शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

co-ords- एकाच रंगाचे कपडे घालण्याचा नवा हॉट ट्रेण्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 16:40 IST

पॅण्ट आणि जॅकेट एकाच रंगाचे घालण्याचा हा कोणता नवीन ट्रेण्ड?

ठळक मुद्देट्रेण्डी राहायचं असेल तर छोटेच कपडे घालावे लागतात या गैरसमजाला को-ऑर्ड्स सेट हे उत्तम उदाहरण आहे. 

- श्रुती साठे 

पॅण्ट, शॉर्ट्स वर कुठला टॉप छान वाटेल आणि कुठलं जॅकेट शोभेल? प्रिंटेड का प्लेन? आता असा विचार करून वॉर्डरोब उलथापालथा करायची गरज नाही ! सध्या ट्रेण्डमध्ये आहे एकाच कापडाचा मॅचिंग टॉप आणि बॉटम वापरायची ! हे कपडे को-ऑर्ड्स म्हणजेच कॉ-ऑर्डिनेट सेट म्हणून ओळखले जातात.  वापरायला सुटसुटीत, दिसायला स्टायलिश असे हे टू पीस सूट तरु णींच्या पसंतीस पडताना दिसतायत. आपली मराठमोळी सईसुद्धा अशाच एक को-ऑर्ड्ससेटमध्ये सुंदर दिसली दिसली. फिक्या जांभळ्या रंगाचं जॅकेट आणि शॉर्ट्स हे एकदम यंग आणि फ्रेश कॉम्बिनेशन आहे. सईने त्यावर फ्रंट नॉट स्टाइलचा ब्रालेट टॉप, स्ट्रॅपी सॅण्डल्स आणि हातात सोनेरी रंगाच्या अ‍ॅक्सेसरी वापरून एकदम एलिगंट लूक दिलेला दिसतो.बॉलिवूड सेलेबच्यासुद्धा को-ऑर्ड्स सेट पसंतीस पडताना दिसतायत. अनुष्का शर्माने एअरपोर्ट लूकसाठी को-ऑर्ड्स सेटला प्राधान्य दिलं. निळ्या रंगाचं बॉम्बर जॅकेट आणि त्याच निळ्या रंगाचे क्युलॉट असा अतिशय साधा, कम्फोर्टेबल आणि तरीसुद्धा स्टायलिश. हा लूक तुम्हीसुद्धा वापरून पहा. सोनम कपूरदेखील मरून रंगाच्या  एका को-ऑर्ड्स सेटमध्ये सुरेख दिसली. तिने केलेलं मॅचिंग पॅण्ट-ब्लेझर आणि काळ्या लूज टॉपचं कॉम्बिनेशन हे आपल्या कोणालाही सहज वापरता येणारं आहे.

शिल्पा शेट्टीने मात्न  को-ऑर्ड्स सेट वापरून ग्लॅमरस लूक आणला. जांभळ्या रंगाचा हा टू पीस तिच्यावर खुलून दिसला. सोबत वापरलेला कॉन्ट्रास्ट लेपर्ड प्रिंट बेल्ट त्यावर शोभून दिसला.

को-ऑर्ड्स सेट हे पार्टी, कॅज्युअल, ऑफिसवेअर म्हणून वापरता येऊ शकतात, त्याच्या पॅन्ट आणि जॅकेटची स्टाइल योग्य त्या प्रयोजनानुसार निवडली म्हणजे झालं.  ट्रेण्डी राहायचं असेल तर छोटेच कपडे घालावे लागतात या गैरसमजाला को-ऑर्ड्स सेट हे उत्तम उदाहरण आहे.