शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

हाय प्रोफाईल करिअरच्या व्याख्येत तुम्ही कोंबताय का स्वत:ला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 16:33 IST

लोकांनी ठरवलेल्या हाय आणि लो प्रोफाईल करिअरच्या खेळात अडकू नका, मुलगा-वडील आणि गाढवाची गोष्ट लक्षात ठेवा!

ठळक मुद्देस्वतर्‍ला विचारता मला काय आवडतं?पालकांनी सांगितलं म्हणून करिअरची उडी मारु नका.ऐपत आहे म्हणून कुठल्याही कोर्सला प्रवेश घ्याल का?कुठलं काम लो प्रोफाईल हे कुणी ठरवलं?डॉक्टर आणि इंजिनिअरच्या पलिकडे जग आहे, ते पहा.

-मयुरेश उमाकांत डंके

आपण जेव्हा गोष्टी ऐकतो तेव्हा त्यातून नेमकं काय शिकतो? आणि खरोखरच काही शिकतो का? मला तरी तसं वाटत नाही. कारण, प्रत्यक्ष पाहताना तरी समाजात असं काही दिसत नाही. हीच गोष्ट पहा. एक मुलगा आणि त्याचे वडील त्यांच्या गाढवाला घेऊन बाजाराकडे निघालेले असतात. एकजण म्हणतो, अरे, मुलाला चालवत कशाला नेतोस? गाढवावर बसवून ने. वडील ऐकतात, त्यांना पटतं. मुलाला गाढवावर बसवतात आणि चालू लागतात. काही अंतर चालून गेल्यावर पुन्हा एकजण म्हणतो, अरे, एवढा वयानं वाढूनसुद्धा स्वतर्‍ आरामात बसला आहेस आणि वडील बिचारे पायी चालत आहेत, त्यांचा जरा तरी विचार कर. मुलगा ऐकतो, त्याला पटतं. तो गाढवावरून उतरतो आणि वडीलांना गाढवावर बसायला सांगतो. पुढे चालू लागतात. काही अंतरावर पुन्हा एकजण म्हणतो, अरे, तू बाप आहेस की कोण आहेस? स्वत: आरामात गाढवावर बसलायस आणि ते पोर मात्न चालतंय बिचारं. तुला काही वाटतं की नाही? वडील ऐकतात आणि खाली उतरतात. पुन्हा चालू लागतात.

आपण आपल्या आयुष्यात असंच वागतो. निदान 90%  निर्णय तरी इतरांच्या मतांवरच अवलंबून राहून घेतो. आपल्याला रिस्क नको असते,म्हणूनच स्वतर्‍चं डोकं फारसं न वापरता इतरांच्या डोक्यानंच आपण चालत राहतो. खड्ड्यात पडायची वेळ आली तरीसुद्धा अनेकांना जाग येत नाही. खड्डा समोर दिसत असूनही लोक त्यात आपणहून जाऊन पडतात. हाय प्रोफाईल - लो प्रोफाईल नावाचा एक खेळ पालक त्यांच्या मुलांसोबत आयुष्यभर खेळत असतात. अमुक क्षेत्र  म्हणजे हाय प्रोफाईल आणि तमुक म्हणजे लो प्रोफाईल असं वारंवार स्वतर्‍च्या आणि मुलांच्याही मनावर ठसवत राहतात. या खेळात कुणीही कधीच जिंकत नाही. खेळात भाग घेणारे सगळेच नेहमी हरतात. कितीही कडवट वाटलं तरी हेच वास्तव आहे. आपण या खेळात कधीच जिंकणार नाही आहोत, हे आधी सांगितलं जात नाही. खेळ सुरू झाल्यावर ते आपोआपच समजतं. या खेळातून कोणत्याही क्षणी बाहेर पडण्याचं स्वातंत्र्य खेळाडूंना असतं. पण तरीही लोक आयुष्यभर हा हाय प्रोफाईल- लो प्रोफाईल खेळ वारंवार हरत खेळतच राहतात. महागडं आयुष्य म्हणजे हाय प्रोफाईल लाईफ आणि हाय प्रोफाईल लाईफ म्हणजेच सक्सेसफुल लाईफ असा कुठलाही सिद्धांत कोणत्याही तज्ज्ञ किंवा विचारवंतानं मांडलेला नाही. आपणच तो आपल्या मनानं रचलेला आहे. आणि तेच जगातलं एकमेव शाश्वत सत्य आहे अशाच आविर्भावात आपण वावरत असतो. पॉश लाईफ, आलिशान घर, महागड्या गाड्या, ब्रँडेड वस्तू, मनाला येईल तशी चैन करता येण्याएवढा पैसा - म्हणजे यशस्वी करिअर, हा पालकांच्या डोक्यात फिट्ट बसलेला फॉम्यरुला आहे. काही विशिष्ट क्षेत्रतलं शिक्षण घेतल्याखेरीज हे यशस्वी आयुष्य जगताच येत नसतं, असाही एक फॉम्यरुला या पालकांनी आपणहूनच डोक्यात बसवून घेतलेला असतो. गैरसमजांची ही भुतं उतरवायला खूप कष्ट घ्यावे लागतात.

