शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

लॉकडाउनमध्ये बोअर झालात? डल वाटतंय? मग हे रंग नाचवा तुमच्या नखांवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 14:10 IST

या लॉकडाउनमध्ये जरा नखांचा अभ्यास करा. त्यांचं आरोग्य पहा, नेलआर्टचे व्हिडीओ तर काय कधीही पाहता येतील.

ठळक मुद्देफॅशनच्या आधी आरोग्याचा विचार असा करता येतोच, आता वेळ आहे तर केलेला बरा.

- निकिता बॅनर्जी

नेलपॉलिश कसं निवडायचं? आणि कसं लावायचं की, आपण क्वॉरण्टिन मुडलापण रंगीन करून टाकू. आता तुम्ही म्हणाल की, घरात तर आहोत, लॉकडाउनमध्ये कोण पाहतं? तर तसं नाही !ऍड  कलर्स टू युअर लाइफ या सूत्रतला सगळ्यात सोपा, कमी खर्चिक, कमी वेळखाऊ आणि तातडीनं मूड बदलणारा, ब्राइट कलर्स जगण्यात भरणारा हा एक ट्रेण्ड आहे. नेलकलर्स, नेलआर्टचा.एरव्हीही तरुण मुली नेलपॉलिशच्या दिवान्या असतात.पण या लॉकडाउनच्या काळात अनेकजणी नेलआर्टचे व्हिडीओ पाहतात.त्याचे प्रयोगही आपल्या नखांवर करतात.त्यातून मस्त वाटत असेल, आपला मूड चांगला राहत असेल तर ते करायला काही हरकत नाही.मात्र हे करताना जरा आपल्या आरोग्याचाही विचार करायला हवा.अनेक मुली तर मिळेल तिथून मिळेल ते नेलपेंट खरेदी करतात आणि हाताना चोपडतात. तेवढय़ापुरतं ते चांगलं दिसतं; पण त्यानं आपल्या नखांवर वाइट परिणाम होतो, त्यामुळे ते रसायन बोटांना चोपडण्यापूर्वी त्याच्यावरची एक्सापायरी डेट पहा. फार जुनं असेल तर वापरू नका.पण मग अमुक नेलपॉलिश चांगलं हे तरी कसं ठरवणार?मुळात महागडे म्हणजे चांगले असं काही मनात असेल तर ते मनातून काढून टाका.सुंदर निमुळती बोटं, नाजूक नखं हे सौंदर्याचं परिमाण असतं हेही मनातून काढून टाका.त्यापलीकडे जाऊन आपल्या बोटांवर फुलपाखरांचे रंग कसे आणता येतील याचा विचार करा आणिमग पहा, आपला मूड आणि आपल्या जगण्याचा रंगही काही काळ बदलून जाईल.त्यासाठी हे लक्षात ठेवा.

1) आपली त्वचा, केस आणि डोळे आपलं वय सांगतात. आपण आरोग्याची किती काळजी घेतो हे सांगतात. त्यामुळे नेलपेण्ट लावण्यापूर्वी आपली नखं,  हात डोळ्यासमोर धरा आणि पहाच एकदा की, आपलं आरोग्य कसंय. तुमच्या अंगात रक्त किती, हिमोग्लोबिन किती आहे, याविषयी ते बरंच काही सांगतील.ते एकदा या लॉकडाउनमध्ये जरा शांतपणो ऐका.2) तुम्ही नखं कुरतडता का? का कुरतडता? हेही जरा पहा.  आपली नखं भयानक अवस्थेत आहेत का हे पहा. तसं असेल तर जरा डॉक्टरला फोन तर करा की, हे बरंय का म्हणून?3) नखं मुळात स्वच्छ असली पाहिजे, अनेकींच्या नेलपेण्ट चोपडलेल्या नखांमध्ये खूप घाण असते. नखात घाण असेल तर ती वाढत नाहीत. वाइट दिसतात. ते आरोग्याला घातकही आहेत. नखांचा शेप जरा पहा. त्यांची स्वच्छता आवश्यक असेल तर करा.4) नेलपॉलिश निवडताना एक लक्षात ठेवायचं की ती अॅक्सेटोन फ्री असली पाहिजे. नेलपॉलिशमधल्या अॅक्सेटोनमुळे नखांची मूळ चमक निघून जाते. त्यामुळे नेलपॉलिशच्या बाटल्यांवर काय काय लिहिलं आहे तेही जरा फुरसत असेल तर वाचून काढा.5) सतत नखांवर अतिमॉइश्चर असलं तरी नखं कोरडी, रखरखीत होऊ शकतात. त्यामुळे आपली नखं तशी आहेत का पहा. 6) तुमची नखं जर कोरडीच असतील तर त्यावर क्लिअर नेलपॉलिश लावा. बाजारात अनेक ब्रॅण्डच्या क्लिअर नेलपॉलिश मिळतात. 7) नखं खूपचं पातळ असतील तर ‘हार्डनर्स’ प्रकारची नेलपॉलिश निवडा. नेलपॉलिश लावण्यापूर्वी बेस कोट म्हणून हे हार्डनर्स वापरता येतात. त्यात ‘फायबर’ असतं.8) नेलपॉलिश लावताना आधी क्लिअर पॉलिश बेस कोट लावून मग टॉप कोट लावायचा. आता घरात ते नसेल तर हरकत नाही. ते नंतर आणा, आता आहे त्यात भागवा.9) रोज रात्री झोपताना कापसाने नखांना खोबरेल तेल, पेट्रोलियम जेली, मायश्चरायझर लावणं उत्तम.10) आपले हात नाजूक दिसावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर नखांना गोल आकार द्या. ते दिसतातही चांगले आणि गोल नखांमध्ये घाणही कमी अडकते.लॉकडाउनमध्ये नखांचा एवढा अभ्यास बास झाला. फॅशनच्या आधी आरोग्याचा विचार असा करता येतोच, आता वेळ आहे तर केलेला बरा.