शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कोलंबियात हजारो तरुण रस्त्यावर, पोलिसांना म्हणताहेत, आता बास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 17:25 IST

कोलंबियातला उद्रेक पुन्हा एकदा जगाला तरुणांचे रिकामे हात, आणि तरुण इच्छांची दडपशाही यासंदर्भात धोक्याचा इशारा देतो आहे.

ठळक मुद्देभडकलेले तरुण रस्त्यावर

कलीम अजीम

कोलंबियाची राजधानी बोगोटा शहर अक्षरशर्‍ पेटून उठलं आहे. तिथं पोलिसांच्या मारहाणीत एका लॉ स्टुडंटचा मृत्यू झाला. त्याचे मित्र संतापले आणि म्हणता म्हणता तरुणांचे लोंढे रस्त्यावर उतरले. संतप्त झालेला जमाव व पोलीस यांच्यात अशी काही चकमक झाली की 10 जण मारले गेले. त्यानंतर पुढचे तीन दिवस तरुणांचे मोर्चे रस्त्यावर होते.बोगोटामध्ये भर रस्त्यात मद्य प्राशन करून गोंधळ घालणार्‍या ऑडरेनेझ नावाच्या एका विद्याथ्र्याला पोलिसांनी अटक केली होती. आरोपीला मारहाण करून स्टेशनकडे घेऊन जात असल्याचा एक व्हिडिओ वायरल झाला. ऑर्डाेनेझच्या सोबत असलेल्या मित्राने तो तयार केला होता. त्यात पोलीस ऑडरेनेझला बेदम मारहाण करत असल्याचे दिसतं. मला दम लागतोय, चालता येत नाही, असे ऑडरेनेझ म्हणतोय; पण पोलीस त्याला फरफटत घेऊन जाताना दिसतात. त्याला हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करण्यात आलं; परंतु दुसर्‍या दिवशी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.  

त्यानंतर तरुण संतापले आणि पोलीस अत्याचार थांबवा, या प्रकरणांवर कायमचे तोडगे काढा म्हणत त्यांनी आंदोलन केलं. त्याला पोलीस फारसा प्रतिसाद देत नसल्याचं लक्षात येताच जमावाने पोलिसांवर दगड आणि बाटल्या फेकल्या. स्टेशनच्या खिडक्यांवर हल्ला चढवला. स्प्रे मारले. हा वणवा पसरला आणि अन्य शहरांतही पोलिसांवर हल्ले सुरू झाले.  तीन दिवसांर्पयत चाललेल्या या संघर्षात एकूण 10 जण मारले गेले. मीडिया रिपोर्ट सांगतात की, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आंदोलक मरण पावले आहेत.पोलिसांचं म्हणणं आहे की, आरोपींनी कोरोनाकाळात  फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचं उल्लंघन केलं म्हणून कारवाई करावी लागली. मात्र या सार्‍याला कृष्णवर्णीयांवर होणारे हल्ले, भेदाभेद, पोलिसी अत्याचार यांचीही पाश्र्वभूमी आहे. एकीकडे कोरोनाचा कहर, हाताला नसलेलं काम, पोलिसी अत्याचार आणि  त्यात पिचणारं तारुण्य, असा हा एक भयंकर चेहरा आहे.कोलंबियातला उद्रेक पुन्हा एकदा जगाला तरुणांचे रिकामे हात, आणि तरुण इच्छांची दडपशाही यासंदर्भात धोक्याचा इशारा देतो आहे.- मात्र ऐकतंय का कुणी?