शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कस्टमाईज्ड बुलेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 08:53 IST

पुण्याचा शार्दुल. त्यानं ठरवलं आपण का कस्टमाईज्ड करू नये गाडी? आठ महिने राबून त्यानं ती केली आणि..

 - भक्ती सोमण

शार्दुल सांगतो..

अशा गाड्या तयार करायच्या असतील तर पेशन्स सांभाळणं खूप गरजेचं असतं. कारण बºयाचदा गाडीशी संबंधित महत्त्वाचे पार्ट्स उपलब्ध नसल्याने २-४ दिवस थांबवलं लागतं. वेल्डर योग्य नसला आणि मनाप्रमाणे काम झालं नाही तर हतबल वाटतं. अशावेळी सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे घडण्यासाठी योग्य वेळ जाऊ द्यावा लागतो. त्यामुळे हे काम करण्यासाठी किमान दोन महिन्यांपासून आठ महिनेही लागू शकतात. पण बाइकवर प्रेम असलं की हे जमतं.

बाइक. या विषयावर तरुण कितीही वेळ गप्पा मारू शकतात. अनंत काळ बोलू शकतात. पण त्यातही भाव कोण खातो तर एखादा बुलेटवला! क्रेझच तशी बुलेटची!

त्यात सध्या आपल्या बाइकला संपूर्ण वेगळा लूक देऊन म्हणजेच कस्टमाईज करून घेण्याचा फंडा अनेकजणांना प्यारा आहे. आणि त्यासाठी लाखोने पैसा खर्च करण्याची त्यांची तयारीही असते. अशीच बुलेट कस्टमाईज केली ती पुण्याच्या शार्दुल रानडेनं. त्यानं डिझाइन केलेली बाइक नुकतीच गोव्यात झालेल्या रॉयल इनफिल्डच्या 'रायडर मेनिया'त भारतातल्या २० बाइकर्समधून सिलेक्ट झाली.पुण्याचा शार्दुल रानडे. वय फक्त २५. वडील गिरीश रानडे यांच्या नोकरीमुळे सहा वर्षे तो दुबईला राहिला. त्या काळात शार्दुलने दुबईतल्या लोकांचं कस्टमाईज बाइकवरचं प्रेम बघितलं होतं. या बाइक कशा करतात, त्याची माहिती त्याला समजत गेली. तिकडे त्याला एक्सपोजर मिळालं. आणि हे बाइक कस्टमाईज करणं आपल्यालाही जमेल असं त्याला वाटायला लागलं. तीन वर्षांपूर्वी तो पुन्हा पुण्यात परत आला. एकीकडे इंजिनिअरिंगचा डिप्लोमा सुरू होता. पण बाइक कस्टमाईज करण्याचं वेड काही स्वस्थ बसू देत नव्हतं. त्यानं 'करिस्मा'चं कस्टमाईज हे 'कॅफे रेसर' या कॅटेगरीतलं केलं. (आउटलाइन तशी केली.) त्याची सबफ्रेम बदलली. सन्स्पेन्शन ड्युएलवरून सिंगल केलं. टाकी दुसऱ्या गाडीची लावली. हेडलाइट बदलले. ते करताना वायरिंगमध्ये सतत त्रुटी येत होत्या. त्या दुरुस्त करत गाडी तयार केली. या काळात झालेल्या चुकांमधून त्याला बरचं शिकता आलं.

पण, खरं आकर्षण होतं ते बुलेट कस्टमाईज करण्याचं. शार्दुलच्या चुलत बहिणीने, आरोही करमकरने त्याचं करिस्मा बाइकवर केलेलं काम पाहिलं होतं. त्यामुळे बुलेट कस्टमाईज करण्यासाठी तिने आर्थिक साहाय्य केलं. तसेच आई उज्ज्वलानेही मदत केली. रॉयल इनफिल्ड क्लासिक ५०० ही बुलेट त्यानं सेकंड हॅण्ड घेतली. ही गाडी कस्टमाईज करण्यासाठी त्याचं फ्रेमवर्क तयार केलं. (फ्रेमवर्क म्हणजे ज्याच्यावर गाडी उभी असते तो गाडीचा बॅकबोन.) त्यानंतर मग हळूहळू कामाला सुरुवात केली. शार्दुलचा मित्र किशोर गुरवचं कात्रजला गॅरेज आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली स्वत: मेहनत करून त्याने आठ महिन्यांत हे काम केलं. गाडीचा प्रत्येक पार्ट हॅण्डमेड असण्याकडे भर दिला. साधारणपणे बुलेटची लांबी सहा ते साडेसहा फूट असते, ती आठ फूट केली, तर साधारणपणे तीन फूट असणाºया सीटची हाइट फूटभर कमी केली. म्हणजेच स्टेबिलिटीसाठी गाडीची लांबी वाढवली आणि उंची कमी केली. त्यामुळे लांबच्या प्रवासातही ती आरामदायीपणे चालवता येऊ शकते. त्यानंतर गाडीचं इंजिन, चाकं, टायर्स, व्हील्स, पेट्रोलची टाकी अशा सगळ्यांत बदल केले. बाइक पूर्ण झाल्यावर तिला रंग दिला. ही गाडी बनवायला त्याला आठ महिने लागले. दरम्यान, त्या रॉयल इनफिल्डच्या गोव्याच्या इव्हेंटबद्दल कळलं. आणि तिथे गाडी कशी तयार केली याची संपूर्ण माहिती पाठवली. त्यातून भारतातल्या २० जणांमध्ये त्याची निवड झाली. हा आनंद त्याच्यासाठी विशेष होता.