शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सुंदर डोळ्यांना काळ्या वर्तुळांचा शाप?

By admin | Updated: April 27, 2017 16:08 IST

- हे घ्या उ:शाप

 - मयूर पठाडे

 
तुमची बॉडी आकर्षक आहे.
तुम्ही दिसायला सुंदर आहात.
तुम्ही कॉन्फिडन्ट आहात.
चारचौघांत तुम्ही उठूनही दिसता.
 
पण.
तुमच्या डोळ्यांखाली काळी वतरुळं आहेत.
 
तुम्ही तरुण असा किंवा तरुणी.
 
तुमच्या डोळ्यांखाली काळी वतरुळं असली तर तुमच्या पर्सनॅलिटीला ते टाचणी तर लावतंच, पण तुमचा भावही डाऊन करतं.
 
अर्थातच आपल्या  डोळ्यांखाली असलेली काळी वर्तुळं ही आपली लाईफस्टाईल चुकीची आहे हेच सुचवत असतात. अपुरी झोप, वेळीअवेळी खाणं, हार्माेनल चेंजेंस, अनुवंशिकता. ही सारी कारणं त्यामागे असतात.
 
त्यासाठी काही केमिकल्सही बाजारात उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग होतो, नाही असं नाही, पण बर्‍याचदा या केमिकल्सचा तुमच्या त्वचेवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे तुमची स्किन वाईटाकडे अधिक वाईटाकडे जाऊ शकते. 
 
असं होऊ द्यायचं नसेल, तर नॅचरल घरगुती उपायच त्यासाठी जास्त उपयोगी ठरू शकतात असं काही संशोधकांचं, अभ्यासकांचं म्हणणं आहे.
 
त्यासाठी त्यांनी काही उपायही सुचवले आहेत.
 
कशी घालवाल ही काळी वर्तुळं ?
 
 
1- किसलेला बटाटा-
 
किसलेल्या बटाट्याचा रस करा. या रसात कापसाचा बोळा बुडवा. डोळे बंद करा. कापसाचा हा बोळा साधारणपणे दहा मिनिटे काळ्या वतरुळांवर ठेवा.
 
2- टोमॅटो आणि लिंबू-
 
एक चमचा टोमॅटोचा रस आणि एक चमचा लिंबू रस एकत्र करून हा रस डोळ्यांखालच्या काळ्या वतरुळांवर दहा मिनिटे लावून ठेवा. दहा मिनिटांनी साध्या पाण्यानं चेहरा धुवून टाका. दिवसांतून दोन किंवा तीन वेळा हाच प्रयोग करा. टोमॅटो आणि लिंबाच्या रसात पुदीन्याची पानं टाकून तो रस तुम्ही प्यायलात तरी थोड्याच दिवसांत तुमच्या डोळ्यांखालची काळी वतरुळं कमी होऊ शकतात.
 
3- ग्रीन टी बॅग्ज-
 
बाजारात मिळणार्‍या ग्रीन टीच्या छोट्या बॅग फ्रिजमध्ये ठेवा. गार झालेल्या या बॅँग्ज डोळ्यांवर ठेवा.
 
4- बदामाचं तेल-
 
बदामाच्या तेलात व्हिटॅमिन इ असतं हे आता सगळ्यांनाच माहीत झालं आहे. बदामाचं हे तेल काळ्या वतरुळांवर लावा. हलकेच मसाज करा. रात्रभर ते तसंच राहू द्या आणि सकाळी स्वच्छ पाण्यानं धुवून टाका.
 
डोळ्यांखालची काळी वतरुळं घालवण्यासाठी वर दिलेले उपाय अत्यंत महत्त्वाचे आहेत.
 
आणखीही बरेच उपाय आहेत.
 
त्याविषयी पाहू या पुढच्या भागात..