डॉ . भूषण केळकर
ज्या तरुण मुला-मुलींचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव 3 वर्षापेक्षा कमी आहे त्यांनी अगदी लक्षात ठेवण्याची एक महत्त्वाची गोष्ट आहे.ती म्हणजे तुमचा रेझ्युमे हा 1 पानापेक्षा जास्त नक्की नको! आपण हे कायम लक्षात ठेवू की बहुतांशी मोठय़ा कंपन्यांमधील उच्चपदस्थ अधिकारी व मॅनेजर वर्गातील लोकांचा पण रेझ्युमे एक पानी असतो. मग आपण तिसर्या वर्षाला शिकत असताना आपला रेझ्युमे 4 पानी असणं हे अर्थात, विनोदी वा्मय ठरेल, नाही का?आता आपण हे बघू की रेझ्युमेमध्ये काय नसावं? पगाराची अपेक्षा, कामावर रुजू कधी होऊ शकाल याची तारीख, अतिवैयक्तिक, अवास्तव माहिती, असंबंध माहिती, आधीची नोकरी सोडण्याचं कारण, शिक्षणात/नोकरीत खंड पडण्याची कारणं, फोटो (कृष्णधवल/रंगीत) आणि सही!अर्थात, यापैकी कोणतीही गोष्ट कंपनीने/संस्थेने मागितली असेल तर ती मान खाली घालून नक्की द्यायची! तिथं नियम सांगू नका. मात्र त्यांनी न विचारता स्वतर् विषयी अतिरिक्त माहिती देऊ नका. आता याच अनुषंगाने आपल्याला आपली ‘रेझ्युमे कुंडली’ मांडायची आहे. रेझ्युमे कसा लिहावा याचं एक पुस्तक मी या नावाने 10 वर्षापूर्वीच लिहिलं आहे. त्यापैकीच काही हे नियम.1) जर कंपनी/सदस्यांनी 3-4 पानांचा फॉर्म दिला असेल तर त्याच फॉरमॅटमध्ये सर्व रकाने इमानेइतबारे भरून द्यावा. रेझ्युमे 1 पानी असावा असा टेंभा मिरवून कंपनीला चॅलेंज करू नये!2) रेझ्युमेमध्ये अजिबात खोटे वा वाढवून लिहू नये. मिसलिडिंग माहिती देऊ नये. उदा. ‘जपानी भाषेवर प्रभुत्व’ असं लिहू नये - आपण जपानीची 5 पैकी पहिलीच पायरीची परीक्षा दिली आहे हे माहिती असूनसुद्धा! त्यापेक्षा खरं लिहावं- उदा. एनएएस पास आहे व जेएलपीटीची एन फोरची तयारी चालू आहे, असं लिहावं.खोटं बोलू नये हे जितकं खरं तितकंच महत्त्वाचं की सांगताना हात आखडता घेऊ नये. 3) रेझ्युमेच्या थोडय़ा व्यावहारिक गोष्टीपण सांगतो. रेझ्युमे शक्यतो टाइप केलेला असावा (हस्तलिखित नको). टाइम्स रोमन, एरिअल, हेलव्हेटीका यापैकी शक्यतो वापरावा. फुल्ली फॉरमेटेड असावा. स्पेसिंग किमान 9 आणि फॉण्ट 10 पेक्षा कमी नसावं नाहीतर भिंग घेऊन रेझ्युमे वाचायला लागेल. रेझ्युमे स्पष्ट असावा.4) रेझ्युमे चौकटीत नसावा. त्यातील वेगवेगळे भागदेखील चौकटबद्ध नसावेत. त्यातून तुम्ही संकुचित विचार करता असा मानसशास्त्रीय संदेश जातो, असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे.5) ए, अॅप, द या आर्टिकल्सचा वापर टाळावा. आय आणि वी या शब्दांचाही वापर टाळावा. उदा. आय स्डडीड कॅडकॅम ऐवजी एस्पटाइज इन कॅड कॅम किंवा स्टडीज कॅडकॅम असावं.6) इंग्रजी भाषेचा यथोचित आदर करून व्याकरण व स्पेलिंगवर नीट लक्ष द्यावे!7) अतिगुंतागुंतीची वाक्यं नकोत.8) रेझ्युमेची मांडणी रिव्हर्स क्रोनोलॉजी असावी. म्हणजे जी गोष्ट अगदी अलीकडे केली (शिक्षण/कोर्स/प्रोजेक्ट/प्रत्यक्षानुभव) ती आधी लिहा. आता मास्टर्स करत असाल तर ते आधी लिहा मग बॅचलर्स लिहा. मग बारावी आणि शक्यतो दहावीची माहिती टाळा.रेझ्युमे लिहितानाचे काही महत्त्वाचे भाग, आपण या विषयावरील तिसर्या अन् शेवटच्या भागात पुढे बघूच.