शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती चितपट होणार? निकालाची उत्सुकता शिगेला
3
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
4
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
5
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
6
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
7
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
8
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
9
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
10
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
11
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
12
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
13
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
14
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
15
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
17
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
18
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
19
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
20
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?

दुबारापूछो

By admin | Updated: December 28, 2016 17:48 IST

आलिया भटची बहीण. ती रुढार्थानं आलिया इतकी यशस्वी, लोकप्रिय नसली तरी तिच्या करिअरमध्ये ती उत्तम यश मिळवते आहे.

शाहीन भट.आलिया भटची बहीण. ती रुढार्थानं आलिया इतकी यशस्वी, लोकप्रिय नसली तरी तिच्या करिअरमध्ये ती उत्तम यश मिळवते आहे.अलीकडेच तिनं एक पोस्ट लिहिली, ती म्हणजे वयाच्या १३व्या वर्षापासून मला डिप्रेशन छळतं आहे. मी जगतेय त्यासोबत. आणि अधूनमधून त्याचा त्रास होतो. पण मला डिप्रेशन येतं हे मी आज उघडपणे मान्य करते आहे. कदाचित दीपिकानं पुढं येत ते मान्य केलं, त्यातून मी हे जगजाहीर लिहिते आहे. माझ्या जवळच्या लोकांना ते माहिती आहे, पण आपल्याला डिप्रेशन हा आजार आहे हे असं मान्य करण्यात मला काही लाज वाटत नाही, कारण आजार हा आजार आहे.एका तरुण, फेमस मुलीनं हे उघड लिहिणं आणि स्टार असलेल्या तिच्या बहिणीनं ते मान्य करणं हे नव्या डिअर जिंदगीचंच एक रूप आहे. आणि डिप्रेशनविषयीची ही उघड चर्चा या वर्षीची एक वेगळी नोंद घ्यावी अशी गोष्ट आहे.* ही चर्चा खऱ्या अर्थानं जगजाहीर सुरू केली ती गेल्या वर्षी दीपिका पदुकोननं. यंदाही ती वर्षभर त्याविषयी बोलत होती. मुलाखत देत होती. लिहीत होती.* तिनं सुुरू केलेल्या लिव्ह, लव्ह, लाफ या फाउण्डेशनच्या वतीनं सोशल मीडियात एक ट्रेण्ड चालवण्यात आला. ‘दुबारापुछो’ असं त्याचं नाव. म्हणजेच आपल्या जवळच्या उदास, डिप्रेस्ट माणसांना पुन्हा पुन्हा विचारा, बोला, मदत करा. स्वत: बोला असं सांगणारा हा दुबारा ट्रेण्ड.* यावर्षीच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार भारतात डिप्रेशनचं प्रमाण वाढत असून अजूनही ३६% भारतीय तरुणांना डिप्रेशनसह मानसिक आजारांविषयी काहीही माहिती नाही.* मनाच्या आजारांविषयी उघड बोलणारे सेलिब्रिटी आणि सिनेमे हे त्यातल्या त्या या वर्षाचं एक यश.जीवखाऊट्रोलिंग.हा शब्द या वर्षी गाजला तो अमेरिकन निवडणुकीमुळे. आपल्याकडेही अनेक सेलिब्रिटी, स्टार्स, राजकारणी, पत्रकार यांना ट्रोलिंगला सामोरं जावंच लागलं. प्रसंगी माफी मागावी लागली.ट्रोलिंग म्हणजे काय तर इंटरनेटवर अनेक लोकांनी एखाद्या व्यक्तीवर, विधानावर तुटून पडत त्यांचा जीव नको करणं.आणि अशी जीवखाऊ प्रकरणं या वर्षी बरीच घडली. त्याची जंत्री करत नसली तरी हा ट्रेण्ड फक्त सेलिब्रिटीपुरता मर्यादित नव्हता तर सामान्य यूजर्संही अनेकदा या मनस्तापातून गेले.* सामान्य तरुणांनाही ट्रोलिंगचा सामना करावा लागला. फोटो, कमेण्ट एखादी पोस्ट यावरून अनेकदा दिवसेंदिवस अपमान सहन करावे लागले.* बॉडीशेमिंगवरून भयंकर मनस्ताप झाले. जान्हवी कपूर या श्रीदेवीच्या मुलीनं तर भलामोठा लेख लिहून या बॉडीशेमर्सना फटकावलं. दिसण्यावरून असं मुलींना छळण्याचे प्रकार अनेक घडले.* ट्रोलिंगमुळे न्यूनगंड येणं, बुलिंग होणं, रॅगिंग होणं असे प्रकार कॉलेज ग्रुप्समध्ये घडले. त्यामुळे याविषयावर संशोधन बंगलोरच्या प्रतिष्ठित निम्हान्स संस्थेनं सुरू केलं.* ट्रोलिंगचे बळी इतके की, अनेकजण आपली वास्तव जगातली प्रतिमाच त्यातून हरवून बसतील असं मानसोपचारतज्ज्ञांचं मत आहे. सेल्फीआणि पुढे..सेल्फी.हे प्रकरण तसं जुनं झालं.आता गोष्टी त्याच्यापुढे गेल्या.म्हणजे काय?तेच तर २०१६नं अधिक स्पष्ट केलं..* स्वत:चे विअर्ड जागेतले फोटो, खाणंपिणं, खाण्याचे पदार्थ, कुत्र्यांचे-मांजरांचे फोटो हे सारं जितकं विअर्ड म्हणून काढता येतील ते काढण्याचा ट्रेण्ड सध्या आहेच.* त्यातून जितके म्हणून चित्रविचित्र फोटो काढता येतील, तितके फोटो काढले गेले आणि सेल्फीचे ग्रुपी झाले. ग्रुपीचे ट्रुपी झाले. ट्रुपी म्हणजे टोळक्यांचे फोटो.* पण हे नुस्तं हौशीनं झालं नाही, तर त्याचं तंत्रज्ञान आणि उपकरणंही बदलली.* मोनोपॉड नावाची एक गोष्ट आली. म्हणजे त्यातून सेल्फी अजून उत्तम निघू लागले.* सेल्फी स्टिक्स होत्या, पण बेल्फी स्टिक्स आल्या, त्यानं मागच्या बाजूचाही फोटो काढता येऊ शकला.* सेल्फी रिंग आल्या, आयफोन आले, त्यातूनही फोटोचा स्तर पुढच्या टप्प्यात गेला.* सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक ब्यूटिफार्इंग अ‍ॅप्स आले, त्यातून काढलेले फोटो एडिट करून पोस्ट होऊ लागले.