शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

धोतर- कुडत्याचा ट्रेण्ड येईल?

By admin | Updated: July 16, 2016 14:26 IST

नुकताच जागतिक साडी डे सगळीकडे साजरा झाला. त्यादिवशी अनेक मुलींनी इतकेच नव्हे तर अगदी अभिनेत्रींनीही त्यांचे साडीतले फोटो सोशल मिडीयावर शेअर केले

- भक्ती सोमण
नुकताच जागतिक साडी डे सगळीकडे साजरा झाला. त्यादिवशी अनेक मुलींनी इतकेच नव्हे तर अगदी अभिनेत्रींनीही त्यांचे साडीतले फोटो सोशल मिडीयावर शेअर केले. फेसबुक तर साडीच्या फोटोंनी न्हाऊन गेले होते. एवढे सतत आपटणारे फोटो पाहून अनेकांनी, बापरे आता किती दिवस फक्त साड्याच साड्या चोहीकडे बघायच्या, साड्या नेसण्याचे कौतुक टिकेल चार दिवस असे काहीना काही बोलून दिवस गाजवला. त्यात आता  '१०० साडी पॅक्ट'नावाचा एक ट्रेण्डही आहे, वर्षाकाडी शंभर साड्या तरी नेसायच्याच असं ठरवणारा! 
एकीकडे महिलांना साड्याचे विविध प्रकार यानिमित्ताने नेसायला  मिळतायत. पण यावर मुलींची री ओढणाºया मुलांचं काय? त्यांनाही संस्कृती जपण्यासाठी म्हणा किंवा वेगळेपण दाखवण्यासाठी एखाद्या डे पेक्षा 'धोतर- कुडता'चा ट्रेंड सुरू करायला काय हरकत आहे?
आठवड्यातून एकदा धोतर नेसून त्यावर वेगवेगळ््या स्टाईलचे कुडते घालायचे आणि टाकायचे फोटो एफबीवर. हा प्रकार मुलांना 'धोती अपना स्टाईल' या आशयाने करता येऊ शकतो. मुलांचे वेगवेगळ््या रंगाच्या धोती वा धोतरामधले विथ कुडता फोटोही प्रचंड गाजतील. मुलींप्रमाणेच मुलांनाही मिरवता येईल. असे फोटो टाकल्यावर त्यांच्यावरही पडतील की कमेंटा. कुडत्यात युआर लुकींग फेब, अशा प्रकारच्या. 
पण मुलांनी असा ट्रेंड सुरू करायचा असेल तर एकतर त्यात काही महत्वाच्या गोष्टी बघाव्या लागतील.हेही तेवढेच खरे. याबाबतीत चैतन्य काळे म्हणतो. मुली अगदी आॅफिसमध्येही साडी नेसून जाऊ शकतात. पण मुलांना त्यांच्या आॅफिसमध्ये असं काहीतरी हटके करण्याची सवलत मिळणार आहे का? हा विचार व्हायला हवा. जर तशी संधी मिळाली नाहीच तर काय करायचं हा विचारही करायला हवा. शेवटी हा ट्रेंड सुरू करायचा की नाही हे त्याच्यात्याच्या आवडीनिवडीवर अवलंबून आहे. मी कराटे फिल्डमध्ये असल्याने मला तरी असं  धोतरात वावरता येणं शक्य नसल्याचं चैतन्य नमूद करतो. 
मुलींप्रमाणे मुलांनींही काहीतरी वेगळं करावं की! इच्छा असेल तर अगदी आपल्या सुट्टीच्या दिवशीही हे ट्रेंड आपण फोलो करू शकतो, जरा काहीतरी रोजच्यापेक्षा वेगळं अनुभवता येईल, असं संग्राम सुरवटे सांगतो. 
थोडक्यात काय तर साडी नेसून मुली खूप मिरवत असल्या तरी मुलांनाही मिरवायचं आणि असेल संस्कृती जपायची असेल तर धोतर-कुडत्याच्या ट्रेंडचा विचार करायला हवा! तुम्हाला काय वाटतं?