शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

youth first - जगभरात ‘लॉकडाउन’ची कोंडी या सूत्राने  सुटेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 16:52 IST

विशीत आणि तिशीत असलेल्या तरुणांना ‘रिलीज’ करून कामाला सुरुवात करायला सांगायचं, असा इंग्लंडचा प्लॅन !

ठळक मुद्दे हे धोरण2020 मध्ये असं राबवण्यात येईल याचा कुणी विचारही केला नव्हता; पण आता आहे हे चित्र असं आहे.

लॉक डाउन कधी संपेल? नक्की सगळे व्यवहार पूर्ववत कधी सुरू होतील याची उत्तरं आज जगात कुणीही खात्रीशीर पद्धतीनं देऊ शकत नाही. एक नक्की, अर्थव्यवस्था त्यामुळे जगभर कोलमडत आहेत. कधी सगळे उद्योग, व्यवसाय सुरू होणार? ते उभारी धरणार असे प्रश्न फक्त आपल्याच देशात नाही तर जगभरात आहेत. आणि त्यावरच सध्या चर्चा सुरूआहे. राजकीय अभ्यासक, विश्लेषक, नियोजनकर्ते विचार करत आहेत की काय केलं म्हणजे ही कोंडी सुटेल? घरात राहिलं तर पोटाची चिंता, बाहेर गेलं तर जगण्याची ! मग पर्याय काय? आता इंग्लंडमध्ये एक अभ्यास समोर आला आहे. ते यूथ फस्र्ट असं धोरण आखा आणि ही कोंडी फोडा असं तिथल्या सरकारला सांगत आहेत. जगभरातच ज्याला वर्कफोर्समधली ह्युमन पॉवर म्हणतात ती तरुण असते. तरुण आहे. त्या हातांना आज काम नाही. बरं काम नसलं तरी पोट कसं भरायचं याची चिंता आहे. वय वर्षे 20 ते वय वर्षे 40 या तरुण वयोगटात ती अधिकच आहे. (त्यापुढेही आहे; पण हा कोरोना काळ असा क्रुर की तो सध्या तरी तरुण कसे जगतील इतपत विचारार्पयत यायला व्यवस्थांना भाग पाडतोय. इटलीमध्ये वृद्धांवर उपचार न करण्याचा, तरुणांवर उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला होताच ना!) तर या कार्यक्षम वयोगटातली माणसं जगवून, अर्थव्यवस्थेच्या चाकांना पुन्हा कशी देता येईल याचे प्रयत्न जगभर सुरू झाले आहे. जपान सरकारने भरभक्कम आर्थिक तरतूद करत आपल्या कंपन्यांना सांगितलं की, चीनमधून बाहेर पडा. त्यासाठी त्यांना आर्थिक मदतही देऊ केली. जपानमध्ये पुन्हा कंपन्या आणा, असा आदेश तर आहेच; पण चीनसोडून अन्य दक्षिणपूर्व आशियाई देशात न्या. स्थानिकांना रोजगार, अर्थव्यवस्थेला गती म्हणून सरकार असं पैसे ओतायला तयार आहे. इंग्लंडमध्ये आता त्यापुढच्या पावलाची चर्चा आहे. त्याचं नाव आहे, यूथ फस्र्ट. म्हणजे काय तर लॉकडाउन, तर एकदम जाहीर झालं. सगळी माणसं एकदम घरात कोंडण्यात आली. मात्र लॉकडाउन जेव्हा उठेल तेव्हा सगळीच माणसं एकदम बाहेर पडतील अशी आशा ठेवण्यात काही हशिल नाही. लहान मुलं, गरोदर माता, स्तनदा माता आणि वृद्ध ही जी हायरिस्क झोनमधली माणसं आहेत, त्यांना सर्व सुरळीत झाल्यावरच बाहेर पडायची कदाचित परवानगी मिळेल. मग एकदम लॉक डाउन न उठवता, जे शक्य नाही तर निदान वय वर्षे 2क् ते 3क् या वयोगटातील माणसांना पहिले ‘रिलीज’ करायचं. लंडनच्या वार्विक विद्यापीठातील दोन तज्ज्ञांनी त्यांच्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला. अॅण्ड्रय़ू ओसवाल्ड आणि नॅटवूढ पॉडथॅवी अशी त्यांची नावं. त्यांचा अभ्यास असं म्हणतो की, वयाच्या विशीत आणि तिशीत असलेल्या माणसांना कामावर जाऊ द्या. हळूहळू कामं सुरूहोतील. नियंत्रित राहतील. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात जो आर्थिक फटका बसतो तो कमी होईल पर्यायानं देशाचाही कमी होईल. हे असे तरुण जे पालकांसोबत राहत नाहीत, एकटे राहतात. त्यांना कामावर परत जाऊ द्यावं. इंग्लंडमधल्या या वयाच्या तारुण्याची एकूण संख्या 42 लाख इतकी आहे. त्यातले 26 लाख खासगी क्षेत्रत काम करतात. ते कामाला लागले तर खासगी क्षेत्रलाही चालना मिळेल आणि अर्थव्यवस्थेची बंद चाकं निदान हळूहळू चालायला लागतील. हा प्रयोग यशस्वी झाला तर पुढच्या वयोगटातल्या माणसांना रिलीज करता येईल. अर्थात या धोका आहेच की काही तरुण मृत्युमुखी पडले या आजाराने तर? त्यावर उत्तर असं की, पूर्ण काळजी घेण्यात येईल आणि या वयात दगावण्याचा धोका इतर वयापेक्षा कमी आहे. मात्र धोका पत्करला तरच यातून मार्ग निघेल, एकदम सगळं सुरू होईल अशी आशा ठेवू नये, असं तिथं अभ्यासक सांगत आहेत. समजा, इंग्लंडमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला तर अन्य देश, निदान आपल्या देशातले जे भाग संसर्ग प्रवण नाहीत तिथं तरी हा प्रयोग करू शकतात. यूथ फस्र्ट हे धोरण2020 मध्ये असं राबवण्यात येईल याचा कुणी विचारही केला नव्हता; पण आता आहे हे चित्र असं आहे.