शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमावर्ती राज्यांमध्ये उद्या होणारा मॉक ड्रिल पुढे ढकलला; 'ऑपरेशन शील्ड'ची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार
2
पुण्यात झाड कोसळून १ ठार; कोल्हापुरात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना
3
एक वर्षानंतर 'कोविड पॉझिटिव्हिटी दर जास्त, NB.1.8.1 व्हेरिएंट वाढले'; WHO ने दिला इशारा
4
शस्त्र परवान्यासाठी गोळीबाराचा बनाव; शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांना अटक
5
Vaishnavi Hagawane Death Case :'आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास'; हगवणेंच्या वकिलांच्या युक्तीवादावर वैष्णवीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया
6
हगवणे बंधूंनी नीलेश चव्हाणच्या मदतीने केला आई, बहिणीचा मोबाईल लंपास; पोलिसांची कोर्टात माहिती
7
Rohit Sharma Gautam Gambhir, IND vs ENG: खुद्द रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यासाठी 'या' व्यक्तीबद्दल गौतम गंभीरकडे केली विनंती
8
सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांची हिंडेनबर्ग रिपोर्टच्या आरोपातून सुटका! लोकपालांनी दिली क्लीनचिट
9
आमच्याकडे ५ कोटींच्या गाड्या; आम्ही ४० लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करु - हगवणेंचे वकील
10
पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
11
पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटपटूचे दोन्ही पाय कापून टाकले, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल वाईट
12
टॅरिफ आवश्यक, अन्यथा भारत-पाकिस्तान युद्धविराम भंग होऊ शकतो; ट्रम्प सरकारचा अमेरिकन न्यायालयात दावा
13
वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद
14
ड्रोन हल्ल्यांपासून वाचण्याचे मार्ग, ऑपरेशन शील्ड' अंतर्गत उद्या या ४ राज्यांमध्ये मॉक ड्रिल होणार
15
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'
16
माजी मंत्र्याचा सचिव, पाकिस्तानला पुरवत होता गुप्त माहिती! जैसलमेरमधून पकडला गेला आणखी एक गद्दार
17
इलॉन मस्क यांना नकार देणे 'अ‍ॅपल'ला महागात पडले; आयफोन वापरकर्त्यांना ही खास सेवा मिळत नाही
18
'मला रात्री घराबाहेर काढलं', परिणय फुकेंवर प्रिया फुकेंचे आरोप; सुषमा अंधारेंनी CM फडणवीसांना केली विनंती
19
बेडरूममध्ये बसली होती सवत, बघताच पहिल्या पत्नीला संताप झाला अनावर! पुढे पतीने जे केले, ते वाचून व्हाल हैराण
20
सर्वात मोठा खुलासा; पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड...

स्वप्न मोठी पण कृती शून्य!- असं होतंय का तुमचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 17:19 IST

डोक्यात विचार खूप ! स्वप्न मोठी ! धमक? - दांडगीच! पण करता काय? काहीच नाही. हातात सतत मोबाइल. घरकाम शून्य. दुपार्पयत झोपा आणि बडय़ा बडय़ा बाता यातच मनातली स्वप्न गरगर फिरतात. प्रत्यक्षात घडत काहीच नाही. असं का होतं?

ठळक मुद्देमला मोठं करिअर करायचं आहे, असं म्हणून कुणाचंच करिअर होत नसतं !

- श्रुती पानसे

दहावी - बारावी आणि अगदी पदवीच्या आसपासही असलेल्या, ‘पुढं काय?’ या प्रश्नाच्या उंबरठय़ावरच्या मुलामुलींच्या मनात डोकावून बघितलं तर काय दिसतं?स्वतर्‍च्या आयुष्याबद्दलची छान स्वप्नं.या स्वप्नांच्या जोडीला प्रचंड आशा, आपण जे ठरवू तेच होणार याबद्दल खात्नी. आपण आपल्या आयुष्यात भरारी मारणारच यावर विश्वास.मात्न?या सगळ्या कल्पनांना वास्तवाची, मेहनतीची, अभ्यासाची जोड लागते. सहनशीलता लागते. आपल्यापाशी जिद्द तर असावी  लागतेच. महत्त्वाचं म्हणजे कष्ट एक-दोनदा नाही तर सतत करावे लागतात. ते करण्याची तयारी ठेवावी लागते. हे सारं मात्र स्वप्नांच्या भरारीत लक्षात घेतलं जात नाही, किंवा लक्षातच येत नाही.यश आणि यशासाठीची तयारी असे दोन टप्पे कुठल्याही स्वप्नचे केले तर त्यामध्ये अनेक गोष्टी असतात. स्वप्न  पाहणार्‍या प्रत्येकाला यश हवंच असतं. मात्र स्वप्न  पाहण्यापलीकडे ते प्रत्यक्षात उतरावं म्हणून आता त्यासाठी काय चालू आहे? या प्रश्नाचं उत्तर शोधायला हवं.एकतर हल्ली सगळ्यांच्या हाती वेळखाऊ मोबाइल आहे.  ज्यातून काहीही मिळणार नाही, असे पबजीसारखे घातक गेम्स आहेत. इन्स्टाग्रामसारखी साधनं आहेत. घरात सतत बसून राहिल्यामुळे अंगात आळशीपणा वाढतो आहे. विविध मानसिक आजार जडताहेत. शारीरिक आणि मानसिक तत्परता कमी होते आहे. मोबाइल व्यसनाधीनता वाढते आहे.त्याचा परिणाम असा की, थोडंसं मनाविरुद्ध झालं की लगेच नैराश्य येतं. ‘मी जातो/जाते घर सोडून’ अशा आईबाबांना धमक्या दिल्या जातात. आकर्षण वाटणं, प्रेम प्रकरणं, अफेअर, त्यातली पॅचअप आणि  ब्रेकअप हे सारखं चालू असतं. जगताना जरा काही बिनसलं, हवं ते मिळण्याची एखादी पायरी निसटली तर या जगात आपलं कोणी नाही, आपण हे जग सोडून जायला पाहिजे, असे विचार मनात येतात.आणि त्या विचारचक्रात हरवून जे करायचं तेही आपण करत नाही. त्यामुळे नुस्ती स्वपंA, इच्छा, विचार यापुढे जायला हवं. आणि त्याही पुढे जाऊन यश हवं असेल तर काही गोष्टी स्वीकाराव्या लागतील, काही टाळाव्या लागतील. 

