शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

शिक्षण बंद, बस घरी!

By admin | Updated: April 16, 2015 17:09 IST

मोबाइल, फॅशनेबल कपडे, प्रेमप्रकरणाचं वारं आणि आर्थिक चणचण हे ठरताहेत आजही मुलींच्या शिक्षणाचे शत्रू! वाचक मित्रमैत्रिणी म्हणतात, कशाला सुधारणांच्या गप्पा मारता, सगळा समाजच ढोंगी आहे! -ऑक्सिजनच्या विशेष चर्चेत हाती लागलेली काही निरीक्षणं!

 
 
लगAापुरतं शिक?
काही दिवसांपूर्वी मी बसस्टॅण्डवर उभा होतो. तिथे मला माझी क्लासमेट दिसली. तिचे लग्न झालेलं होतं. एक मुलगाही होता कडेवर! खरं तर ती माङयापेक्षा जास्त हुशार होती; पण लग्नामुळे तिला शिक्षण सोडावं लागलं. मला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं की एका चांगल्या मुलीचं शिक्षण लगAामुळे थांबलं!
अजूनही ग्रामीण भागात मुलींना  शिक्षण दिलं जातं ते फक्त लिहिता-वाचता यावं म्हणून ! त्या शिकून स्वत:चं आयुष्य घडवू शकतात असे विचार करणारे पालक खूप कमी आहेत. त्या आपलं आणि आपल्या पालकांचं आयुष्य सुधारू शकतात हे मानायलाच अजूनही पालक तयार नाहीत. मुलींना फक्त दहावी-बारावीर्पयत शिकवायचं म्हणजे त्यांचं लग्न लावायचा मार्ग मोकळा असा पालकांचा समज आहे.
हे फक्त खेडय़ांमध्ये होते असा तुमचा समज असेल तर ते योग्य नाही. खेडय़ांमध्ये अशा गोष्टी जास्त प्रमाणात घडतात. पण लोकांना दोष देण्यापेक्षा त्यांची विचारसरणी कशी आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे.
मुली शाळेत जाताना त्यांना धमकावून सांगितलं जातं की माङया नावावर डाग लावला तर मारून टाकेल, जिवंत जाळेल, जीव घेईल. त्यात बंधनं भरपूर. मुलांशी बोलू नको, फोन घेऊन दिला तर शंभर वेळा चेक करतील आणि एखादा फोन मोबाइलवर आला की झाली प्रश्नावली सुरू. मग मुली अगोदरच घाबरून राहतात. 
शिकत असलेल्या मुलीही किती धास्तीत शिक्षण पूर्ण करतात हा खरंच अभ्यासाचाच विषय आहे!
- विनोद कटारे
औरंगाबाद
 
छेडणा:या तरुणांचं पाप
 माङयाच परिचयातली एक मुलगी होती. ती कॉलेजमध्ये शिकत होती. हुशार होती. पण एकदा मुलानं चक्क तिच्या वडिलांसमोर तिला छेडले. वैतागून त्या मुलीच्या वडिलांनी तिचं लग्न अवघ्या 4-5 दिवसातच करून टाकलं. पण मला एक प्रश्न अजूनही पडतो. त्या मुलीची छेड काढून त्या मुलांना काय मिळालं? तिचं लग्न करून देऊन तिच्या आई-वडिलांना काय मिळालं? मानसिक समाधान? 
विचार करा एखाद्या मुलीला त्रस देणं म्हणजे आपण तिचं शिक्षण बंद पाडणं. तिच्या आयुष्याची गतीच थांबवणं! हे पाप आपण का करतोय याचा विचार सा:यांनीच करायला हवा!- रामेश्वर गायकवाड 
 
