गोष्टी सर्रास होत आहेत.
* या सगळ्याचा अर्थ असा होतो की संवादाचं हे माध्यम अजून आपल्याला नीट वापरता येत नाही. कारण ते नेमकं वापरायचं कसं याबाबतची साक्षरता आपल्यात निर्माण होत नाही. त्यातून या माध्यमाची चटकन सवय जडते आणि या सवयीतून बाहेर पडता येत नाही. सतत मोबाइलला नाक चिकटून राहणा:यांनी ताबडतोब आपल्या या सवयीचा विचार करायला हवा. आणि स्मार्टफोनच्या या जाळ्यातून स्वत:ला बाहेर काढायचं कसं याबद्दलही काही गोष्टी तातडीनं करायला हव्यात.
त्या काय?
वाचा पुढच्या !
 
- मुक्ता चैतन्य
muktachaitanya11@gmail.com
 
( लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)