शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

सायबर सिक्युरिटी आणि हॅकिंग- अमर्याद संधी देणारं नवीन काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 06:00 IST

सगळे व्यवहार ऑनलाइन व्हायला लागले, पैशांचेही, भावनांचेही. त्या व्यवहारातही सुरक्षितता आणि गुन्हे झालेच तर त्याचा शोध यांची जबाबदारी सांभाळणारं एक सतत बदलतं जग

ठळक मुद्देया क्षेत्रामध्ये अक्षरश: अमर्याद संधी आहेत. शिकण्याची भूक तेवढी हवी!

अतुल  कहाते  

आपण सगळेच आता खूप मोठय़ा प्रमाणावर माहिती वापरतो, साठवतो आणि एकमेकांना पाठवतो. याच्या जोडीला सरकार, कंपन्या, उद्योग, माध्यमं या सगळ्यांकडूनही प्रचंड मोठय़ा प्रमाणावर माहिती बाहेर पडते. आपल्याला आपल्या खासगी माहितीची सुरक्षितता जपणं खूप महत्त्वाचं वाटतं. याच्या जोडीला आधार किंवा पॅन कार्ड यांच्याशी संबंधित असलेली माहिती, बॅँका आणि इतर वित्तसंस्था यांच्याकडची माहिती, वेबसाइट्सकडे असलेली माहिती, सरकारी गुपितं, कंपन्यांची खासगी माहिती हे सगळं सुरक्षित ठेवणं अत्यावश्यक ठरतं. त्यासाठी कामही होतच असतं.मात्र एवढं करूनही कुणी ही माहिती चोरण्यात यश मिळवलं तर?  हे सगळं टाळणं ‘सायबर सिक्युरिटी’च्या तंत्रज्ञानामध्ये येतं. मुळात माहिती सुरक्षित ठेवणं आणि खूप प्रयत्न करूनही ऑनलाइन गुन्हे घडलेच तर त्यांचा तपास करणं हे या तंत्रज्ञानाच्या मुळाशी आहे.अलीकडच्या काळात ऑनलाइन छळ, ऑनलाइन खंडणी, ऑनलाइन गुंतवणुकीची भुरळ असे असंख्य प्रकार वाढीला लागल्यामुळे हे तंत्रज्ञान दिवसेंदिवस जास्तच गरजेचं व्हायला लागलं आहे. 

हे भविष्यात महत्त्वाचे का ठरेल?

आधुनिक माणूस अन्न, पाणी, वस्र, निवारा यांच्याखेरीज मोबाइल आणि इंटरनेट याशिवायसुद्धा जगू शकत नाही असं म्हटलं जातं. हे जवळपास खरं असल्याचं चित्र सगळीकडे दिसतं. फेसबुकवर जगातले दोन अब्ज लोक असल्याचं मानलं जातं. व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सची संख्या तर मोजण्यापलीकडची असावी अशा वेगानं वाढत चालली आहे. इंटरनेटवर साठवल्या जात असलेल्या माहितीचं प्रमाण आपल्याला अचंबित करून सोडणारं आहे. विजेचं बिल भरण्यापासून ते आपल्या कुटुंबातल्या अगदी जवळच्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यार्पयत सर्वच गोष्टी आताशा इंटरनेट आणि मोबाइलच्या माध्यमातून होतात. अनेकजण आता खरेदी आणि  बॅँकांचे तसेच विम्याचे व्यवहार ऑनलाइन करतात. शेअरबाजार, म्युच्युअल फंड आणि इतर सगळी गुंतवणूकही आता अधिकाधिक ऑनलाइनच होताना दिसते. अशी असंख्य उदाहरणं देता येतील. नवी पिढीच्या तर हातालाच मोबाइल नावाचा अवयव फुटला आहे. अशा परिस्थितीत माहितीचा महास्फोट आणखी अक्राळविक्राळ रूप धारण करत जाणार आणि त्याचबरोबर माहितीच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणखी चिघळत जाणार यात शंका नाही. त्यात बव्हंशी लोकांना याविषयीचं अगदीच जुजबी ज्ञान असल्यामुळे याविषयीचे गुन्हे अजून वाढणार हेही नक्कीच आहे. अशा परिस्थितीत हे सगळं सुरक्षित ठेवण्यासाठी आणि ते सुरक्षित ठेवूनही गुन्हे घडल्यावर त्यातून मार्ग काढण्यासाठी माहितीच्या सुरक्षिततेची जपणूक करू शकणार्‍या युवक-युवतींची गरज मोठय़ा प्रमाणावर भासणार आहे.  माहितीच्या सुरक्षिततेविषयीची जनजागृती करणं, ते या तंत्रज्ञानाशी संबंधित असलेलं काम थेटपणे करणार्‍यांर्पयत आणि सायबर कायदा, सायबर गुन्हेगारी या क्षेत्रांमध्ये प्रवीण असलेल्यांर्पयत सगळ्यांचा समावेश होतो.

हे शिकण्यासाठी कोणती कौशल्यं लागतात?