 
संस्कृती जपा, मनं मारा !
वाईट वाटतं अनेकदा, ग्रामीण भागातच आपण का म्हणून जन्माला आलो असेल? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण आम्हा ग्रामीण मुलींना खरंच स्वातंत्र्य मिळालं का? संस्कृती, संस्कार, रितीरिवाज, परंपरा, आदर्श या सा:या गोष्टींना नजरेसमोर ठेवून प्रत्येक पाऊल टाकावं लागतं. कशालाही चुकूनही धक्का लागता कामा नये. आम्हाला काय वाटतं, याचा विचार मात्र कुणीही करणार नाही !
मुलींना साजेसा अशा पोशाखात आमची शाळा संपते. मग महाविद्यालयात जायचं म्हटलं की तोच पायघोळ सलवार, तीच अंक झाकेल अशी ओढणी. आमच्या वागण्या-बोलण्यावरून आमच्यावरच्या संस्काराची, आमच्या जातीची ओळख पटते.
पण आमच्या आवडी-निवडीचे कदर इथे कुणाला असते?  शाळा-महाविद्यालयात गप्पा, हसणं, रुसणं मौजमस्ती हे करता येतं पण घरात मात्र तोंडाला कुलूप. योग्य वयात मुलीनं लग्न करणं याला समाज मानतो मग त्याच वयात शिक्षणाला का मान्यता नसावी? ग्रामीण भागात अगदी दुर्मीळ लोक आहेत जे आपल्या मुलीच्या स्वप्नांना आशा-महत्त्वकांक्षेला समोर ठेवून मुलीच्या दृष्टीने विचार करतात. आम्ही असं म्हणणार नाही की आमच्या बाबतीत घेण्यात येणारे निर्णय योग्य नसतात. पण आमच्या मताला एकूणच किंमत शून्य!
शिक्षणाशी - पुस्तकांशी - खेळांशी मैत्री करण्याच्या स्वप्नात कधी लग्नाच्या वळणावर आयुष्य अचानक येऊन पोहोचेल याची तर साधी कल्पनासुद्धा आम्हाला नसते. काय सुधारणांच्या गप्पा मारणार? जग समोर धावतंय पण आम्हाला जीन्सची पॅण्ट हा शब्दसुद्धा माहीत नसावा, साध्या वेणीच्या पलीकडे आम्हाला कोणताही हेअरट कट माहीत नसावा. पैसा, आर्थिक चणचण ही कारणं तर आहेतच पण शिक्षण बंद होण्यास ग्रामीण भागातील समाजाचा दृष्टिकोनही तितकाच कारणीभूत आहे. जो आजही म्हणतो, मुलगी काय परक्याचं धन, जास्त शिकून शहाणपणा करायला लागली तर त्रसच, त्यापेक्षा बस घरीच! 
-मनीषा मंगलाताई रमेशराव शिंदे.
 
ंमुलं काय म्हणतात?
चूक समाजाची आहेच; पण.
मुलींचं शिक्षण का थांबतं?
शिक्षण बंद, बस घरी, असं म्हणत आलेल्या पत्रत चर्चा होती ती ग्रामीण भागात आजही मुलींची शिक्षणं का थांबतात?
नेहमीच्या कारणांपेक्षा काही वेगळी कारणंही समोर आली, जी जास्त धक्कादायक आहेत!
त्या कारणांचीच ही एक यादी; तीच पुरेशी बोलकी आहे!
1) पैसा नाही, आर्थिक चणचण. घरी काम करायला कुणी नाही, लहान भावंडांना सांभाळायचं म्हणून मुलींचं शिक्षण आजही थांबतं.
2) लगA करायचंय, झाली दहावी-बारावी आता पुरे म्हणून शिक्षण बंद होतं.
3) जवळपास शिक्षणाच्या सोयी नाही आणि तालुक्याच्या गावाला पाठवायलाही पालक तयार नाहीत म्हणून मुलींचं शिक्षण बंद होतं.
4) या नेहमीच्या कारणांपलीकडे मुलींचं बदलतं राहणीमान हा गावात चर्चेचा विषय होतो म्हणून पालक म्हणतात, बस घरीच ! म्हणजे काय तर मुलींचं केस कापणं, चांगलेचुंगले जरा फॅशनेबल कपडे वापरणं, हिल्स घालणं हे सारं गावभर चर्चेचा विषय होऊ लागतो. पालकांना अवतीभोवतीचे लोक नावं ठेवतात. म्हणून पालक मुलीचं कॉलेजच बंद करून टाकतात.
5) मोबाइल हा शिक्षणाचा नवा शत्रू झालाय. मुलगी फोनवर बोलताना दिसली की, ती कुणाशी बोलतेय याची गावभर चर्चा. काहीतरी तसलंच असेल म्हणून अफवा आणि म्हणून मग मोबाइलसह बाहेर जाणं, कॉलेजात जाणंही बंद होतं!
6) प्रेमप्रकरणाची शक्यता, मुलगी कुणा मुलाशी बोलताना दिसणं, कुणी मुलगा मागे लागणं, कुणी छेड काढणं यासा:याचा परिणाम एकच, मुलींचं शिक्षण बंद !
 
मुली काय म्हणतात?
आम्हाला ढोंगी समाज छळतोय .
 
