शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

कर्ली गर्ल- कुरळे केस असणार्‍या तरुणींची एक अनोखी चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 15:10 IST

फॅशन स्ट्रेट केसांची म्हणून मग ज्यांचे केस कुरळे त्या अनेकजणी ते सरळ करण्यासाठी, तो आवरताच न येणारा कुरळा पसारा आवरण्यासाठी धडपडतात. पण कुरळे केस सुंदर नसतात हे कुणी ठरवलं? आणि ठरवलं तरी आपण ते का ऐकायचं?

ठळक मुद्दे त्यामुळे तुमचेही केस कुरळे असतील तर उगीच सरळ करण्याच्या भानगडीत पडू नकाच.

- सारिका पूरकर-गुजराथी

त्या दिवशी तिला वाढदिवसाच्या पार्टीला जायचं होतं.  छान तयारही व्हायचं होतं; पण केसांचं काय करावं, हे काही तिला समजत नव्हतं. कारण केस कुरळे होते. शेवटी ती बाजारात गेली. बाजारातून हेअर स्ट्रेटनर आणलं आणि  केसांवर वापरलं. मात्न व्हायचं तेच झालं. हेअर स्ट्रेटनरमुळे तिचे केस जळाले. चेन्नईच्या 34 वर्षीय दिव्या मदस्वामी हिची ही 2014 मधील गोष्ट होती. कुरळ्या केसांना वैतागलेल्या दिव्याचा इथून पुढचा प्रवास सुरू झाला. या प्रवासाला आज ‘कर्ली इज ब्यूटिफूल’ या इंटरनेटवरील ब्लॉग चळवळीचं रूप प्राप्त झालंय.  कुरळे केस अनेकांना आवडतात. पण ज्यांचे केस कुरळे असतात त्यांना मात्र ते अजिबात आवडत नाहीत, असा एकूण मामला. केसांची ना चांगली स्टाइल करता येते, ना धड ते विंचरता येतात. शिवाय बॉलिवूड अभिनेत्रींसारखे स्ट्रेट अन् स्टायलिश केस हवेत असाही एक हट्ट असतो. म्हणूनच कुरळे केसं सरळ करून घेण्यासाठी तरुण मुली पार्लरच्या वार्‍या करू लागतात. हा अनुभव दिव्यादेखील घेत होतीच. त्यामुळे तर ती जाम वैतागली होती. पण केस सरळ करायच्या नादात जो घोळ झाला, त्यानंतर तिनं कुरळ्या केसांचा तिरस्कार करायचं कायमचं सोडून दिलं. कुरळे केस  सरळ करण्याच्या भानगडीत न पडता, आहे त्याच कुरळ्या केसांची काळजी आणखी व्यवस्थित कशी घेता येईल यादृष्टीनं तिनं तिचा अभ्यास सुरू केला. केसांना काय लावलं म्हणजे त्यांना चमक येईल? ते कशानं धुतल्यानंतर स्वच्छ राहतील, यासारख्या प्रश्नांचा शोध घ्यायला तिनं सुरुवात केली. आपले केसं जसे आहेत तसेच पण सुंदर, सुदृढ ठेवण्यासाठी दिव्यानं प्रयत्न सुरू केले. दिव्याच्या या प्रयत्नांचा, त्या प्रयत्नांना आलेल्या यशाचा, या प्रवासातील रंजक गोष्टींचा तिनं चक्क ब्लॉग लिहायला घेतला.    ‘कर्लेशिअस ब्लॉग’ या नावानं सुरू केलेल्या ब्लॉगला जवळपास चार र्वष झालीत. हजारो वाचक तिच्या या ब्लॉगला लाभले आहेत. कुरळ्या केसांची निगा, जगभरातील आणि भारतातील उत्पादनांची माहिती, ती वापरावी कशी याची माहिती, कुरळ्या केसांवर प्रेम करून केसात आमूलाग्र बदल केल्याचे फोटो यांचा खजिनाच या ब्लॉगवर सापडतो. 

 खरं तर 2001 मध्ये  ‘कर्ली गर्ल’ या नावानं अशाच स्वरूपाच्या उपक्र माची सुरुवात लोरियान मॅसे हिनं न्यू यॉर्कमध्ये केली होती. इंग्लंडमध्ये लहानाची मोठी झालेल्या लोरियानला कुरळ्या केसांमुळे सतत अवहेलना सहन करावी लागली होती. कारण तेव्हा अमेरिका असू दे किंवा इंग्लंड महिलांसाठी सरळ केस हा प्रचलित ट्रेण्ड होता. मात्न कुरळे केस असल्यामुळे लोरियान या चौकटीत फिट बसत नव्हती. नंतर न्यू यॉर्कमध्ये आल्यानंतर आपल्यासारखेच अनेकांचे केस कुरळे आहेत आणि आपल्याला या केसांसाठी लाज वाटण्याचं कारण नाही, हे तिला समजलं. यानंतरच तिने कुरळ्या केसांची निगा, ते धुणं, कापणं आणि कुरळ्या केसांच्या स्टायलिंगवर अभ्यास करून पुस्तिका प्रकाशित केली. पुढे तिच्या या उपक्रमाची चळवळ झाली. या उपक्रमांतर्गत कुरळे केस असणार्‍यांनी सल्फेट, अल्कोहोल, सिलिकॉनविरहित श्ॉम्पू कसे वापरावेत, केसांची निगा कशी राखावी, यासंदर्भात ‘कर्ली गर्ल’ या छोटय़ा पुस्तिकेतून माहिती द्यायला सुरुवात केली. हळूहळू या उपक्रमानं जगभरात चळवळीचं रूप धारण केलं. ‘कर्ली गर्ल’ नावाची एक स्वतंत्न कम्युनिटीच बनून गेली. कुरळ्या केसांसाठीची विविध उत्पादनं, त्याचा होणारा लाभ इथपासून तर कुरळ्या केसांना आहे तसं स्वीकारल्यास होणारे बदल, वाढलेला आत्मविश्वास याचं शेअरिंग या इंटरनेटवरील कम्युनिटीद्वारे होत गेलं.  

