शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

फेसबुक अकाऊंट डिलीट करताय? पण...

By admin | Updated: June 8, 2017 11:51 IST

आपल्याला वाटलं केलं अकाऊंट डिलीट इतकं हे प्रकरण सोपं नाही. काळजी घ्या !

 - निशांत  महाजनअनेकांना अधूनमधून झटका येतो, ते लिहितात आपल्या टाइमलाइनवर.. आय अ‍ॅम क्विटिंग. किंवा मी फेसबुकचा निरोप घेतोय, बास आता, पकलो आता. जातो आता. मग त्यांचे मित्रमैत्रिणी गयावया करतात, म्हणतात जाऊ नकोस. थांब. काय झालं? कुणी काही केलं का? आमचं काही चुकलं का? आम्ही तुला मिस करू? असं बरंच काही होतं. शे-दोनशे कमेंट येतात. परिणाम? त्यातले काहीजण चारसहा दिवस, काही चारपाच महिने जातात. काही जातही नाहीत. काही गेलेले परत येतात. हे चक्र चालूच राहतं. आणि मग काही महिन्यांनी तेच नाटक परत. आम्ही सोडून जातो, निरोप कसला घेता माझा, जातो आता, असं काहीही इमोशनली सुरुच राहतं. मात्र काहीजण तसे नसतात. ते खरंच कंटाळतात या साऱ्याला आणि फेसबुकचा कायमचा निरोप घेतात. मात्र आपलं अकाउण्ट डिलीट करताना काही गोष्टींची काळजी घ्या. नाहीतर जी माहिती आपण डिीलीट केली असं तुम्हाला वाटतं तिचाही दुरुपयोग होऊच शकतो.१) स्टेप बाय स्टेपतुम्ही ठरवलं की अकाऊंट डिलीट करायचं तर एकेक करून आधी तुमच्या तिथल्या काही फोटो पोस्ट डिलीट करा. जे तुम्हाला फार महत्त्वाचं वाटतं किंवा काहीच डिलीट करू नये असं वाटतं ते डाउनलोड करुन स्वत:कडे सेव्ह करा.२) एक्सपाण्डेड आर्चिव्हफेसबुककडे तुम्ही जुना डेटा मागू शकतात. त्यामुळे सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही ती माहिती डाउनलोड करू शकता. डिलीटही करू शकता.३) लॉग पहाआपल्या तमाम फेसबुक अ‍ॅक्टिव्हिटीचा एक लॉग असतो. त्या लॉगमधून महत्त्वाच्या पोस्ट कळतील, त्या डाउनलोड करुन घ्या. बाकी सारं लॉगसह डिलीट मागून घ्या.४) वाढदिवस?फेसबुकमुळे आपल्याला अनेकांचे वाढदिवस कळतात. मात्र ते डिलीट केले तर? त्यामुळे फेसबुककडे फ्रेण्ड्स बर्थडची माहिती मागा. ती माहिती मिळेल. महत्त्वाच्या तारखांना फोनमध्ये रिमाइंडर लावा.५) डिअ‍ॅक्टिव्हेट की डिलीट?खरंतर आपलं अकाऊंट डिलीटच करायची गरज नसते. कारण काय सांगावं डिलीट केल्यावर दोन महिन्यानं पुन्हा परत यावंसं वाटलं तर? त्यापेक्षा काही काळासाठी आपलं अकाऊंट डिअ‍ॅक्टिव्हेट करून ठेवा. ते फक्त तुम्हाला दिसतं, इतरांना दिसणारच नाही. परत आलोच तर पुन्हा अ‍ॅक्टिव्हेट करता येतं. त्यामुळे डिलीट करण्याची घाई करू नका. यासंदर्भात फेसबुकपेज हेल्पसेंटरमध्ये ही माहिती मिळेल.