शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

do u hate Monday ?

By admin | Updated: November 17, 2016 17:00 IST

सोमवार छळकुटा, नकोसा वाटणाऱ्यांचं प्रमाण जगभरात वाढतं आहे. या नव्या आजाराचं नाव आहे,मंडे ब्लूज. का येतेय या आजाराची साथ?

- ओंकार करंबेळकर 
 
‘अगं आई, फक्त पाच मिनिटे झोपू दे’ हे वाक्य किंवा जोरजोरात वाजणाऱ्या गजराच्या घड्याळाकडून पाच-पाच मिनिटांची मुदतवाढ घेत डोक्यावर पांघरूण ओढून झोपणं हे अनेकांसाठी तसं रोजचंच चित्र असतं.पण काहींसाठी त्यातही सोमवार फार जड जातो.आणि नव्या जगात तर नव्यानं विकेण्ड कल्चर आलं आहे. शुक्रवार उजाडता उजाडताच अनेकजण या विकेण्ड मूडमध्ये जातात. आणि एन्जॉय करतात. पार्टी हार्डर हाच त्यांचा नारा. आपल्या कामाचा आठवडाभराचा शीण घालवण्यासाठी त्यांचं तन-मन रविवारकडे चुंबकासारखं आकर्षित होत असतं. पण सोमवारचा सूर्य उजाडला की मात्र हेच चुंबक गळून पडतं. अनेकांच्या हातापायातील ताकदच गेल्यासारखी होते. कंटाळा येतो. उदास वाटतं. नको वाटतं ते आॅफिस आणि कॉलेज आणि क्लास. सोमवारी सकाळी वाटणाऱ्या या दु:खी, कंटाळवाण्या भावनेला ‘मंडे ब्लूज’ असे म्हटले जाते. काहींना असं दररोज सकाळी वाटतं. काम करायचा कंटाळा येतो, मूड चांगला नसतो त्याला मॉर्निंग ब्लूज असं म्हणतात. दिवस डोक्यावर येता येता हा प्रकार संपतोही!पण मंडे ब्लूजची मात्र सध्या जगभर चर्चा आहे.पाच दिवसांचा कामाचा आठवडा असणारे लोक शुक्रवारी आणि इतर लोक शनिवारी एकदम धमाल करायच्या अपेक्षेने आनंदात सुटीवर जातात. टीव्हीवरती भरगच्च दाखवले जाणारे कार्यक्रम, दोस्तांचा कल्ला, खेळ, गाणी, दंगा-मस्ती, पार्टी हे सगळं करून झाल्यावर रविवारी रात्रीपासूनच मग अनेकांना सोमवारची काळजी वाटू लागते. आता उद्या पुन्हा तेच काम, त्याच मिटिंज तेच लोक, तीच कामाची जागा, यातून आपली सुटका नाही असे विचार मनात यायला लागतात. आणि रविवार संध्याकाळपासूनच त्यांचा मूड जातो. सोमवारी सकाळी उठायला टाळाटाळ करत कसंबसं तयार होत ते दोन पायांवर उभं राहतात आणि खिन्न मनानं कामालाही लागतात. पण काम न करण्याची, घराबाहेरच न पडण्याची ही भावना त्यांचा दिवस खराब करते. काही काही लोक तर चक्क आजारपणाचं कारण देत सोमवारी अनेकदा आॅफिसला दांडी मारतात, किंवा सोमवारी कॉलेजमध्ये न जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. एखाद्या मोठ्या सुटीवरून आॅफिसला जातानाही हीच भावना मनामध्ये तयार होत असते. सात-आठ दिवस सुटीचा आनंद घेतल्यानंतर पुन्हा आॅफिसमध्ये जाऊन काम करण्यास मन सहजासहजी तयार होत नाही.