शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

इराणच्या रस्त्यावरचा ‘तरुण’ भडका नेमकं काय साधणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 12:41 IST

इराणच्या रस्त्यावर हिंसक उद्रेक आहे, पेट्रोलच्या किमती भडकल्या म्हणून लोकही भडकले आहेत आणि एक राष्ट्र अस्वस्थतेच्या उंबर्‍यावर धगधगतं आहे.

ठळक मुद्देइराण पुन्हा धगधगतं आहे आणि तरुणांसह सामान्य जनता रस्त्यावर उतरली आहे.

कलीम अजीम 

इराण हा जगातील सर्वात मोठा पेट्रोल उत्पादक देश मानला जातो. अन्य देशांच्या तुलनेत इथे सर्वात स्वस्त पेट्रोल मिळतं; पण आज हाच देश पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे त्नस्त झाला आहे. परिणामी स्थानिक जनतेने सरकारविरोधात बंडाचं हत्यार उपसलंय. इराणमध्ये पेट्रोलच्या दुप्पट झालेल्या किमतीमुळे जनक्षोभ उसळला असून, सरकारविरोधात अनेक लोकं रस्त्यावर उतरली आहेत.इराणच्या सुमारे 100 शहरांत सरकारविरोधात जनआंदोलने उभी झाली आहेत. शासनाने आंदोलकांना दंगलखोर आणि देशद्रोही घोषित करत, त्यांच्यावर खटले दाखल केले आहेत. इतकेच नव्हे तर त्यांच्यावर गोळीबारदेखील केला आहे. सरकारविरोधक व पोलीस यांच्यामधील चकमकीत आणि हिंसक प्रदर्शनात शेकडो लोकं मारली गेली आहेत. एमनेस्टी इंटरनॅशनलच्या मते या विरोध प्रदर्शनात तब्बल 106 लोकांना जीव गमवावा लागला आहे. संयुक्त राष्ट्राच्या मते हा आकडा वाढू शकतो. अर्थात इराणने मात्न हा दावा फेटाळून लावला आहे.दोन आठवडय़ांपूर्वी म्हणजे शुक्र वारी, 15 नोव्हेंबरला या वादाची ठिणगी पडली. इराण सरकारने पेट्रोलच्या किमती 50 टक्क्यांनी वाढवल्या. पेट्रोलवरची सबसिडी इराणी सरकारने पूर्णपणे बंद केली आहे. शिवाय पेट्रोलच्या अतिरिक्त वापरावर र्निबध घातले. पेट्रोलची वितरणव्यवस्था रेशनिंगद्वारे सुरू केली. वाढलेल्या किमतीतून जो अतिरिक्त पैसा शासनाकडे येईल त्यातून गरिबांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याचं सरकारचं धोरण आहे.  सध्या इराणमध्ये पेट्रोलची किंमत 1500 रियाल म्हणजे भारतीय 32 रुपये आहे. महिनाभरापूर्वी ही किंमत 21 रु पये प्रतिलिटर होती. नव्या नियमांमुळे आता नागरिकांना महिन्याला केवळ 60 लिटर पेट्रोल खरेदी करता येणार आहे. यापेक्षा जास्त हवं असेल तर त्यासाठी लिटरला दुप्पट रक्कम म्हणजे 30 हजार रियाल अर्थात 64 रु पये द्यावे लागतील.या निर्णयाच्या विरोधात लोकांनी नाराजी दर्शवली. इराणी लोकांनी सरकारविरोधी निदर्शने सुरू केली. हळूहळू करत हा विरोधी सूर अन्य देशांत पोहोचला आणि एकच भडका उडाला. सोशल मीडियातून या ठिणगीला हवा मिळत गेली व विद्रोही आंदोलनाला सुरुवात झाली. बघता-बघता हजारो तरुण चौकाचौकांत येऊन जमा झाले. वाहने एकाएकी थांबली. अचानक झालेल्या या कृतीमुळे सगळीकडे ट्रॅफिक जॅम झाले.   दुसर्‍या दिवशी म्हणजे शनिवारी आंदोलन अन्य शहरांत पसरले. आंदोलनाची दाहकता ओळखून सरकारने इंटरनेट बंद केलं. देशभरात इंटरनेट शटडाउन केलं गेलं. यासंदर्भात इंटरनेटवर नजर ठेवणार्‍या ‘नेटब्लॉक’ या संस्थेने एक निवदेन जारी करत सांगितले की हळूहळू अन्य शहरांतील नेटवर्कमध्ये कपात केली जात आहे. शेवटची माहिती हाती आली त्यावेळी इराणमध्ये इंटरनेट बंद होऊन 5 दिवस उलटले होते. इंटरनेट बंद केल्याने सरकारविरोधातला उद्रेक आणखीनच वाढला.इराणी लोकांचा बाहेरील जगाशी संपर्क पूर्णपणे तोडण्यात आलेला आहे. त्यांना सोशल मीडिया हाताळण्यास बंदी करण्यात आली आहे. इंटरनेट बंद केल्याने त्याचा मोठा फटका अन्य उद्योगांवर पडला आहे. मुद्रित प्रसारमाध्यमांच्या निवडक आवृत्त्या निघत आहेत. शिवाय इलेक्ट्रॉनिक मीडिया मोठय़ा शटडाउनला सामोरे जातोय.लोकांची नाराजी इतकी वाढली की, त्यांनी हातात शस्त्नं घेतली. जाळपोळ व नासधूस सुरू केली. हजारो आंदोलकांनी रस्त्यावर येऊन सरकारी बँका, खासगी दुकाने, पेट्रोलपंप्स आणि शासकीय कार्यालयांना आग लावली. राष्ट्रपती हसन रुहानी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ‘लोकांना विरोध, निदर्शने करण्याचा अधिकार आहे; परंतु दंगली आणि  निदर्शनात फरक असतो. आम्ही समाजात असुरक्षा माजविण्याला परवानगी देऊ शकत नाही.’गेल्या वर्षी मे महिन्यापासून अमेरिकेने इराणवर अनेक आर्थिक र्निबध लादली आहेत. परिणामी देशातील अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे. अनेक मूलभूत वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. र्निबधामुळे दैनंदिन वस्तूंच्या किमती आवाक्याबाहेर गेल्या आहेत. आयात बंद झाल्याने देशात गरजेच्या वस्तू बाजारातून हळूहळू गायब होत आहेत. परिणामी मूलभूत वस्तूंसाठी जनतेला दुप्पट-तिप्पट किंमत मोजावी लागत आहे.इराण पुन्हा धगधगतं आहे आणि तरुणांसह सामान्य जनता रस्त्यावर उतरली आहे.