शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
2
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
3
पाकिस्तानचे दहशतवाद्यांना संरक्षण, हा घ्या पुरावा; भारताने आंतरराष्ट्रीय माध्यमांना दाखवला तो फोटो
4
IPL 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित! भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग पाहून BCCI चा मोठा निर्णय
5
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
6
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
7
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
8
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा
9
जैसलमेर इथं नागरी वस्तीत सापडला जिवंत बॉम्ब; पाकिस्तानी ड्रोनचा मलाबाही जप्त
10
पाकिस्तानी शेअर बाजारात भूकंप, पण भारतीय मार्केटवर झाला नाही परिणाम, 'ही' आहेत ३ मोठी कारणे
11
Swapna Shastra: प्रिय व्यक्तीचा स्वप्नात मृत्यू पाहणे शुभ की अशुभ? त्यातही स्वप्नं पहाटेचं असेल तर?
12
मनोहर पर्रीकरांची दूरदृष्टी, सैन्याची बनली अतूट शक्ती; S-400 ‘सुदर्शन’मुळे पाक चक्रावले
13
“भारताला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार, पाकने व्हिक्टिम कार्ड खेळू नये”; अमेरिकेने सुनावले
14
Operation Sindoor Live Updates: देशविरोधी शक्तींचं कुठलेही षडयंत्र यशस्वी होता कामा नये, RSS चं आवाहन
15
पाकिस्तानला आणखी एक धक्का! BSF ने जैशच्या ७ दहशतवाद्यांचा खात्मा केला; सांबामधून घुसखोरीच्या प्रयत्नात होते
16
'ऑपरेशन सिंदूर'वरील प्रत्येक अपडेट देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बहिणीचं आहे बॉलिवूड कनेक्शन, जाणून घ्या याबद्दल
17
पाकिस्तानची फजिती! अर्थ व्यवहार मंत्रालयाचे अकाऊंट हॅक; 'त्या' पोस्टने वेधून घेतलं जगाचं लक्ष
18
पहलगाम हल्ल्यानंतर या दिग्गज कंपनीचे ₹१९००० कोटी बुडाले, चालवते देशातील नंबर १ कंपनी
19
"देशात परिस्थिती काय अन् हा बावळट...", किंग कोहलीच्या भावाने राहुल वैद्यला सुनावलं
20
हाय अलर्ट! चंदीगड-अंबालामध्ये पुन्हा वाजले सायरन, नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना

coronavirus : घरात बोअर झालात? "हा" पंचाक्षरी मंत्र वापरा ,जादू होईल! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 18:19 IST

फारच बोअर होतंय घरात? काहीच सुचत नाही? मग हे करून पाहा. फिक्स, वॉच, लर्न, सॉर्ट, टॉक

ठळक मुद्देबोलणं ही माणसांची गरज आहे, हे बोलणं थांबवू नका.

अनेक आजारांत लोक सेल्फ हेल्प ग्रुप्स करतात. आपली दु:ख, लक्षणं, आपण काय काळजी घेतो, त्यातली सकारात्मकता शेअर करतात.कोरोना हा तर जगभर पसरलेला आजार. गरीब, श्रीमंत सगळ्यांना त्यानं एका रांगेत आणून बसवलं. जगभरात लॉक डाउन झालं. सगळं जग इंटरनेटने मात्र कनेक्टेड राहिलं.  म्हणून एकमेकांचे अनुभव लोकांना समजत आहेत. त्यातून अनेकांनी लॉकडाउनचे आपले अनुभव सांगितलेत. अशा अनेक कहाण्या नेटवर वाचायला मिळतात. त्यापैकी अनेकजण घरात एकेकटे अडकलेले. त्यांनी आपलं जगणं याकाळात कसं निभावलं याची कहाणी ते सांगतात. त्यातून या टप्प्यात टिकण्याची 5 सूत्रं हाती येतात. फिक्स, वॉच, लर्न, सॉर्ट, टॉक त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो.

1. फिक्स म्हणजे रुटीन फिक्स करा. कधीही उठायचं, कधीही झोपायचं, वाटलं तर करायची आंघोळ, वाटलं तर जेवायचं, म्हणजे दिवसाला काही शिस्तच नाही. असं करू नका. जितक्या गोष्टी आपण फिक्स करू त्यानं आपला आत्मविश्वास वाढेल, की गोष्टी आपल्या कण्ट्रोलमध्ये आहेत. आपण जे ठरवतो ते होतंच. म्हणून रुटीन फिक्स करणं गरजेचं आहे.

2. वॉच. पहा. भरपूर पहायला उपलब्ध आहे. टीव्हीवर, नेटवर, घराच्या बाहेर झाडापानांवर ते पहा. ठरवून तासभर तरी मनाला आनंद देईल असं म्हणजे जुन्या क्रिकेट मॅच ते सिनेमे, ते गाण्याच्या मैफली पहा.3. ऑनलाइन शिका. जे आवडेल ते. अगदी स्वयंपाक शिक. विणकाम शिका. दोरीवरच्या उडडय़ा मारणं ते पाठांतर असं काहीही शिका. शिकल्यानं जरा मेंदू फ्रेश होतो.

4. आवरा. पसारा आवरा. घरात स्वच्छता मोहित रोज ठरवून करा. कपाटं, पुस्तकं आवरा. फोनमधला पसारा आवरा. भरपूर आवरायला आहे, ते आवरा. नको ते काढून टाका. ओझं कमी करा.

5. बोला. बोलायला बंदी नाही. लांबून शेजारच्यांशी बोला. फोनवर बोला. घरातल्यांशी बोला. स्वत:शी बोला.बोलत राहा. बोलणं ही माणसांची गरज आहे, हे बोलणं थांबवू नका. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या