भारतात  आता आता ही चळवळ जोर धरू लागली आहे. ‘कर्ली गर्ल’ दिव्या मदस्वामी ही युवती याच चळवळीचा नवा चेहरा ठरली आहे. दिव्या मदस्वामीसारखीच हरियाणाची आशा बराक हीदेखील ‘कर्ली इज ब्यूटिफूल’ची प्रतिनिधित्व करते आहे. 2015 मध्ये आशानं ‘इंडियन कर्ल प्राइड’ नावाचा फेसबुक ग्रुप तयार केला. या ग्रुपचे आज 20 हजारांहून अधिक सदस्य आहेत. या ग्रुपवर, ब्लॉगर्स त्यांचे अनुभव शेअर करतात. आधी व नंतर अशा स्वरूपातील फोटोज पोस्ट करतात. त्यांचे हे ट्रान्सफॉर्मेशन बघताना खूप आनंद होतो, असं आशा सांगते. एलिझाबेथ अ‍ॅलेक्स. तिचा अनुभव थोडा वेगळाच होता. ती म्हणते, ‘माझ्या कुरळ्या केसांचा मला नेहमीच खूप राग, संताप यायचा. कारण शाळेत असताना याच कुरळ्या केसांमुळे मला नाटकांमध्ये मुख्य भूमिका नाकारल्या गेल्या. माझे केस एकतर कुरळे होते, त्यात ते लांब नव्हते. म्हणून मग राजकुमारीचे केसं असे आखूड आणि कुरळे कसे दाखवायचे हा प्रश्न त्यांना पडलेला असायचा. वयाच्या 15 व्या वर्षानंतर मी केस वाढवले. मात्र तरीही लोकं मला माझ्या केसांबद्दलच सारखे विचारत. माझ्या केसांव्यतिरिक्तही माझ्याकडे सांगण्यासारखं बरंच काही आहे, असं मला सारखं वाटायचं. मी कोणतं पुस्तक वाचतेय? असं मला कोणी का विचारत नाही? प्रश्न विचारण्यासाठी लोकांना माझे फक्त केसच का दिसतात? या प्रश्नांनी माझ्या डोक्यात गोंधळ घातला होता.’ या कल्लोळातूनच पुढे एलिझाबेथनं ‘ऑनेस्ट लिझ’ या ब्लॉगला जन्म दिला. 2014 पासून ती हा ब्लॉग लिहितेय. एलिझाबेथ सांगते, ‘सरळ केसांच्या तुलनेत कुरळ्या केसांची देखभाल जास्त अवघड असते. फक्त शाम्पू आणि कंडिशनर लावून चालत नाही, तर त्याबरोबरच जेल, हेअर मास्क यांचीही गरज असते. तुमचे केस हे नुसते केस नसतात तर तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा, तुमच्या व्यक्त होण्याचा तो एक भाग असतात. तुमचा आत्मविश्वास, तुमची प्रतिमा बर्‍याच अंशी ही तुमच्या केसांशी निगडित असते. जर तुमचे केस व्यवस्थित नसतील तर ती प्रतिमा डळमळीत होऊ शकते.’ एलिझाबेथचा हाच दृष्टिकोन तिला कुरळ्या केसांमुळे निर्माण झालेल्या न्यूनगंडाच्या पलीकडे घेऊन गेला. सध्या नेदरलॅण्डमध्ये असलेली 28 वर्षीय अंजना मुरलीधरन हीदेखील ‘कर्ली गर्ल’ या कम्युनिटीशी जोडली गेली आहे. ‘कल्र्स अ‍ॅण्ड ब्यूटीज’ हा ब्लॉग ती 2015 पासून लिहितेय. महिला सबलीकरणाचा वेगळाच अनुभव ‘कर्ली गर्ल’नं तिला आणि इतर महिलांना दिला आहे. कुरळ्या केसांसाठी लोरियानने सुरू केलेल्या चळवळीत या भारतीय युवतीही हिरिरीनं सहभागी झाल्या. स्वतर्‍ला आहे तसं स्वीकारल्यास खूप गोष्टी सोप्या होतात, हेच या ‘कर्ली गल्र्स’चा आणि त्यांना फॉलो करणार्‍या हजारो युवतींचा प्रवास सांगतो. त्यामुळे तुमचेही केस कुरळे असतील तर उगीच सरळ करण्याच्या भानगडीत पडू नकाच. काय?