शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

महाराष्ट्रातली तरुण मुलं नक्की वाचतात काय?

By admin | Updated: November 3, 2016 17:57 IST

निर्माणची सातवी बॅच सुरू होत आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून साडेपाचशे अर्ज आले. प्रत्येक प्रवेश अर्जामध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता..‘तुम्ही वाचलेली आणि आवडलेली पाच पुस्तके कोणती?’ त्याच्या उत्तरातून हाती आलेल्या तपशिलाचा ‘निर्माण’ने केलेला हा एक अभ्यास..

- रखमा हेमा श्रीकांत / अमृत बंग / निर्माण टीम
 
आजची पिढी ‘सोशल मीडिया’वरच्या माहिती, मतांना ‘वाचन’ समजते. 
पुस्तकं, मासिकं आणि विविध दिवाळी अंक वाचणे अनेकांना तर माहितीच नाही. ‘आम्ही तर खूप वाचन केलं.’
वयस्कर लोकांचं, ज्येष्ठांचं आजच्या युवांबद्दलचं सर्रास मत. 
पण हे तितकंंसं खरं नाही.
डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी २००६ साली, अर्थपूर्ण जीवनाच्या शोधातील युवांसाठी ‘निर्माण’ हा उपक्रम सुरू केला. आता लवकरच निर्माणची सातवी बॅच सुरू होत आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून साडेपाचशे अर्ज आले.
प्रत्येक प्रवेश अर्जामध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता..
‘तुम्ही वाचलेली आणि आवडलेली पाच पुस्तके कोणती?’
एवढा तपशील हाताशी आहे तर अभ्यासच करू की, ही तरुण मुलं वाचतात काय, असं आम्ही ठरवलं आणि साडेपाचशेपैकी दीडशे अर्ज एक छोटंसं सॅम्पल म्हणून निवडले. त्यांच्या उत्तराचं विश्लेषण केलं. 
त्यातली माहिती अत्यंत रंजक आहे.
१५० पैकी ११ युवांनी एक किंवा एकही पुस्तक वाचलेलं नाही.
मात्र १३९ युवकांनी किमान दोन किंवा दोनपेक्षा जास्त पुस्तकं वाचली आहेत असं निदर्शनास आलं. बरं वाटलं, म्हणजे वाचनाची आवड अजून टिकून आहे तर...! 
आता या १३९ युवकांनी किमान पाच तरी पुस्तके वाचलीत असं ग्राह्य धरल्यास ६९५ वेगवेगळ्या पुस्तकांची नावं हाती यायला हवी होती. पण अर्जात एकूण ३५७ च नावं आलीत. याचा अर्थ, काही पुस्तकं अनेक युवांच्या वाचनात कॉमन आहेत.
महाराष्ट्रातील एकूण युवकांची संख्या लक्षात घेता १५० हा आकडा कमी असला, तरीही विश्लेषणाच्या दृष्टीने याकडे आपण प्रातिनिधिक म्हणून पाहू शकतो. ‘निर्माण’सारख्या उपक्र मात सहभागी होऊ इच्छिणारा, राज्यातला तुलनेने संवेदनशील आणि विचारी युवा वर्ग नेमका काय वाचतो याचा अंदाज यानिमित्ताने येऊ शकेल. 
या अर्जाचा अभ्यास करताना आमच्या लक्षात आलं की, आजचा युवा काही ना काही नक्कीच वाचत आहे. परंतु चिंतेची बाब ही की, वाचलेली अनेक पुस्तकं ही काही उत्कृष्ट म्हणावीत अशा दर्जाची नाहीत. (त्यामुळे सुधारणेला भरपूर वाव आहे.)
 
शोधलं तर काय दिसतं?
काय वाचतात ही तरुण मुलं? 
काही अत्यंत चांगली पुस्तकं या तरुणांनी वाचलेली आहेत. त्याची ही एक लिस्ट.
 
१) माझे सत्याचे प्रयोग - महात्मा गांधी, 
२) कोसला - भालचंद्र नेमाडे, कार्यरत- अनिल अवचट, 
३) माणसं - अनिल अवचट
४) करके देखो - सदा डुंबरे, 
५) माझा साक्षात्कारी हृदयरोग - डॉ. अभय बंग, 
६) विशाखा - कुसुमाग्रज, पर्व- एस. एल. भैरप्पा. 
 
x) The prophet - Khalil Gibran
8) Man's search for meaning - Viktor Frankl
9) Animal farm - George Orwell
10) 1984 - George Orwell   
11) The selfish gene - Richard Dawkins
12) The short history of nearly everything - Bill Bryson 
13) The stranger - Albert Camus
14) Three men in a boat - Jerome K. Jerome   
15) The Argumentative Indian - Amartya Sen
16) he emperor of all maladies - Siddharth Mukharjee
17) Banker to the Poor -  Muhammed Yunus
18) Old man and the sea - Ernest Heming
19) India after Gandhi - Ramachandra Guha
20) To Kill a Mocking Bird - Harper Lee
21) Everybody loves a good draught – P. Sainath
22) Small is beautiful -E.F.Schumacher
 
तरुणांमध्ये ‘पॉप्युलर’ असलेल्या पुस्तकांतील पहिली दहा नावं..
१) प्रकाशवाटा - डॉ. प्रकाश आमटे
२) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर 
३) मृत्युंजय - शिवाजी सावंत
४) श्यामची आई - साने गुरु जी
५) अग्निपंख - डॉ.अब्दुल कलाम
६) चेतन भगतची पुस्तकं
७) द अ‍ॅल्केमिस्ट - पाओलो कोएलो
८) द सिक्र ेट - रॉडा बर्न
९) माझे सत्याचे प्रयोग - म. गांधी
१०) ययाति - वि. स. खांडेकर
 
योग्य पुस्तके वाचल्यास दृष्टिकोन व्यापक होण्यास आणि विचारांची खोली वाढण्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. अनेक युवकांना नक्की कोणती पुस्तके वाचावीत हा संभ्रम असतो. त्यामुळे युवक फक्त प्रसिद्ध (पण प्रसंगी उथळ) किंवा इतर मित्रांनी वाचलेली पुस्तकेच वाचतात असे होते. 
“If you only read the books that everyone else is reading, you can only think what everyone else is thinking.” - Haruki Murakami
त्यामुळे वेगळा आणि चांगला विचार करायचा असेल तर दर्जेदार पुस्तके वाचणे हेदेखील तितकेच आवश्यक आहे. स्थळ-काळाच्या मर्यादा ओलांडून आपल्याला क्षणार्धात एका उत्कृष्ट संगतीत घेऊन जाण्याची क्षमता या पुस्तकांत असते. 
‘निर्माण’ प्रक्रियेमध्ये कायमच चांगली पुस्तके वाचण्यावर आणि त्यावर चर्चा करण्यावर निर्माणमध्ये भर असतो. 
युवकांनी जरूर वाचावीत अशा काही निवडक पुस्तकांची यादी निर्माणच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
http://nirman.mkcl.org/downloads.html