शहरं
Join us  
Trending Stories
1
Porsche Car Accident: 'बाळा'च्या ब्लड सँपलची ससून रुग्णालयात अदलाबदल; ते खासगी इसम कोण?
2
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
3
सांगवीत भररस्त्यात गोळ्या झाडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून 
4
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
5
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
6
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
7
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
8
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
9
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
10
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
11
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
12
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
13
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
14
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
15
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
16
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
17
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
18
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
19
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
20
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा

मास्क आणि ग्लोव्हजच्या कचऱ्याचं आपण नक्की काय करणार ? तो कुठेही फेकला तर धोका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 4:20 PM

वन टाइम यूज, यूज अॅण्ड थ्रो हे शब्द आता विसरून जायला हवेत, कोरोनाकाळात मास्क, ग्लोव्हज् यांचा कचरा वाढणार आहे, त्याची समस्या न होऊ देणं हे आपल्याच हातात आहे. ते कसं करता येईल?

ठळक मुद्देपुन्हा पुन्हा वापरा

- केतकी पूरकर, निर्माण 8

तुम्ही कंटेजन हा सिनेमा पाहिलाय? सध्याच्या कोरोना साथीशी साधम्र्य असणारी कथा. तसा हा विज्ञानरंजक हॉलिवूडपट आहे.त्यात एक असाही प्रसंग आहे की, शहरं बकाल झाली आहेत, रस्तोरस्ती कच:याचे मोठाले ढीग साचले आहेत.. कोरोना लॉकडाऊनच्या काळात आपलं सुदैव की आपल्या देशातील स्वच्छता कर्मचारी कोरोना योद्धे बनून काम करत आहेत म्हणून आपल्यावर अजून अशी वेळ आलेली नाही.  रहिवाशी परिसर स्वच्छ राखणं आणि कच:याची विल्हेवाट लावणं हे या काळातलं महत्त्वाचं ‘प्रतिबंधात्मक’ काम. म्हणूनच स्वच्छता कर्मचारी हे पहिल्या फळीतील योद्धे आहेत. मात्र आपल्या घरातली किंवा आसपासची कचराकुंडी ओसंडून वाहून जात नाही तोर्पयत त्यांचं ‘असणं’ काम करणंही आपल्या लक्षात येत नाही.  ते मात्र आपलं काम चोख करत आहेत.ताजं उदाहरण घ्या, कोरोनाशी लढा देताना चीनच्या वुहान शहरातील कच:याचं प्रमाण सहा पटीने वाढलं होतं. भारतातही सध्या कच:याचं प्रमाण वाढत आहे.  लॉकडाऊनच्या काळात वाढता प्रतिबंधात्मक साधनांचा वापर पाहता ते आणखी वाढणार आहे. मात्न त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी भारतात पुरेशी प्रक्रि या केंद्रेही नाहीत. स्वच्छता कर्मचा:यांच्या सुरक्षिततेसाठी पुरेशा उपाययोजनाही नाहीत. सरकारच्या दिशानिर्देशांनुसार दवाखाने, विलगीकरण कक्ष, क्वॉरंटाइन घरं अशा सर्व ठिकाणचा कचरा हा जैववैद्यकीय (बायोमेडिकल) कचरा ठरवून तो वेगळा गोळा केला जायला हवा. त्याची बायोमेडिकल वेस्ट फॅसिलिटी केंद्रांमध्ये नेऊन विल्हेवाट लावणं अवश्यक