हे सारं कधीतरी होणं काही फार अबनॉर्मल नाही. पण नेहमीच असं होत असेल तर अनेकदा मानसोपचारतज्ज्ञांकडे जायची वेळ येते. तशी खरं तर गरज असते. कारण मनावर ही उदास काळजी का चढते? हे शोधून ती पुसण्याची गरज असते. बरेचदा योग्य आहार, व्यायाम, वाचन, संगीत आणि आराम यांच्या मदतीनं आपण तंदुरुस्त राहिलो तर असे औदासीन्याचे झटके तुलनेनं कमी येतात. त्यात आपल्याला आपलं काम आवडणं किंवा मनापासून ते आवडून घेणं हेही महत्त्वाचं असतंच.पण जगभरात चिंतेचा विषय असा आहे की, काही केल्या अनेकांना सोमवार काही आवडत नाही...तो न आवडण्याची कारणं उघड आहेत, पण उपाय मात्र फार कमी लोक करतात.सोमवार नव्हे, भलतंच काही छळतंय तुम्हाला!!मंडे ब्लूज. म्हणजे सोमवार नकोसा वाटणं. असं का होतं, त्याची कारणं शोधायला हवी.थकवा, एकसुरी काम, कोणत्याही गोष्टीचे समाधान न वाटणं, नियोजनातील चुका याबाबी समोर येतात. काम करतो त्या जागेविषयीच मनात बरी भावना नसणं, ते ठिकाण घरापासून दूर असणं किंवा पगार अपेक्षेपेक्षा कमी मिळणं अशा बाबी अनिच्छा निर्माण करू शकतात. तेच तरुण मुलांचंही. शिक्षणातील तोच तोचपणा न आवडणं, आपण जे शिकतोय तेच न आवडणं किंवा नावडत्या विषयाचा सोमवारीच पहिला तास असणं या इतरांना छोट्या वाटणाऱ्या गोष्टीही काहींना फार छळकुट्या वाटू शकतात. मंडे ब्लूज ही संज्ञाच मुळी व्यक्तिनिष्ठ आहे. प्रत्येकाच्या अनुभवानुरुप, वेळेनुसार ती बदलते. त्यामुळे आपल्याला होणाऱ्या त्रासाकडे तो त्रास आहे असं न पाहता, त्यावर उत्तर शोधलं पाहिजे. थोडा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे.
१) सोमवारचं प्लॅनिंग विकेण्डलाच विकेण्डला काय करायचं अनेकांचं आधीच ठरलेलं असतं, पण तुम्ही सोमवारी काय करणार आहात, असं विचारलं तर ते काळजीच्या स्वरात ‘काम’ असं कोरडं उत्तर देतात. त्यामुळे शुक्रवारीच जर सोमवारचं प्लॅनिंग करून ठेवलं तर असा कोरडेपणा येत नाही. आपण स्वत:च सोमवारसाठी काही इंटरेस्टिंग ठरवून ठेवू शकतो. सोमवारसाठी काही विशेष चांगलं काम राखून ठेवलं तर ते करण्यात मजा येईल. सोमवारही हवाहवासा वाटेल.
२) रविवारी आराम शरीराला आणि मनाला बरं वाटण्यासाठी रविवारीच योग्य आराम करण्याची गरज आहे. रविवारी फार श्रम झाले तर तुमचे शरीर दमलेलेच राहील आणि त्याचा परिणाम सोमवारवर होईल. उत्तम आरोग्य असले तर मनही तितकंच शांत आणि उत्साही असतं.
३) सोमवारचा स्वीकारतुम्ही सोमवार टाळू शकत नाही. हे स्वीकारा. आणि या दिवसात आपण मनासारखं, आनंदी कसं जगू शकू असा विचार करण्याची मनाला सवय लावा.
४) स्वत:ला खूश करा सोमवारी काहीतरी भारी प्लॅन करा. घर सोडण्यापूर्वी सकारात्मक विचार केल्यास दिवस आनंदात जाऊ शकेल. आवडत्या रंगाचा शर्ट किंवा ड्रेस तुमचा मूड सहज सुधारू शकेल. गोष्टी छोट्या असतात, पण करून पाहिल्या तर आपली मन:स्थिती सुधारू शकते.- हेमांगी म्हाप्रोळकर, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट
 
- ओंकार करंबेळकर( ओंकार लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहे.) 
onkark2@gmail.com