किती चौकशा कराल?
आई-वडील नेहमी आपल्या मुलीची काळजी घेतात. तळहाताच्या फोडाप्रमाणो जपतात. पण मुलीचं महाविद्यालयीन शिक्षण सुरू झालं की, आई-वडिलांना श्वास घेणंही अवघड होते हे आजचं वास्तव आहे.
जर एखादी मुलगी ही सुंदर ड्रेस घालून, हातात मोबाइल, पायात हिल्सची सॅन्डल, गळ्यात बॅग घेऊन जाताना दिसली की तिच्याबद्दल गावभर चर्चा होणारच ! मुलगी बाहेरगावी शिक्षण घ्यायला गेली तर सगळ्या लोकांचे डोळे मोठेच होतात. मग जिकडे तिकडे त्या मुलीची चर्चा. त्यात आपल्या मुलीबद्दल कोणी काही वाईटसाईट बोललं तर आई-वडील त्या माणसांच्या बोलण्याकडे जास्तीच लक्ष देतात. 
मग सतत चौकशा, एकदम पोलिसी खाक्याच! कोणाशी मोबाइलवर बोलत होती, कुठं जातेस, एवढा का उशीर, कोण होतं बरोबर? असे सतत प्रश्न.  मुलगी कोणत्या मुलासोबत बोलताना जरी दिसली तरी नुस्ता धुमाकूळच. आई-वडील कसलाच विलंब न करता तिचं शिक्षण बंद करतात. म्हणतात बस घरीच!  फार अवघड असतं अशावेळी आईबाबांना समजावणं ! जवळजवळ अशक्यच!- कोमल भामरे
 
किती कोंडून घालाल?
मुलींनी शिकलं पाहिजे अस म्हणणं सोपं आहे; पण जेव्हा शिक्षणासाठी त्या घरातून बाहेर पडतात तेव्हा त्यांना घरापासूनच असंख्य संकटांना सामोरे जावं लागतंय तेही अगदी विनाकारण.
यावरून मला एका मैत्रिणीच्या शिक्षणाची कहाणी आठवली. एक थोडी बरी गोष्ट म्हणजे गावात बारावीर्पयत शिक्षणाची सोय होती. गावातल्या शिक्षणानंतर खेडय़ात किंवा जवळपास पुढच्या शिक्षणाची सोय नव्हती. त्यामुळे पुढच्या शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी प्रवेश घ्यावा लागला. त्यामध्येही भरपूर अडथळे, पहिलं तर घरच्यांची परवानगी इथपासून सुरू झालं ते घरातील काम आवरून सकाळची बस गाठणं हे सगळं चालू झालं.
कारण अटच अशी होती की, तुला शिकायचंय तर घरातलं सगळं आवरून जायचं. दोन वर्षे कशीबशी काढली पण शेवटचा वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच तिचं शिक्षण बंद करून घरी बसवलं आणि दिवाळीतच लग्न करून मोकळे झाले. तिला खूप वाईट वाटायचं की थोडय़ासाठी आपल्या शिक्षणावर पाणी पडलं. आम्ही दोघी भेटलो तेव्हा तिला म्हटलं एकदा घरच्यांशी बोलू का तुङया. तर म्हटली त्याचा काहीच उपयोग होणार नाही. मी त्यांना खूप समजावलं पण ते अगदी या वर्षाची परीक्षाही द्यायची नाही म्हणतात. शिकलं तेवढं बस्स झालं म्हणतात.
घरचे म्हणतात, आज ना उद्या कधी तरी लग्न करायचंय आणि शिकून म्हणो काय दिवे लावणार.
तिचं हे सारं बोलणं ऐकून मला प्रश्न पडला असं किती दिवस कोंडून रहायचं आणि का? ग्रामीण भागात मुलींना घरी विचारल्याशिवाय उंबरा ओलांडता येत नाही. जो समाज कधी आपल्या लेकी-सुनांसाठी म्हणजेच सर्व स्त्रियांसाठीच साधं मनमोकळं वातावरणही देऊ शकत नाही, त्यानं काय पुढारलेपणाच्या गप्पा माराव्यात? 
- मनीषा सावंत
 
मुलीही जरा शहाण्याच.
एकेकाळी चलू आणि मूल एवढचं सांभाळणारी स्त्री आज शिक्षणामुळेच स्वत:चं कर्तृत्व सिद्ध करते आहे हे खरंय. पण काही मुलींना मात्र दोन अक्षरं कळू लागली की, ती घरच्यांना ‘धडा’ शिकवायला सुरुवात करते. पालकांनी ठेवलेल्या विश्वासाचा चुराडा करते, हेसुद्धा खरं आहे.
मुलगी कितीही शिकली तरी एक ना एक दिवस ती लगA करून दुस:याच्या घरी जाणार, हे वास्तव आहे ना? समाजाचा दबाव असतोच पालकांवर, मग मुलीनं बाहेर काही गडबड केली, 
पालकांनी आणलेली स्थळं सतत नापसंत करायला सुरुवात केली किंवा घरातून पळूनच गेली. तर पालकांचं या समाजात काय होतं, याचाही विचार करा. असं काही आपली मुलगी करेल असा संशय जरी आला तरी मग पालक शेवटचं हत्यार काढतात, शिक्षण बंद, बस घरी! 
अशावेळी सगळा दोष पालकांना तरी कसा देणार?
- राजू गवळी