माहितीच्या सुरक्षिततेशी संबंधित असलेल्या मूलभूत संकल्पना संगणकशास्नमधल्या काही विषयांशी अगदी जवळून जोडलेल्या आहेत. यात संगणकाची जाळी कशी चालतात (कम्प्युटर नेटवर्क तसंच ‘डेटा कम्युनिकेशन्स’) हा विषय मुख्य असतो. या क्षेत्रात काम करू इच्छिणार्‍या प्रत्येकानं हा विषय शक्य तितक्या खोलवर शिकून घेणं अत्यावश्यक आहे. बरेचदा लोक या विषयामधलं एखादं ‘सर्टिफिकेशन’ करतात आणि थेट या क्षेत्रात काम करायचा प्रयत्न सुरू करतात. हे अगदी चुकीचं आहे. इमारतीचा पाया भरभक्कम न करता थेट छताची बांधणी हाती घेण्याचा हा प्रकार आहे. संगणकांच्या जाळ्यांच्या कामकाजाखेरीज इंटरनेट कसं चालतं (‘वेब टेक्नॉलॉजी’ तसंच ‘टीसीपी/आयपी’) हे सखोलपणे समजून घेणंही अत्यावश्यक आहे. हे सगळं झाल्यानंतर माहितीच्या सुरक्षिततेसंबंधीचे विषय गरज असेल तेवढय़ा सखोलतेनं अभ्यासणं गरजेचं आहे. हे विषय म्हणजे ‘च’ची भाषा अर्थात ‘क्रिप्टोग्राफी’ आणि संगणकीय जाळ्यांची सुरक्षिततता अर्थात ‘नेटवर्क सिक्युरिटी’ हे आहेत. हे सगळं शिकून झाल्यावर कामाच्या स्वरूपानुसार काही सर्टिफिकिट कोर्स करणं  किंवा खासगी अभ्यासक्रम पूर्ण करणं आवश्यक ठरू शकतं. उदाहरणार्थ कुणाला ‘एथिकल हॅकिंग’ करायचं असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची टूल्स कशी वापरायची हे शिकावं लागतं. हे पारंपरिक अभ्यासक्रमांमध्ये नसल्यामुळे त्यासाठी एखादा वेगळा खासगी अभ्यासक्रमच पूर्ण करावा लागतो. तसंच हीटूल्स सातत्यानं अद्ययावत होत असतात. काही कालबाह्यही ठरतात. अनेकांच्या नव्या आवृत्त्या येतात. हे सगळं पारंपरिक अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट करणं जवळपास अशक्य असल्याची जाणीव म्हणूनच मनात ठेवली पाहिजे.

रोजगारांच्या संधी कोणत्या?

1. संगणकशास्नची पदवी घेतलेल्यांसाठी या क्षेत्रामध्ये प्रोग्रॅमिंगच्या तसंच सव्र्हर आणि नेटवर्क यांची सुरक्षितता सांभाळण्याच्या बर्‍याच संधी असतात. नोकरी पटकन मिळू शकते.2.  ‘हॅकिंग’हे आणखी एक क्षेत्र.  हॅकिंग म्हणजे फक्त गुन्हा नव्हे. उचित कारणासाठी केलेल्या  हॅकिंगला  ‘एथिकल हॅकिंग’ असं म्हणतात.3. समजा एखाद्या बॅँकेनं आपल्या ग्राहकांच्या व्यवहारांसाठी म्हणून एक वेबसाइट तयार करून घेतली. आता ती खुली करण्याआधी त्यात सुरक्षिततेच्या दृष्टीनं काही त्रुटी शिल्लक आहेत का हे तपासणं महत्त्वाचं असतं. यासाठी अशी बॅँक एखाद्या तज्ज्ञाची मदत घेते. या तज्ज्ञाला वेबसाइट हॅक कशी करायची याचं अद्ययावत ज्ञान असतं. अशा हॅकरला ‘एथिकल हॅकर’ म्हणतात. अर्थातच हे खूप कौशल्याचं काम असतं.4. याखेरीज आपल्या कंपनीमध्ये माहितीच्या सुरक्षिततेशी संबंधित असलेली धोरणं आखणं, त्यांची अंमलबजावणी करणं यासाठीही माणसं लागतात. अशा धोरणांचा परिणाम तपासण्यासाठी ‘ऑडिटर’ लागतो.5. सायबर गुन्हेगारीचा तपास करण्यासाठी लोक लागतात. सायबर गुन्हेगारी आणि इतर प्रसंग यांची कायदेशीर बाजू तपासून त्यानुसार न्यायप्रक्रिया चालवण्यासाठी सायबर वकील लागतात. तसंच मुळात माहितीच्या सुरक्षिततेसाठी कडेकोट बंदोबस्त असलेले प्रोग्रॅम लिहिण्यासाठी अशा प्रकारची खास कौशल्यं असलेले प्रोग्रॅमही लागतात.- एकूण काय तर या क्षेत्रामध्ये अक्षरश:   अमर्याद संधी आहेत. शिकण्याची भूक तेवढी हवी!