शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

अचानक आलेल्या या निवांतपणाच्या बोजानं तरुणांचं काय होईल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 06:30 IST

म्हणायला एका घरात, पण जो तो आपापल्या दुनियेत आहेत. पुढं फक्त सांगता येईल की, कोरोना कोंडीत आम्ही इतका काळ एकत्र काढला. एकत्र राहिलो; पण सोबत होतो का?

ठळक मुद्देसर्वात जास्त तरुण असलेल्या आपल्या देशात या कोरोनाकोंडीच्या काळात तरुणांसाठी असं सकस काय आहे, हा प्रश्न आहेच. 

- समीर शेख

जगातील सर्वात तरुण देश म्हणजे भारत. म्हणजेच जगातील सर्वाधिक तरु णाई ही भारतात आहे. ‘मिलेनिअल्स’ हा शब्द तर सतत आपल्या कानावर पडतोच. मिलेनिअल्स अथवा जनरेशन वाय म्हणजे नव्वदीत जन्मलेली मुले. त्यानंतर जन्मलेली मुलं म्हणजे जनरेशन ङोड. जनरेशन वाय आणि ङोड म्हणजेच आजची तरुणाई. देशाच्या (जगाच्याही) आणि आपल्या राज्याच्याही कानाकोप:यातून तरुण शिक्षण आणि नोकरीसाठी पुण्यात येतात. इथल्या ‘माहौल’च्या प्रेमात पडतात. पण कोरोना संक्र मणामुळे पुण्यावर ‘न भूतो, न भविष्यती’ अशी परिस्थिती उद्भवली. तरुणाईचे हॉटस्पॉट आता ‘कोरोनाई’चेही हॉटस्पॉट बनले आहेत.इथल्या रोजच्या अतिशय तरुण वेगवान जीवनाला अचानक करकचून ब्रेक लागला.लॉकडाउनमुळे घरात डांबले जाऊन आता तीन आठवडे उलटलेत. सुरुवातीला अनेकांना वाटलं नाही, हे इतका काळ चालेल. त्यामुळे अतिशय धकाधकीच्या जगण्यातून हा फुरसतीचा वेळ विश्रंतीसाठी किंवा ‘चिल’ करण्यासाठी वापरता येईल का याची चाचपणी अनेकांनी केली. त्यासाठी मग ‘विशलिस्ट’ तयार केल्या. काय काय करता येईल याच्या याद्याच इतक्या मोठय़ा झाल्या.त्यात या लिस्टमधील अनेक गोष्टी अर्थातच मोबाइलशी संबंधित असणार हे उघड होतं. कारण मोबाइल आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय, त्यामुळे आपल्या प्रत्येक सुखदु:खात मोबाइल किंवा स्मार्ट फोन आलाच.गालिबचा एक प्रसिद्ध शेर आहे, ‘हमको मालूम है जन्नत की हकीकत लेकीन, दिल के खुश रखने को गालिब ये खयाल अच्छा ही.’ आजच्या तरुणाईला आपल्या रोजच्या धबडग्यातून आणि समस्यांतून मोकळे करणारा, दिल को खूश ठेवणारा अक्सीर इलाज म्हणजे मोबाइल.त्यात सध्या झालंय काय की, एकतर घरातच राहावं लागतं. तारुण्यात  विशेषत: टीनएजमध्ये पालकांसोबत रोज उडणा:या खटक्यांपासून वाचण्यासाठी बाहेर राहणं, मित्नमैत्रिणींसोबत हॅँगआउट करणं तसं इथं पुण्यात कॉमन आहे.तेच आता नाही. पण कुणीच नाही तरी मोबाइल है यारो.  तरुणाईला ‘दिल के खुश रखने को..’ मोबाइलच्या प्रेमात आकंठ बुडण्यावाचून पर्यायच नव्हता. तर या लॉकडाउनमध्ये काय काय करायचं याचा अर्थ होता, मोबाइलवर काय काय करायचं. त्या विशलिस्टमध्ये बाजी मारली ती वेब सिरीजने.टीव्ही पाहणं तसंही तरुणाईनं केव्हाच बंद केलं होतं. त्यामागे अनेक समाजशास्रीय आणि मानसशास्रीय कारणं आहेत.त्यांची चर्चा आता करत नाही. पण सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तारुण्यात  हवीहवीशी वाटणारी पर्सनल स्पेस टीव्हीमुळे मिळत नाही. मोबाइलमुळे मात्र ती मिळते.सोबतच मोबाइलवर पर्सनलाइज्ड कंटेंट उपलब्ध असतो. तरुणाईला अपील होतील असे कार्यक्रम टीव्हीवर नसतात त्यामुळे तसाही टीव्ही हा आता तरु णाईसाठी ‘गुजरे जमाने की चीज’ झाली आहे. आणि त्यांच्या आजकेजमाने का जिगरी दोस्त है, मोबाइल. या कोरोनाकोंडीने त्यांना मोबाइलच्या अधिक प्रेमात पाडलं. मात्र ते भले, त्यांचा मोबाइल भले यामुळे साहजिकच तरुणाईचा एककल्लीपणा वाढीस लागणार आहे. आपल्या घरच्यांच्या सोबत निवांत वेळ घालवण्याची संधी कधी नव्हे ती मिळाली होती; पण तो सुसंवाद सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दोन्हीकडेही नाही. अचानकच निवांतपणाचा बोजा आपल्या अंगावर पडेल आणि आपल्या कुटुंबीयांसह आपण  महिनाभर घरात कोंडले जाऊ अशी कल्पना पालक किंवा मुलं दोन्हींपैकी कुणीच केली नसल्यामुळे ‘स्टेट्स को’ ठेवण्यातच दोन्ही बाजूचा कल दिसतो. त्यामुळे आई-वडील रामायण-महाभारत तर मुलं मनी हेस्ट, असूर (या काळातील सर्वाधिक लोकप्रिय वेब सिरीज) अशी विभागणी झाली आहे. म्हणायला एका घरात; पण जो तो- आपापल्या दुनियेत आहेत.पुढं फक्त सांगता येईल की, कोरोनाकोंडीत आम्ही इतका काळ एकत्र काढला. 