1. निर्णय विचारपूर्वक या वयातले बहुतेक सगळे निर्णय टोकाचे असतात. म्हणून आपले बहुतेक सर्व निर्णय कधी आनंदात, तर कधी आत्यंतिक प्रेमात, कधी दुर्‍खाच्या कडेलोटात, अनावर राग आणि प्रचंड संतापात घेतले जातात. याच्याच जोडीला कधी अपमानांचं वेड असतं तर कधी खोल निराशा. कोणत्याही भावनेच्या गर्तेत वाहून न जाता निर्णय घेता आले पाहिजेत. कोणत्याही बाबतीत लहानसंही यश मिळवायचं असेल तर  ‘नाही’ ऐकायला शिकायला तर हवंच. कोणीही ‘नाही’ म्हटलं म्हणून आपला प्रवास काही थांबणार नाहीये, तो चालूच राहणार आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे.काही वेळा आपण स्वतर्‍ला खूपच शहाणे समजतो, त्यामुळे आपल्याकडून निर्णय घेण्यात काही चुका होतात. याचं कारण टीनएजमधली मुलं भावनांच्या प्रभावाखाली असतात. कारण त्यांचा मेंदू अमिग्डाला या भावनेच्या केंद्रातून निर्णय घेतो. त्यामुळे त्याचाच प्रभाव त्यांच्यावर असतो.आपल्या मेंदूत एक विचारांचं केंद्र असतं. ज्याला आपण सारासार विचार करतो. ते प्री-फ्रंटल कॉर्टेक्स या भागात असतं. किशोरावस्थेत या केंद्रातून मेंदू विचार करू शकत नाही. थोडं मोठं झाल्यावर साधारण बाविशी- पंचविशीनंतर या केंद्रातून विचार सुरू होतो. यानंतर घेतलेले निर्णय सहसा चुकत नाही. यासाठी विचार करताना आणि कोणताही निर्णय घेताना तो योग्य पद्धतीने असावा यासाठी घाईत निर्णय न घेता, थोडं थांबून निर्णय घ्यायला पाहिजेत. त्याचा परिणाम चांगला होईल.

2. गोंधळाचं धुकं दूर करा‘माझ्या मनात कन्फ्युजन आहे,’ असं सारखं म्हटलं तर हे वाढेल. आणि नीट सोडवलंत तर सुटेल. कन्फ्युजन हे तात्पुरतं असतं. एकाच वेळेला दोन वेगळ्या  क्षेत्नांबद्दल आकर्षण वाटू शकतं. दोन्ही करणं शक्य नसतं, किंवा दोन्ही सोडणं शक्य नसतं. फार पूर्वी नाही; पण गेल्या काही वर्षात ज्यांनी ज्यांनी करिअरचा निर्णय घेतला आहे त्यांच्याशी बोला. आपल्याला तेच करिअर निवडायचं नसेल तरी. यातून आपल्याला सध्याच्या काळात नक्की काय चालतं, याची माहिती मिळू शकते. ज्यांना भेटाल त्यातले काही करिअरविषयी समाधानी असतील, तर काही असमाधानी असतील. त्यांचे अनुभव विचारा. सगळ्यांकडून ही जी माहिती मिळेल, ती  उपयुक्तच असेल.कन्फ्युज्ड मुलांनी हे समजून घ्यायला हवं की आत्ता काहीकाळ गोंधळ असला तरी चालेल. यातूनच पुढे आपली वाट सापडणार आहे.