आहे. या केंद्रात उच्च तापमानात हा कचरा जाळतात. या प्रक्रियेतून बाहेर पडणारे हानिकारक वायू हा वेगळा मुद्दा असला तरी सध्या जैववैद्यकीय कच:याच्या विल्हेवाटीसाठी हाच पर्याय उपलब्ध आहे. मात्न अशा केंद्रांची संख्या मुळातच फार कमी आहे, त्यात लहान शहरं व गावांमध्ये तर अजूनच कमी. भारतभरात अशी केवळ 200 ते 250 प्रक्रि या केंद्र आहेत जिथे 600 ते 700 शहरांतील कच:याचा भार पेलला जातो. देशातल्या सात राज्यांमध्ये अशा प्रकारचं एकही प्रक्रि या केंद्र नाही. अशी केंद्र नाहीत तिथला जैववैद्यकीय कचरा जमिनीत पुरावा असं सरकारी दिशानिर्देश सांगतात. मात्न प्रत्यक्षात रोज निर्माण होणा:या कच:याचं प्रमाण बघता या दिशानिर्देशांची अंमलबजावणी करणं कठीण आहे.  इतक्या मोठय़ा प्रमाणात तयार होणारा कचरा नेमका कुठे नेऊन टाकायचा याबाबत नियोजनाच्या कमतरतेमुळे काही ठिकाणी डपिंग यार्ड जवळील ग्रामस्थ आणि स्वच्छता कर्मचा:यांमध्ये तणाव निर्माण होण्याच्या घटना घडत आहेत. भारतात मोठय़ा प्रमाणात निर्माण होणारा, वर्गीकरण न करता फेकलेल्या एकत्रित कच:याचे प्रसंगी हाताने वर्गीकरण करावे लागते. त्यात अनेकदा  सॅनिटरी पॅड, जुनी औषधे, काचेचे तुकडे, जैववैद्यकीय कचरा असतो.आता कोरोनापासून दूर राहायचं तर त्यात वापरलेले मास्क, ग्लोव्हज इत्यादींची भर पडली आहे. सध्याच्या काळात अशा कच:यापासून संसर्गाचा मोठा धोका आहे.  हा कचरा हाताळणा:या स्वच्छता कर्मचा:यांनी आपला जीव धोक्यात घालून काम चालू ठेवले आहे हे फार महत्त्वाचे आहे. सरकारी दिशानिर्देशानुसार या सर्व कर्मचा:यांना सुरक्षा साधनं पुरवणं आवश्यक आहे. मात्न प्रत्यक्षात सुरु वातीचे अनेक दिवस या कर्मचा:यांर्पयत सुरक्षा साधने पोहोचली नव्हती,त्यासाठी त्यांना अनेकदा मागण्या कराव्या लागल्या. आता परिस्थिती थोडी सुधारते आहे. दुसरीकडे रोज कच:यातल्या उपयुक्त गोष्टी वेचून आणि त्या विकून पोट भरणा:या असंघटित कचरा वेचकांची अवस्था तर सध्या अजूनच बिकट झाली आहे. भारतातील कचरा व्यवस्थापन हे मोठय़ा प्रमाणात असंघटित क्षेत्नावर अवलंबून आहे. यात कचरा वेचक, भंगारवाले, रिसायकल करणारे उद्योग, कचरा व्यवस्थापन क्षेत्नातील संधी ओळखून त्यात उतरलेले लहान उद्योग(स्टार्टअप्स) इ. अनेकांचा यात वाटा आहे.  कोरोनापूर्वीच्या काळात जोमात असलेले रिसायकल उद्योग आणि पर्यावरणपूरक वर्तुळाकार अर्थव्यवस्था नजीकच्या काळात धोक्यात येऊ शकते. आणि म्हणूनच समाज म्हणून विशेषत: तरुण मुलांनी तरी आपल्या अनेक सवयींचा पुनर्विचार करणं आवश्यक आहे. कचरा निर्माण होण्याचं प्रमाण कमी करणं, कच:याचं वर्गीकरण करणं, कचरा रस्त्यांवर न फेकणो हा सवयीचा भाग व्हायला हवा. मुख्य म्हणजे सफाई कर्मचारी ही संकल्पना जाऊन ‘कचरा व्यवस्थापक ’ ही संकल्पना अस्तित्वात यायला हवी. ज्यात नागरिकांनी केलेला कचरा साफ करणं हे त्यांचं काम नसून केवळ जमा झालेल्या कच:याचं व्यवस्थापन हे या कर्मचा:यांचं काम असेल.तेव्हा या कामाला ख:या अर्थाने मान मिळेल. परदेशात ही संकल्पना ब:यापैकी अस्तित्वात असल्याचं दिसून येतं.आता कोरोनाकाळात जगताना कितीही टाळलं तरी कचरा वाढणार आहे कारण आपण आपल्या सुरक्षिततेसाठी काही गोष्टी वापरायला लागू.ते गरजेचं असलं तरी त्यातून कचराही मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे, त्या कच:याचं काय करायचं, कशी व्यवस्था लावायची याचा अद्याप धोरण म्हणून  सरकारने विचार केलेला नाही.मात्र आपण तो वैयक्तिक स्तरावर तातडीने करायला हवा.