माझ्या अगदी निकटवर्तीय कुटुंबात घडलेली ही सत्यकथा आहे. त्या गृहस्थांना तीन मुली आणि एक मुलगा. चारही अपत्यं हुशार. आपल्या चारही अपत्यांचा या गृहस्थांना विलक्षण अभिमान. चौघांनाही डॉक्टर किंवा इंजिनिअरच करणार, असं मोठ्या झोकात सांगण्यात यांना फार अभिमान वाटायचा. मोठी मुलगी इंजिनिअरींगला गेली. तिनं इंजिनिअरींगची पदवी मिळवली. दुस-या मुलीचं मराठी आणि संस्कृत खरोखरच अत्यंत उत्कृष्ट होतं. पण, शाळा मास्तरकी लो प्रोफाईल म्हणत वडिलांनी तिच्या डोक्यात यांनी मेडीकलचं खूळ भरलं. आर्ट्सला जाऊन नावारूपाला आली असती, ती मुलगी बारावीला सायन्सला 55 % मिळवून पास झाली. मेडीकलची शक्यताच संपून गेली. पण हाय प्रोफाईल-लो प्रोफाईल खेळ फार अजब. माणसाला भुलभुलैयात अडकवणारा. अगदी महाभारतातल्या द्यूतासारखाच. माणूस हरला तरी मान्य करायला तयारच नाही. भक्कम डोनेशन भरून मुलीला इंजिनिअरींगला घातली. 4 वर्षांचं इंजिनिअरींग पूर्ण करायला त्या मुलीनं तिच्या आयुष्यातली साडेसात वर्षं खर्च केली. 45% सरासरीनं तिनं इंजिनिअरींगची पदवी एकदाची मिळवली.

 याच मुलीच्या वर्गात एक मुलगी होती. शाळेत असताना ती अगदी साधारण होती. आयुष्यात कधीही, कोणत्याही परीक्षेत तिला 70 % हून अधिक गुण मिळाले नाहीत. दहावीत तिला 60% गुण मिळाले. तिनं आर्ट्सला अ‍ॅडमिशन घेतली. बारावीतही विशेष काही गुण मिळाले नाहीत. तिने पुढे समाजशास्त्न विषयात पदवी घेतली. एमएसडब्ल्यू केलं आणि स्वतर्‍च्या स्वतंत्न कामाला सुरूवात केली. निराधार मुलींना ती व्यवसाय प्रशिक्षण देणारी संस्था ती चालवते. या कामासाठी तिला अनेक पुरस्कारही मिळाले. अनेक परदेशांमधून तिला सन्मानानं बोलावण्यात येतं. आज तिची संस्था चांगली प्रसिद्ध झाली आहे. विशेष म्हणजे, या मुलीचे वडील आणि वरच्या इंजिनिअर मुलीचे वडील अगदी चांगले मित्र . एकाच ऑफिसात काम करणारे. एकानं या हाय प्रोफाईल- लो प्रोफाईल खेळात भाग घेतला, दुस-यानं नाही घेतला. याचा परिणाम काय झाला, हे तर मी लिहीलेलंच आहे.

