शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

फोन सतत चार्जिगला लावताय, सावध व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 16:58 IST

साधारण 100 व्होल्ट्सचा शॉकही माणसासाठी जीवघेणा असू शकतो. त्यामुळे यापुढे फोन चार्जिगला लावून बोलताना, उशाशी ठेवून झोपताना आपल्या जीवाला धोका आहे एवढं लक्षात असू द्या.

-निशांत महाजन

फोन चार्जिगला लावून, उशाशी घेऊन झोपायची सवय आहे तुम्हाला?  असेल तर तुमचा जीव धोक्यात आहे.  डायरेक्ट असा अंतिम इशारा पाहून घाबरु नका पण मोबाईल फोनची बॅटरी एक टक्का उरेर्पयत अनेकजण फोनवर बोलतात, मग फोन एकीकडे चार्जिगला लावून बोलतात आणि रात्री झोपताना तर फोन उशाशीच घेवून झोपतात. हे कमीच म्हणून जवळपास जर प्लग असेल तर अगदी उशाजवळ फोन ठेवून तो चार्जिगला लावला जातो. फोन तापतो, चटके बसतात, तरीही बोलणं, व्हॉट्सअ‍ॅपवरच्या गप्पा संपत नाहीत.हे सारं जीवावर बेतू शकतं.वॉशिंग्टन पोस्टने या अमेरिकेतील दैनिकानं काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार अशीच घातक सवय एका 32 वर्षाच्या तरुणाच्या जीवावर बेतली. दैव बलवत्तर म्हणून तो बचावला. विल डे नावाचा हा तरुण अलाबामा राज्यात हंण्टसविल या शहरात राहतो. रात्री आपला आयफोन चार्जिगला लावून तो झोपला. फोन उशाशीच होता. सकाळ होता होता कूस बदलली तशी त्याच्या गळ्यातली चेन त्या चार्जरवर पडली. आणि त्याच्या गळ्याला असा भयानक शॉक बसला की त्याचा पूर्ण गळा भाजला गेला, छातीही भाजली गेली. वेळेत दवाखान्यात पोहचल्यानं तो वाचला.तो सांगतो, मी कधी कल्पनाही केली नव्हती की गळ्यातली चेन, चार्जर या रोजच्या वापरातल्या वस्तूच अशा ब्लास्ट होतील आणि बॉम्ब फुटल्यासारख्या माझ्या अंगावरच फुटतील. साधारण 100 व्होल्ट्स इलेक्ट्रिसिटीचा शॉकही माणसासाठी जीवघेणा असू शकतो. त्यामुळे यापुढे फोन चार्जिगला लावून बोलताना, उशाशी ठेवून झोपताना आपल्या जीवाला धोका आहे एवढं लक्षात असू द्या.बाकी, फोन प्यारा की आपला जीव प्यारा, हे ज्यानं त्यानं ठरवायचं.