3. योग्य तेवढय़ाच अपेक्षाकाही मुलं स्वतर्‍कडून अवास्तव अपेक्षा ठेवतात. त्या पूर्ण करू न शकणं, ठरवलेल्या वाटेवर अडचणी आल्या तर थेट आयुष्यातूनच उठल्यासारखं वाटणं. इतर पर्यायांचं अस्तित्व नाकारणं, अशा विचारांमध्ये गुरफटणारी मुलं असुरक्षिततेच्या छायेत वावरतात. त्यांच्या मनाचा एक कोपरा कायम भीतीच्या सावटाखाली असतो. अशी मुलं एरवी नीट वागली, तरी त्याच्या मनावर घातक परिणाम झालेले असल्यामुळे मन एकाग्र होण्यात अडथळे येतात. सगळ्यांशी मिळून मिसळून राहू - बोलू शकत नाही. मोकळेपणाने कुणाशी मैत्नी करू शकत नाही. आत्मविश्वास कमी होतो. मनावर झालेला परिणाम शरीरावरही दिसून येतो. असे नकारात्मक परिणाम त्यांच्यावर होत असतात. या नकारात्मकतेच्या  मुळाशी असलेली भावना जास्त घातक आहे ती म्हणजे स्वत्वाला बसलेला धक्का. स्वतर्‍च्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही यामुळे आलेली अस्वस्थता.यातून सावरण्यासाठी यश अणि अपयश दोन्ही पचवण्याची तयारी पाहिजे. 

4. घरातल्यांशी मोकळ्या गप्पावाढत्या वयातल्या मुलांमुलींसाठी घरातलं वातावरण हीदेखील एक समस्या असते. आपल्याशी घरातले लोक नीट वागत नाहीत, समजून घेत नाहीत, हा एक खूप मोठा आक्षेप असतो. त्यामुळे त्यांचं मन मित्नांकडे जास्त ओढा घेतं. पण यामुळे मनातला एकटेपणा संपत नाही.  चिडचिड वाढते.आईबाबा असे वागतात, यामागे एकच कारण आहे ते म्हणजे काळजी. तुमची काळजी, मार्काची काळजी, करिअरची काळजी, तुमच्या इमेजची काळजी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाईट सवयी/संगत लागू नये याची काळजी. घरची माणसं आपल्याला समजून घेत नाहीत असं वाटतं, सारखे सारखे प्रश्न विचारतात. तेव्हा यापैकी एका गोष्टीची किंवा अनेक किंवा या सर्व गोष्टींची काळजी एकाच वेळेला वाटत असते. म्हणून हे सर्व घडतं.काही झालं तरी घरात कोणतंही नकारात्मक वर्तन करायचं नाही, ही पहिली खूणगाठ घरातल्या सर्वानीच मनाशी पक्की करणं सगळ्यात आवश्यक आहे. एकमेकांसमोरच्या अडचणी दूर करायचा प्रयत्न करण्यासाठी एकमेकांशी बोलणं आवश्यक असतं.

5.  मन रिकामं न ठेवणंकाही मुला-मुलींच्या मनात कसला तरी न्यूनगंड तयार झालेला असतो. आपण इतरांपेक्षा कमी, अशी एक अतिशय जाणीव निर्माण झालेली असते. हा न्यूनगंडदेखील कशाचाही असू शकतो. चांगली बुद्धी, रूप, पुरेसे पैसे, चांगले कपडे नाहीत, मजा करायला गाडी नाही, चांगले मित्न नाहीत, असा कसलाही गंड मनात घर करून राहू शकतो. एकदा घट्टपणे मनात असा गंड तयार झाला की तो जाता जात नाही. अशा मुलांकडे कितीही चांगले गुण असले तरी या न्यूनगंडामुळे ते गुण बाहेर येऊ शकत नाहीत. आळस करणं, दिशाहीन असणं, करिअरचा चुकीचा निर्णय, घरातल्यांशी चांगला संवाद नसणं, व्यायामाचा, छंदांचा, चांगल्या मित्नमैत्रिणींचा चांगल्या माणसांचा अभाव, यामुळे जर काही चुकीच्या कल्पना घडत असतील तर या विचारांना मनात थारा न देणं चांगलं.म्हणून अशा गोष्टी आयुष्यात घडत असतील तर त्यावर उपाययोजना शोधा. नव्याने स्वतर्‍कडे बघा आणि चुका सुधारा स्वतर्‍च्या ! मुख्य म्हणजे स्वतर्‍चं मन फार काळ रिकामं ठेवू नका. गुंतवून ठेवा.  मोबाइल गेम्समध्ये वेळ आणि मन गुंतवून घेतल्यासारखं वाटतं. पण ते चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करणं आहे. ज्यावेळेस आपण काही प्रत्यक्ष काम करू आणि त्यात यशस्वी होऊ, आयुष्यात प्रोत्साहनपर असं काही तरी घडेल त्यावेळेस हे गंड आपोआप नाहीसे होतील.मात्र हे सारं आपोआप घडणार नाही. तुम्हालाच झडझडून उठून कामाला लागलं पाहिजे. जिद्दीनं कष्ट करत आपली वाट शोधली पाहिजे.त्याची तयारी आहे का?की आपण बसल्या जागीच फक्त गप्पा मारतोय, हे विचारा स्वतर्‍ला.( लेखिका मेंदूविकास अभ्यासक - सल्लागार आहेत)