- राम शिनगारे
औरंगाबादही कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे.या शहरातील डॉ. बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठात फक्त मराठवाडय़ातूनच नाहीतर विदर्भातून, सा:या महाराष्ट्रातून, देशातून विद्यार्थी शिकायला येतात.विदेशी विद्यार्थीही या विद्यापीठात शिकतात. सध्या 5क्क् पेक्षा अधिक परदेशी विद्यार्थी इथं शिकत आहेत. सध्या परीक्षांचे दिवस; पण लॉकडाउनमुळे परीक्षा नाहीत. स्थानिक विद्यार्थी तर आपल्या गावी परतले; पण या परदेशी विद्याथ्र्याचं काय?तसं पाहता सुदैवाने या विद्याथ्र्याना लॉकडाउनच्या काळात अडचणींचा सामना करावा लागला नाही. स्थानिक नागरिक, प्रशासनाचं सहकार्य मिळाल्यामुळे त्यांना हव्या त्या वस्तू मिळाल्या. आता ते सुरक्षित आपापल्या घरांमध्ये आहेत.मात्र त्यांच्याशी गप्पा मारल्या, जागतिक महामारीच्या काळात आपल्या घरापासून दूर परक्या देशात राहताना काय असेल त्यांची मनोवस्था?बोलता बोलता ही मुलं सांगतात की, आता कोरोनापेक्षाही अधिक चिंता शिक्षणाची वाटते. दोन महिन्यांपासून विद्यापीठ बंद आहे. परीक्षा केव्हा होणार याविषयी काही स्पष्ट नाही. शैक्षणिक नुकसान होईल की काय याचीच काळजी त्यांना लागून राहिली आहे.सध्या 152 विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विविध विभागांमध्ये पदव्युत्तर पदवी, एम.फिल., पीएच.डी.चं शिक्षण घेत आहेत. या विद्याथ्र्याना त्यांच्या देशांनी शिष्यवृत्त्या मंजूर केलेल्या आहेत. शहरातील अन्य महाविद्यालयांध्ये 4क्क् र्पयत परदेशी विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील बहुतांश विद्यार्थी हे इराण, इराक, येमन, सिरीया या देशांतले आहे. त्यांचे अशांत देश, तिथली गृहयुद्ध, रोज फुटणारे बॉम्ब या मुलांना नवे नाहीत. त्यातून मार्ग काढत त्यांनी देशाबाहेर पाऊल ठेवलं ते शिक्षणासाठी.दूर औरंगाबादमध्ये ते पोहोचले, आणि आता कोरोनानं सा:या जगाला वेठीस धरलेलं असताना आपल्या शिक्षणाचं काय या काळजीनं त्यांना घेरलं आहे. एकीकडे त्यांच्या दैनंदिन अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठ प्रशासन लक्ष ठेवून आहे. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. मुस्तजिब खान या विद्याथ्र्याच्या नियमित संपर्कात असतात. काही अडचण आलीच तर ती सोडविण्यासाठी तत्परतेनं मदत केली जाते.याविषयी डॉ. खान सांगतात, अनेक विद्याथ्र्याना मेसेज करतो. मेल केल्या जातात. मोबाइलवर संपर्क आहेच. मात्र ही मुलंही तशी समंजस आहेत, ते निभावून नेतात. सहसा अडचणी सांगत नाहीत. मध्यंतरी एका विद्यार्थिनीने मागणी केली होती की, माझी बहीण हैदराबादमध्ये शिक्षण घेत आहे. तिच्याकडे मला जाण्याची इच्छा आहे. त्यासाठी मदत करावी, मात्र हैदराबादला जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसल्यामुळे तिला पाठवता आलं नाही. तो नाइलाज होता, मात्र औरंगाबादेत आम्ही या मुलांना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून प्रयत्न करत असतो. काही विद्याथ्र्यानी या लॉकडाउनमुळे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली, तर काहींना आपल्या शिष्यवृत्तीची मुदत संपेर्पयत अभ्यासक्रम पूर्ण करायला हवा याची चिंता आहे. त्यांना विद्यापीठ प्रशासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य आम्ही नक्कीच करू!’
(राम लोकमतच्या मराठवाडा आवृत्तीत उपसंपादक/ वार्ताहर आहे.)