एकारल्या/ एकेकटय़ा तुटक जगण्याचं पुढे काय?

पुण्यातील तरु णाईमध्ये अधिक भरणा हा स्थलांतरितांचा आहे. त्यामुळे लॉकडाउनची घोषणा होताच अनेकांनी आपलं गाव-घर गाठणं पसंत केलं.  स्थलांतरितांपैकी अगदी थोडी मंडळी पुण्यात राहिली. या एकल कोंडीत मोबाइलच त्यांचा जिवाभावाचा दोस्त बनला आहे. ‘धर्म ही अफूची गोळी आहे’ या मार्क्‍सच्या उक्तीचा आधार घेऊन असं नक्कीच म्हणता येईल की, ‘इंटरनेट असणारा मोबाइल ही तरुणाईची अफूची गोळी आहे.’ वेब सिरीजच्या जोडीलाच अतिशय अॅडिक्टिव्ह सोशल मीडियाही तरुणाईच्या दिमतीला आहेच. सोशल मीडिया अल्गोरिदम्सच्या मायावी जाळ्यातून तरु णाईची सुटका आता अवघड आहे. त्यामुळे वेब सिरीज आणि सोशल मीडिया हे दोनच पर्याय तरु णांना आपलेसे वाटतात. लॉकडाउनमुळे तर हे व्यसन आणखी बळावणार हे निश्चित. देशातले पहिले सोशल मीडिया व्यसनमुक्ती केंद्र काही महिन्यांपूर्वीच पुण्यात सुरू झाले असून, तेथे भरती होणा:या तरुणांचं प्रमाण चिंताजनकच होतं. आता त्यात आणखी भर पडते की काय अशी भीती आहे.वेब सिरीज असो, सिनेमा असो की गेम्स वा सोशल मीडिया; मोबाइलद्वारे फायनल किंवा एंड प्रॉडक्ट आपल्या दिमतीला हजर असतं. त्यामुळे या गोष्टींमध्ये सर्जनशीलतेला, कल्पनाशक्तीला वावच नसतो. अशावेळी कल्पनाशक्तीला, सर्जनशीलतेला वाव देणारे पर्याय खरं तर तरुणांना उपलब्ध करून द्यायला हवेत. सोबतच कौटुंबिक संवाद वाढविण्यासाठी घरातील मोठय़ांनी पुढाकार घेऊन एकत्नपणो काही गोष्टी करता येतील का याची चाचपणी केली पाहिजे, तरच कोरोनामुळे झालेले लॉकडाउन इष्टापत्ती ठरेल. अन्यथा ही तरुणाई आणखीच आपल्या कोशात गुरफटत जाईल. आपल्या व्यक्तिगत व सामाजिक अडचणींवर उपाय शोधण्याऐवजी सरळ त्याकडे दुर्लक्ष करणारी पलायनवादी मानसिकता अधिक बळावेल, असाही धोका आहे.हा धोका ओळखूनच युरोप अमेरिकेत जनरेशन वाय आणि ङोड यांच्यासाठी अनेक कृतिकार्यक्र म आखले जात आहेत. जगातील नामवंत नियतकालिकं तरुणाईला आकर्षित करणारे, त्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणारे लेख प्रसिद्ध करत आहेत. कोरोनानंतरचे तररुणाईचे प्रश्न, त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य, रोजगार, रिलेशनशिप्स यावर मोठय़ा प्रमाणात चर्चा तिथे सुरूही झाली आहे. मोबाइलमुळे व्हचरुअल किंवा आभासी जगाने व्यापलेले तरुणाईचे आयुष्य अधिकाधिक वास्तववादी करण्यासाठी तिकडे ज्येष्ठांकडून, विचारवंतांकडून प्रामाणिक प्रयत्न केले जात आहेत. सर्वात जास्त तरुण असलेल्या आपल्या देशात या कोरोनाकोंडीच्या काळात तरुणांसाठी असं सकस काय आहे, हा प्रश्न आहेच. 

(समीर मुक्त पत्रकार आहे.)