- विचारा स्वत:ला याची गरज आहे का?

* कोरोनाकाळात कचरा वाढणार आहे. अगदी मास्क, ते ग्लोव्हज, ते पायातले प्लॅस्टिक शिट्स, पीपीई, डिस्पोजेबल रुमाल, टॉवेल, सॅनिटायझरच्या बाटल्या हे सारं कच:यात जाणार. त्यापासून इतरांना धोका असू शकतो ही गोष्ट आहेच, मात्र आता हा कचरा जर वाढत असेल तर आपण रोजच्या जगण्यातच कचरा कसा कमी करता येईल याकडे बारकाईनं पहायला हवा.त्यासाठी एकच उपाय आहे रियूज. पुनर्वापर.* त्यामुळे कुठलीही गोष्ट खरेदी करताना यापुढे स्वत:ला एकच प्रश्न विचारा की, याची गरज आहे का? गरज नसेल तर घेऊ नका.* गोष्टी पुन्हा पुन्हा वापरा. स्वच्छ करून वापरा.* ज्या गोष्टी म्हणजे प्लॅस्टिक, बाटल्या, कागद हे रिसायकल होऊ शकतं, तो रिसायकला द्या, ते कच:यात टाकू नका.* वन टाइम यूज - एकदाच वापरणा:या गोष्टी कमी करा.* घरच्या घरी ओल्या कच:याचं खत केलं तरी व्यवस्थेवरचा ताण कमी होईल.* मुळात आता या काळात आपल्या पर्याय शोधावे लागतील, तर पर्याय शोधणं सुरू व्हायला हवं.

***

कचरा कसा टाळता येईल?

1. घरगुती शिवलेले, कापडाचे मास्त वापरावेत. ते स्वच्छ धुवून पुन्हा पुन्हा वापरावेत, म्हणजे त्यांचा कचरा वाढणार नाही.2. शक्यतो डिस्पोजेबल मास्क गरज नसेल तर वापरूच नये; पण ज्यांना वापरावाच लागेल त्यांनी तो सरळ कच:यात टाकू नये. त्यापासून इतरांना धोका होऊ शकतो. तो तीन दिवस बाजूला ठेवून. र्निजतूक करून कच:यात द्यावा. 3. मास्क आणि ग्लोव्हज मोकळ्या जागांवर, रस्त्यावर किंवा उघडय़ा कचरा पेटय़ांमध्ये टाकू नये.4. दुकानातून खरेदी केलेला सर्जिकल मास्क, एकदाच वापरला जाणारा मास्क फेकण्याआधी त्याला कागदी पिशवीत बंद करा किंवा कागदात व्यवस्थित गुंडाळा.5. मास्कला कागदात गुंडाळून कमीत कमी तीन दिवस ठेवल्यानंतर कचरपेटीत टाका. 6. आपल्या घरातून निघणारा बायोमेडिकल कचरा, जसं की मास्क, औषधं, सॅनिटरी पॅड, डायपर, कण्डोम, ब्लेड, सिरिंज,बँड-एड इ, नेहमीच वेगळा करून, कागदात गुंडाळून कचरा घेऊन जाणा:या स्वच्छता कर्मचा:यांना द्या. हा कचरा रिसायकल होऊ शकणार नाही हा धोका तरीही कायम राहील.7. होम क्वॉरंटाइन व्हावं लागलं तर आपली कचरापेटी भरल्यावर तीन दिवसांनी ती स्वच्छता कर्मचा:यांना देणं चांगलं राहील. त्यासाठी आठवडय़ातून दोन कचरा पेटय़ा आलटून पालटून वापरता येतील. ओला कचराही हवेशीर जागेत ठेवल्यास त्याचा वास येण्याचा संभव कमी होतो.

(केतकी शिक्षणाने इंजिनिअर असून, कचरा व्यवस्थापन हा तिच्या अभ्यासाचा विषय आहे )