शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गाईड नको, डोकं सांभाळा!

By admin | Updated: June 9, 2016 12:06 IST

जर आपल्याला आयुष्यात अचूक रस्ता धरायचा असेल तर कुणालातरी मार्गदर्शक म्हणून निवडलं पाहिजे.बरोबर ना? कुठे पिकनिकला चाललो असेल तरी कुणीतरी गाईड लागतो दिशा दाखवायला .मम्मी पप्पा पण म्हणतात, ‘ती चौथ्या मजल्यावरची पिंकी बघ, दहावीला तिला 94% मार्क मिळाले, तिचा गाईड म्हणून उपयोग कर.

जर आपल्याला आयुष्यात अचूक रस्ता धरायचा असेल तर कुणालातरी मार्गदर्शक म्हणून निवडलं पाहिजे.बरोबर ना? कुठे पिकनिकला चाललो असेल तरी कुणीतरी गाईड लागतो दिशा दाखवायला .मम्मी पप्पा पण म्हणतात, ‘ती चौथ्या मजल्यावरची पिंकी बघ, दहावीला तिला 94% मार्क मिळाले, तिचा गाईड म्हणून उपयोग कर.
 
हे सगळं ठीक आहे हो पण याच गाईड नावाच्या गोष्टीनं आपलं डोकं निकामी केलंय, कल्पकता  शून्यावर पोहोचवली आहे. याची सुरूवात पाचवीपासूनच होते. मोठी माणसे म्हणतात ‘वाचाल तर वाचाल’.  पण मला वाटतं ‘या गाईडला वाचाल तर फसाल’. आज मी या गाईडला चांगलं खडसवणार आहे आणि जाब विचारणार आहे, आज याच्यामूळेच माङया बुद्धीला गंज लागला आहे.
त्या दिवशी मॅडम म्हणाल्या  आई  वर निबंध लिहून आणा, तेव्हा हे गाईड म्हणालं,  ‘ माङया 385 नंबरच्या पानावर  आई  निबंध आहे’. कर कॉपी. पण माङया आईविषयी लिहायचं तर असं कॉपी करुन कसं चालेल. मग गाईड मिटलं नी माझं मी लिहिलं.
जे गाईडच तेच प्रश्नसंचाचंही. 
आळशी मुलांसाठी काठावर पास होण्याची उत्तम सोय. वर्षभर मस्ती, टाईमपास, टवाळक्या करायच्या आणि  परिक्षेच्या एक दिवस आधी यातून अभ्यास करून ढकलपास व्हायचं. या रेडिमेडमुळे आम्ही पुस्तकच वाचणं बंद केलं. 
अनेकांच्या बुद्धिमत्तेचा जीवच घेतलाय त्यांनी. दहावीत मार्क भरपूर, पुढेही गाईड, रेडिमेड नोट्स, प्रश्नचिन्हं आहेतच सोबत पण स्वत:ची निर्णयक्षमता, विषय समजणं सारं बंद. 
अती होतंय हे सारं, निदान आपण आपल्यापुरतं तरी पुस्तकांना जवळ करत, गाईडला नाही म्हणू.
- राम दादाभाऊ पंडित
 
 
वाचक कट्टा
 
हा कट्टा खास तुमच्यासाठी.
मनातलं सारं शेअर करण्याची एक खास जागा. तुमचाही लेख या वॉलवर झळकू शकतो. या कट्टयावर त्याची चर्चा होऊ शकते.
तेव्हा लिहा आणि तुमचे लेख आम्हाला oxygen@lokmat.com
वर मेल करा.
निवडक लेखांना या वाचक कट्टय़ावर झळकण्याची संधी