मला वाटतं, पर्यावरण वाचवण्यासाठी आपण खूप छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो.
आपण आईस्क्रीम खातोच ना, ते खाताना कपमधलं आईस्क्रीम खाऊन ते प्लॅस्टिकचे डबे इकडेतिकडे फेकण्यापेक्षा कोन खाल्ला तर?
सरळ खाऊनच टाकायचं ना, कचर्याची काही भानगडच नाही. तेच युज अँण्ड थ्रो गोष्टींचंही. पेन तर आपण हल्ली युज अँण्ड थ्रोच वापरतो. आणि मग त्या पेनांच्या ढिगाचं काय करायचं हेच कळत नाही. त्यामुळे सोपा उपाय म्हणजे असे युज अँण्ड थ्रो पेन न वापरणं. सरळ रिफिलवाले किंवा शाईचे पेन वापरणं उत्तम. उरलेले आधीचे पेन सरळ बुकमार्क म्हणून वापरायचे.
श्ॉम्पू, परफ्यूम, डिओ यांच्या रिकाम्या डबड्यांचा सरळ फ्लॉवरपॉट तरी करायचा नाहीतर पेनस्टॅण्ड तरी. मोबाइलला कव्हर तर पाहिजेच, पण रबर कव्हर घेऊन ते सतत बदलण्यापेक्षा फ्लिप कव्हर वापरावं म्हणजे मग सतत स्क्रिन गार्ड बदलण्याची पण गरज नाही.
मुलींच्या कानातल्यांचं काय करता येईल? वाट्टेल तसे घेतो, एखादं हरवलं की पडून राहतो तो ढीग तसाच. त्याचं काही डेकोरेटिव्ह तरी करावं, नाहीतर भारंभार विकत घेऊच नये. पैसेही वाचतील. मला वाटतं, वापरा आणि फेका या लाइफस्टाइलमध्येच आपण सुधारणा करण्याची गरज आहे. आपण कचरा निर्माणच केला नाही तर बरेच प्रश्न निर्माण होण्यापूर्वी सुटतील.
मी जमवतेय असलं काही, बदलतेय स्वत:ला म्हणून शेअर केलं.
- अनुपमा काटे
थर्ड इयर, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, धुळे