आई आणि वडील दोघेही प्रोफेसर्स. एकुलता एक मुलगा. बारावी झाला आणि म्हणाला, मला टूरिझमच करायचंय. बारावी नंतर ट्रॅव्हल अ‍ॅन्ड टूरिझम च्या डिप्लोमाला अ‍ॅडमिशन घेतली. इंटरनॅशनल टूरिझम मध्ये स्पेशलायझेशन केलं. पुढे एका मोठ्या कंपनीत प्रोजेक्टकरता गेला. तिथंच नोकरीसाठी ऑफर मिळाली. दोन-अडीच वर्षं नोकरी केली. पुढं त्याच कंपनीने त्याला त्यांच्या युरोपच्या ब्रँचला पाठवलं. आता तो तिथं नोकरीही करतोय आणि टूरिझम बिझनेस डिझाईन चा अ‍ॅडव्हान्स कोर्स करतोय. एकदम आनंदात आहे. त्याच्या आई-वडीलांनी या हाय प्रोफाईल-लो प्रोफाईल खेळात भाग घेण्याचं ठरवलं होतं. पण, करिअर काऊन्सेलिंगच्या सेशन्समध्ये त्यांचं मत बदललं. मुलाला त्याच्या वकुबानुसार चांगलं शिकता आलं आणि तो चांगलं कामही करतोय. प्रोफाईल च्या खेळात कायम अपयशच पदरी पडणार. कारण, तो खेळच तसा आहे. लोकांच्या दृष्टीकोनातूच तो खेळ तयार झाला आहे.

एखाद्याचं काम किंवा एखादं क्षेत्न लो प्रोफाईल मानण्याचा आपल्याला कुणीच अधिकार दिलेला नाही. केवळ आपल्याला वाटतं म्हणून, कुणी लो प्रोफाईल किंवा हाय प्रोफाईल नसतं. खरं सांगायचं तर, आपल्याला फारसं जग माहितीच नसतं. लोकांचे नारळ खोवून देऊन महिन्याकाठी 60 हजारांहून अधिक कमाई करणारी व्यक्ती माझ्या परिचयात आहे. केवळ मंगल कार्यासाठी लागणारी भांडी भाडय़ानं देऊन करोडपती झालेल्या व्यक्तीही मी प्रत्यक्ष पाहिल्या आहेत. दातांच्या कवळ्या तयार करणार्‍या माझ्या एका जवळच्या मित्नानं पुण्यात स्वतर्‍चा बंगला बांधलाय, तोही वयाच्या 36 व्या वर्षी. एका मैत्रिणीची आई चकलीची भाजणी विकून वर्षाकाठी 8-9 लाखांपेक्षाही अधिक उलाढाल करते. आता त्या करंजीचं सारण करून देण्याच्या व्यवसायात उतरणार आहेत. त्यातून साधारणपणे 4 ते 5 लाख रूपयांची उलाढाल होईल, अशी त्यांची खात्नी आहे. ( या काकू एमएससी झाल्या आहेत. विषय - फिजिक्स) जगात पाहिलं तर अशी उदाहरणं लाखांनी सापडतील.

पण, आपण त्यातून काही शिकणार आहोत की नाही? हाय प्रोफाईल आणि लो प्रोफाईल यापेक्षाही हॅपी अँड सॅटिस्फाईड प्रोफाईल अधिक गरजेचं आहे. तेच आपल्याला आणि आपल्या मुलांना तारणार आहे. जर आपण यातून काहीच शिकणार नसू, तर हीच वडील, मुलगा आणि गाढवाची गोष्ट आपल्याला कायमच लागू होत राहणार.. !

 

 (लेखक पुणेस्थित मानसतज्ञ आणि करिअर कौन्सिलर  आहेत.)